मराठी बातम्या /बातम्या /मनी /अशाप्रकारे घरबसल्या करा तुमचा PF ट्रान्सफर, EPFO ने दिली महत्त्वाची माहिती

अशाप्रकारे घरबसल्या करा तुमचा PF ट्रान्सफर, EPFO ने दिली महत्त्वाची माहिती

EPFO News: तुम्ही नोकरी बदलली तर तुमच्या पहिल्या नोकरीतील भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफची (Provident Fund-PF) रक्कम दुसऱ्या कंपनीनं सुरू केलेल्या पीएफ खात्यात ट्रान्स्फर (Transfer) करायची असेल तर हे काम आता घरबसल्या करता येते.

EPFO News: तुम्ही नोकरी बदलली तर तुमच्या पहिल्या नोकरीतील भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफची (Provident Fund-PF) रक्कम दुसऱ्या कंपनीनं सुरू केलेल्या पीएफ खात्यात ट्रान्स्फर (Transfer) करायची असेल तर हे काम आता घरबसल्या करता येते.

EPFO News: तुम्ही नोकरी बदलली तर तुमच्या पहिल्या नोकरीतील भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफची (Provident Fund-PF) रक्कम दुसऱ्या कंपनीनं सुरू केलेल्या पीएफ खात्यात ट्रान्स्फर (Transfer) करायची असेल तर हे काम आता घरबसल्या करता येते.

नवी दिल्ली, 03 मार्च: तुम्ही नोकरी बदलली तर तुमच्या पहिल्या नोकरीतील भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफची (Provident Fund-PF) रक्कम दुसऱ्या कंपनीनं सुरू केलेल्या पीएफ खात्यात ट्रान्स्फर (Transfer) करायची असेल तर हे काम आता घरबसल्या करता येते. ही सर्व सुविधा ऑनलाइन उपलब्ध आहे. खरंतर, युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) मिळाल्यानंतर कर्मचाऱ्याची सर्व खाती एकाच ठिकाणी राहतात मात्र पैसे वेगवेगळ्या खात्यात असतात. यासाठी नवीन कंपनीत गेल्यानंतर त्यांना आपला युएएन नंबर देणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्या जुन्या खात्यातील रक्कम नवीन खात्यात ट्रान्सफर करा. ही प्रक्रिया ऑनलाइन करता येते, याबाबत सविस्तर जाणून घ्या..

पीएफ ट्रान्सफर करण्यासाठी कशाप्रकारे कराल अप्लाय?

- सर्व प्रथम ईपीएफओच्या युनिफाइड मेंबर पोर्टलला भेट द्या. https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या वेबसाइटवर जाऊन, युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आणि पासवर्ड वापरून इथं लॉग इन करा.

-त्यानंतर ऑनलाइन सर्व्हिसेसवर जा आणि Member-One EPF Account Transfer Request या पर्यायावर क्लिक करा.

-यामध्ये वैयक्तिक माहिती आणि पीएफ खात्याची माहिती व्हेरीफाय करावी लागेल. तुम्हाला तुमच्या सध्याच्या नोकरीबद्दल माहिती द्यावी लागेल.

(हे वाचा-Explained: म्युचअल फंड KYC अपडेट करायचं आहे? अशी आहे प्रक्रिया)

-यानंतर, गेट डिटेल ऑप्शनवर क्लिक करा. आधीच्या नोकरीतील पीएफ खात्याचा तपशील स्क्रीनवर दिसून येईल.

-आता तुम्हाला ऑनलाइन क्लेम फॉर्म अटेस्ट करण्यासाठी आधीची आणि सध्याची कंपनी यांच्यामध्ये पर्याय निवडता येईल.  अधिकृत सिग्नेटरी होल्डिंग डीएससीच्या उपलब्धतेवर आधारित याची निवड केली जावी. दोन्हीपैकी कोणत्याही एका कंपनीची निवड करून मेंबर आयडी किंवा युएएन द्या.

- शेवटी गेट ओटीपी पर्यायावर क्लिक करा. आपल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल. मग तो ओटीपी इथं भरा आणि सबमिट ऑप्शनवर क्लिक करा.

-एकदा ओटीपी पडताळल्यानंतर ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना आधीच्या कंपनीला पाठविली जाईल.

-पुढील तीन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल. आधीची कंपनी ती रक्कम हस्तांतरित करेल, तर ईपीएफओचे फील्ड अधिकारी याची पडताळणी करतील.

(हे वाचा-शेतकऱ्यांनी 31 मार्चपूर्वी हे काम करणं फायद्याचं, कमी व्याजदरात मिळवता येईल कर्ज)

- ईपीएफओ अधिकाऱ्यांच्या पडताळणीनंतरच तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातील.

- हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाली की नाही हे पाहण्यासाठी आपण ट्रॅक क्लेम स्थितीमधील स्थिती पाहू शकता.

- ऑफलाइन हस्तांतरणासाठी तुम्हाला फॉर्म -13 भरावा लागेल आणि तो जुन्या कंपनीला किंवा नव्या कंपनीला द्यावा लागेल

काय अत्यावश्यक

- नोंदणीकृत मोबाइल नंबर सक्रिय असावा कारण या नंबरवर ओटीपी पाठविला जाईल.

- कर्मचार्‍याचा बँक खाते क्रमांक आणि आधार क्रमांक युएएनबरोबर लिंक केलेला असावा

- आधीची नोकरी सोडल्याची तारीख माहित असणे आवश्यक आहे

- ई-केवायसी (E KYC) कंपनीनं पूर्ण करणं, त्याला मंजुरी देणं आवश्यक आहे.

- आधीच्या सदस्यत्व आयडीसाठी फक्त एक ट्रान्स्फर विनंती मंजूर केली जाईल

-अर्ज करण्यापूर्वी, सदस्याच्या प्रोफाइलमध्ये दिलेल्या सर्व वैयक्तिक माहितीची पडताळणी करून खात्री करून घ्या

First published:

Tags: Epfo news, Money, Pf, PF Amount, Pf news, PF Withdrawal