मराठी बातम्या /बातम्या /मनी /EPF नियमात मोठा बदल; आता घरबसल्या लाख रुपये काढता येतील एका तासात, वाचा प्रोसेस

EPF नियमात मोठा बदल; आता घरबसल्या लाख रुपये काढता येतील एका तासात, वाचा प्रोसेस

कर्मचाऱ्यांना 1 लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय अँडव्हॉन्स रक्कम काढण्याची सुविधा सुरू करण्यात आल्याची माहिती कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO  दिली आहे.

कर्मचाऱ्यांना 1 लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय अँडव्हॉन्स रक्कम काढण्याची सुविधा सुरू करण्यात आल्याची माहिती कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO दिली आहे.

कर्मचाऱ्यांना 1 लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय अँडव्हॉन्स रक्कम काढण्याची सुविधा सुरू करण्यात आल्याची माहिती कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO दिली आहे.

नवी दिल्ली, 07 ऑक्टोबर : कोरोना विषाणूच्या या महामारीच्या काळात लोकांना अचानक लागणाऱ्या पैशांची गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारने भविष्य निधीबाबत नवीन सेवा सुरू केली आहे. या अंतर्गत आता तुम्ही तुमच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून (EPF) 1 लाख रुपये अँडव्हॉन्स काढू शकता. कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन काळात तुम्ही हे पैसे काढू शकता. तसेच या अँडव्हॉन्स पैशांसाठी अर्ज केल्यानंतर, बँक खात्यात पैसे हस्तांतरण करण्याची वेळ (डीबीटी) देखील कमी केली गेली आहे. यासाठी सरकारने नियमांमध्ये काही (EPFO subscribers get 1 lakh rupees in 1 hour) महत्त्वाचे बदल केले आहेत.

बिल करण्याची गरज नाही

कर्मचाऱ्यांना 1 लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय अँडव्हॉन्स रक्कम काढण्याची सुविधा सुरू करण्यात आल्याची माहिती कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO  दिली आहे. कोरोना विषाणू व्यतिरिक्त इतर कोणत्याही आजाराच्या वेळी आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात दाखल केल्यावर पीएफमधून पैसे काढता येतात. यापूर्वी देखील आपल्याला वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी EPF मधून पैसे काढता येणे शक्य होते. परंतु, वैद्यकीय बिल जमा केल्यानंतर ते पैसे उपलब्ध होत होते. मात्र, ही नवीन वैद्यकीय अँडव्हॉन्स सेवा पूर्वीच्या प्रणालीपेक्षा वेगळी आहे. यामध्ये तुम्हाला कोणतेही बिल भरावे लागणार नाही. तुम्हाला फक्त अर्ज करायचा आहे आणि आता 3 दिवसांऐवजी फक्त 1 तासात तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातील.

हे वाचा - अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, पिकांच्या नुकसान भरपाईसाठी 365 कोटी 67 लाख रुपये मंजूर

पीएफमधून पैसे कसे काढायची प्रोसेस -

यासाठी तुम्हाला आधी epfindia.gov.in वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर, वरच्या उजव्या कोपऱ्यात ऑनलाइन अॅडव्हान्स क्लेमवर क्लिक करा.

यानंतर unifiedportalmem.epfindia.gov.in/memberinterface वर जा.

ऑनलाईन सेवांवर जा. यानंतर क्लेम फॉर्म -31, 19, 10 सी आणि 10 डी भरा.

तुमच्या बँक खात्याचे शेवटचे 4 अंक टाका आणि पडताळणी करा.

ऑनलाइन दाव्यासाठी Next वर क्लिक करा.

हे वाचा - मेहुण्याच्या गर्लफ्रेंडसोबत केली विचित्र मस्करी; लग्नातच नवरदेवामुळे लागलं भांडण

ड्रॉप डाऊनमधून पीएफ अॅडव्हान्स रक्कम निवडा.

पैसे काढण्याचे कारण निवडा. रक्कम प्रविष्ट करा आणि चेकची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा. मग तुमचा पत्ता टाका.

गेट आधार ओटीपीवर क्लिक करा आणि आधार लिंक्ड मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी एंटर करा.

या प्रक्रियेनंतर तुमचा पैसे काढण्यासाठीचा दावा दाखल केला जाईल. PF क्लेमचे पैसे तुमच्या खात्यात एका तासात येतील.

First published:

Tags: Epfo news, Pf, PF Withdrawal