नोकरदारांसाठी खुशखबर! PF चे व्याजदर वाढले

नोकरदारांसाठी खुशखबर! PF चे व्याजदर वाढले

नोकदारांसाठी एक चांगली बातमी आली आहे. 2018-19 साठी कर्मचारी भविष्य निधी अर्थात EPF चा व्याजदर वाढवण्यात आला आहे. आता किती व्याज मिळेल?

  • Share this:

नवी दिल्ली, 26 एप्रिल : नोकदारांसाठी एक चांगली बातमी आली आहे. कर्मचारी भविष्य निधी अर्थात EPF चा व्याजदर वाढणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. अर्थमंत्रालयाने ईपीएफचे व्याजदर 8.65 टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावाला शुक्रवारी मंजुरी दिली. या निर्णयाचा फायदा 6 कोटी नोकरदारांना मिळणार आहे.

अर्थमंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या वित्तीय सेवा विभागाने (DFS)2018-19 साठी EPFO  ने आपल्या सदस्यांना 8.65 इतकं व्याज मिळावं या निर्णयाला संमती दिली. काही अटींचं पालन करण्याच्या आधारावर ईपीएफओने या व्याजदरवाढीच्या प्रस्तावाला संमती दिली.

याअगोदर कामगार मंत्रालयाने ईपीएफचे व्याज दर वाढवून 8.65 करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला आता मंजुरी मिळाली.

2017-18 मध्ये भविष्य निर्वाह निधी अर्थात PF वरचा व्याजदर 8.55 होता. गेल्या तीन वर्षांत पीएफचे व्याजदर सातत्याने घटत आहेत. 2015-16 मध्ये 8.8 एवढा असलेला व्याजदर 2016-17 मध्ये कमी करून 8.65 करण्यात आला होता. आता पुन्हा त्या आकड्यावर व्याजदर जाईल.

ईपीएफओच्या अंदाजानुसार, व्याजदर वाढवल्याने 151.67 कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे. हा व्याजदर 8.7 केला तर हा अतिरिक्त बोजा 158 कोटींवर जाईल.

थरारक VIDEO : एवढ्याच्या पाण्यासाठी करावी लागतेय जीवघेणी कसरत

First published: April 26, 2019, 6:57 PM IST

ताज्या बातम्या