नोकरदार वर्गासाठी खूशखबर! मोबाइलवर मिळणार EPFOची ही सुविधा
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने अशी माहिती दिली आहे की, आता पेंशन पेमेंट ऑर्डर (PPO) आणि युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आता सरकारी e-Locker सर्व्हिस डिजीलॉकरमध्येही उपलब्ध होणार आहे
नवी दिल्ली, 08 मार्च : कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने (EPFO- Employee Provident Fund Organization) अशी माहिती दिली आहे की, आता पेंशन पेमेंट ऑर्डर (PPO) आणि युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आता सरकारी e-Locker सर्व्हिस डिजीलॉकरमध्येही उपलब्ध होणार आहे. EPFO ने ट्वीट करून ही माहिती दिली आहे. या सुविधेमुळे EPFO धारक आता UAN आणि PPO डिजीलॉकरच्या माध्यमातून डाउनलोड करू शकतात. त्यामुळे लाखो पेंशनधारकांना आणि पीएफ मेंबर्सना कमी वेळेत डॉक्युमेंट डाउनलोड करणं शक्य आहे.
पगारधारक कर्मचाऱ्यांसाठी UAN अत्यंत आवश्यक आहे. त्याच माध्यमातून कर्मचाऱ्यांना EPF अकाउंट ट्रॅक करता येतं. त्याचप्रमाणे PPO 12 आकडी युनिक नंबर आहे, ज्यामुळे पेंशनधारकांना पेंशन मिळवण्याची प्रक्रिया सोपी होती. पेंशनधारकांना दरवर्षी जीवन प्रमाणपत्र जमा करताना PPO नंबरची आवश्यकता असते.
डिजीलॉकर काय आहे?
डिजीलॉकर केंद्र सरकारचं एक अॅप आहे. ज्यामध्ये तुम्ही तुमच्या दस्ताऐवजांची स्कॅन कॉपी स्टोअर करून ठेवू शकता. ज्यामुळे तुम्हाला हवं तेव्हा हे दस्ताऐवज मिळू शकतात. या अॅपवर अकाउंट उघडण्यासाठी 12 अंकी आधार नंबर देणे आवश्यक आहे.