तुम्ही ग्रॅज्युएट आहात? मग 'इथे' मिळेल 44,900 रुपये पगाराची नोकरी

तुम्ही ग्रॅज्युएट आहात? मग 'इथे' मिळेल 44,900 रुपये पगाराची नोकरी

ही प्रक्रिया 30 मेपासून सुरू होतेय. उमेदवार 25 जूनपर्यंत अर्ज करू शकतात.

  • Share this:

मुंबई, 24 मे : तुम्ही सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कर्मचारी भविष्य निधी संस्थेत (EPFO) भरती सुरू होतेय. EPFO असिस्टंट पदांसाठी भरती करतेय. ज्यांना या पदासाठी अर्ज करायचाय त्यांनी epfindia.gov.in वर जाऊन अर्ज करावा. ही प्रक्रिया 30 मेपासून सुरू होतेय. उमेदवार 25 जूनपर्यंत अर्ज करू शकतात.

इथे ऑनलाइन करा गुंतवणूक, सेव्हिंग अकाउंटपेक्षा जास्त मिळेल व्याज

EPFOमध्ये असिस्टंट पदासाठी 280 जागा आहेत. त्यात जनरल- 113, EWS- 28, OBC- 76, SC- 42, ST- 21 वर्गांसाठी नोकऱ्या आहेत. यासाठी उमेदवार कुठल्याही मान्यताप्राप्त संस्थेतून ग्रॅज्युएट हवा. या पदासाठी कमीत कमी वय 20 वर्ष आणि जास्तीत जास्त 27 वर्ष हवं.

SPECIAL REPORT: मोदींच्या विजयामागे महत्त्वाच्या आहेत या 10 गोष्टी!

एससी, एसटी,पीडब्ल्यूडी आणि महिलांसाठी अर्जाची फी 250 रुपये आहे. बाकीच्यांसाठी 500 रुपये आहे. उमेदवार फी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बॅकिंग, कॅश कार्ड आणि मोबाइल वॉलेट याद्वारे भरू शकतात.

राज्यात सेना – भाजपच्या विजयाची ही आहेत सहा कारणं

अशी होईल निवड

उमेदवाराची निवड लिखित परीक्षा घेऊन केली जाईल. त्यात प्राथमिक परीक्षा आणि अंतिम परीक्षा यांचं आयोजन असेल. नोकरीसाठी निवड झालेल्यांचा पगार 44,900 रुपये असेल. 30 आणि 31 जुलै 2019 रोजी प्राथमिक परीक्षा असू शकते.

अमित शहा यांना भाजपचे 'चाणक्य' का म्हणतात? पाहा SPECIAL REPORT

First published: May 24, 2019, 11:10 AM IST
Tags: Epfojobs

ताज्या बातम्या