मराठी बातम्या /बातम्या /मनी /PF UAN नंबर आठवत नाही, घरबसल्या काही वेळात रिकव्हरी शक्य, जाणून घ्या सविस्तर माहिती

PF UAN नंबर आठवत नाही, घरबसल्या काही वेळात रिकव्हरी शक्य, जाणून घ्या सविस्तर माहिती

 जुन्या कंपनीच्या कार्यालयात न जाता किंवा पीएफ कार्यालयात फेऱ्या न मारता तुम्ही तुमचा विसरलेला यूएएन घरी बसून रिकव्हर (UAN Recovery) करू शकता. त्यासाठी तुम्हाला खाली दिलेली प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

जुन्या कंपनीच्या कार्यालयात न जाता किंवा पीएफ कार्यालयात फेऱ्या न मारता तुम्ही तुमचा विसरलेला यूएएन घरी बसून रिकव्हर (UAN Recovery) करू शकता. त्यासाठी तुम्हाला खाली दिलेली प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

जुन्या कंपनीच्या कार्यालयात न जाता किंवा पीएफ कार्यालयात फेऱ्या न मारता तुम्ही तुमचा विसरलेला यूएएन घरी बसून रिकव्हर (UAN Recovery) करू शकता. त्यासाठी तुम्हाला खाली दिलेली प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

  मुंबई, 7 एप्रिल : कुठल्याही सरकारी किंवा खासगी कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पीएफ (Provident Fund) किती महत्त्वाचा असतो, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. पीएफ अकाउंटशी (PF Account) संबंधित असलेली सर्व माहिती सांभाळून ठेवणं गरजेच आहे. अशाच माहितीमध्ये यूएएन नंबरचा (UAN number) समावेश होतो. युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजेच यूएएन (UAN) हा नोकरदारांसाठी खूप महत्त्वाचा आहे. या नंबरद्वारे नोकरदार त्यांच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (PF) खात्यात लॉग इन करू शकतात.

  कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून (EPFO) आपल्या सर्व सदस्यांसाठी स्वतंत्र 12 अंकी यूएएन जारी केला जातो. काही वेळा कर्मचाऱ्यांना या नंबरचा विसर पडतो किंवा त्यांच्याकडून तो गहाळ होतो. असं झाल्यास त्यांना समस्यांना सामोरं जावं लागतं. विशेषत: जेव्हा कंपनी बदलली जाते पण पीएफ खातं आहे तेच ठेवलं जातं तेव्हा अडचणी वाढतात. अशा परिस्थितीत, जुन्या कंपनीच्या कार्यालयात न जाता किंवा पीएफ कार्यालयात फेऱ्या न मारता तुम्ही तुमचा विसरलेला यूएएन घरी बसून रिकव्हर (UAN Recovery) करू शकता. त्यासाठी तुम्हाला खाली दिलेली प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

  Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढींनी त्रस्त नागरिकांना दिलासा मिळणार? काय आहे सरकारचा मास्टर प्लॅन

  अशाप्रकारे यूएएन करा रिकव्हर 

  >> सर्वप्रथम ईपीएफओच्या (EPFO) वेबसाइटवर जा. तिथे सर्व्हिसेस ऑप्शनमध्ये जाऊन फॉर एम्प्लॉइजवर (For Employees) क्लिक करा. त्यानंतर यूएएन ऑप्शनवर क्लिक करा.

  >> त्यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल, ज्यावर यूएएनद्वारे लॉगिन करण्याचा ऑप्शन दिसेल. त्याच्या खाली 'नो यूवर यूएएन' (Know Your UAN) ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.

  >> आता तुमच्या पीएफ अकाउंटसोबत लिंक असलेला मोबाईल नंबर टाका. यानंतर, स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड फीड करून रिक्वेस्ट ओटीपी (OTP) ऑप्शनवर क्लिक करा.

  >> ओटीपी व्हेरिफाय झाल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. त्यात तुमचं नाव, जन्मतारीख यासारखे तपशील टाका. त्यानंतर आधारकार्ड, पॅन कार्ड किंवा पीएफ मेंबर आयडीपैकी एक ऑप्शन निवडा. जर तुमचं पीएफ अकाउंट तुमच्या आधार आणि पॅनशी लिंक केलेलं नसेल, तर मेंबर आयडी ऑप्शन निवडा.

  >> आता तुमचा आधार, पॅन किंवा पीएफ मेंबर आयडीसह कॅप्चा कोड फीड करा. त्यानंतर शो माय यूएएन (Show My UAN) ऑप्शनवर क्लिक करा.

  >> तुम्हाला तुमचा यूएएन दिसेल. तो तुमच्याकडे वहीत नोंदवून ठेवा किंवा तुमच्या कॉम्प्युटरवरही सेव्ह करू शकता.

  Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढींनी त्रस्त नागरिकांना दिलासा मिळणार? काय आहे सरकारचा मास्टर प्लॅन

  मिस्ड-कॉलच्या मदतीनंही होते यूएएनची रिकव्हरी

  तुम्ही मिस्डकॉलच्या सहाय्यानंही यूएएनची रिकव्हरी करू शकता. त्यासाठी ईपीएफओकडे रजिस्टर असलेल्या तुमच्या मोबाइल क्रमांकावरून 011-22901406 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या. लगेच तुम्हाला ईपीएफओकडून एक एसएमएस (SMS) येईल. त्या एसएमएसमध्ये तुमच्या पीएफ अकाउंटशी संबंधित सर्व माहिती असेल. वरील दोन्ही पद्धतींचा वापर करून तुम्ही तुमचा यूएएन नंबर मिळवू शकता.

  First published:

  Tags: Epfo news, Money, PF Amount