मराठी बातम्या /बातम्या /मनी /PF खातं आधारशी लिंक करण्यात येतायंत समस्या? तर सर्वात आधी करा हे काम

PF खातं आधारशी लिंक करण्यात येतायंत समस्या? तर सर्वात आधी करा हे काम

प्रत्येक कर्मचाऱ्याने त्याचे पीएफ खाते (PF Account) आधार क्रमांकाशी (Aadhar Card Number) लिंक करणे आवश्यक आहे. मात्र आधार आणि पीएफ खात्यामध्ये दिलेली माहिती जुळत नसल्याने अनेकांना या लिंकिंग प्रक्रियेमध्ये अडचणी येत आहेत.

प्रत्येक कर्मचाऱ्याने त्याचे पीएफ खाते (PF Account) आधार क्रमांकाशी (Aadhar Card Number) लिंक करणे आवश्यक आहे. मात्र आधार आणि पीएफ खात्यामध्ये दिलेली माहिती जुळत नसल्याने अनेकांना या लिंकिंग प्रक्रियेमध्ये अडचणी येत आहेत.

प्रत्येक कर्मचाऱ्याने त्याचे पीएफ खाते (PF Account) आधार क्रमांकाशी (Aadhar Card Number) लिंक करणे आवश्यक आहे. मात्र आधार आणि पीएफ खात्यामध्ये दिलेली माहिती जुळत नसल्याने अनेकांना या लिंकिंग प्रक्रियेमध्ये अडचणी येत आहेत.

नवी दिल्ली, 17 जून: प्रत्येक कर्मचाऱ्याने त्याचे पीएफ खाते (PF Account) आधार क्रमांकाशी (Aadhar Card Number) लिंक करणे आवश्यक आहे. मात्र आधार आणि पीएफ खात्यामध्ये दिलेली माहिती जुळत नसल्याने अनेकांना या लिंकिंग प्रक्रियेमध्ये अडचणी येत आहेत. हे टाळण्यासाठी ही माहिती जुळणं आवश्यक आहे, त्याकरता जाणून घ्या कसा अपडेट कराल हा तपशील.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) अशी माहिती दिली आहे की सर्व सब्सक्रायबर्स 1 सप्टेंबर 2021 पर्यंत त्यांचे आधार पीएफ खात्याशी लिंक करू शकतात. EPFO ने ही डेडलाइन तीन महिन्यांनी वाढवली आहे. देशभरातील कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय EPFO ने पीएफ खात्यामधील माहिती ऑनलाइन अपडेट करण्याची सुविधाही दिली आहे. याअंतर्गत नाव, जन्मतारीख, जेंडर, मोबाइल क्रमांक इ. तुमच्या आधार कार्डावरील माहितीनुसार अपडेट करता येईल.

हे वाचा-कोरोनाची दुसरी लाट या कर्मचाऱ्यांसाठी ठरतेय धोकादायक, अनेकांनी गमावली नोकरी

अशाप्रकारे बदलता येईल नाव

PF खात्याकरता UAN क्रमांक आवश्यक असतो. तुम्हाला यूएएन क्रमांकाचा वापर करून सर्वात आधी ईपीएफओची वेबसाइट https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ वर लॉग इन करावं लागेल. त्यानंतर तुमची प्रोफाइल विंडो दिसेल. यानंतर मॅनेजच्या पर्यायावर क्लिक करा, ज्याठिकाणी तुम्हाला बेसिक डिटेल्स आणि कॉन्टॅक्ट डिटेल्सची माहिती मिळेल. बेसिक डिटेल्सच्या पर्यायवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नाव, जन्मतारीख आणि अन्य तपशील दिसेल. तुमच्या नावाची स्पेलिंग, जन्मतारखेचे आकडे, आधार क्रमांक यामध्ये काही चुकीचं असेल तर याठिकाणी तुम्ही एडिट करू शकता. अशाचप्रकारे कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये मोबालइ क्रमांक आणि मेल आयडी अपडेट करता येईल.

नावाच्या स्पेलिंगव्यतिरिक्त बदल करायचे असतील तर द्यावे लागतील दस्तावेज

तुम्ही माहिती अपडेट केल्यानंतर तुमचा नियोक्ता म्हणजे तुम्ही ज्या कंपनीत काम करता त्याच्या एचआर विभागाकडून ते मंजुर करता येईल. यानंतर ही माहिती ईपीएफओच्या फील्ड ऑफिसला जाईल. येथे लहान दुरुस्त्या म्हणजेच स्पेलिंग इ. असतील तर ऑनलाइन अपडेट केलं जाईल. पण आधारमध्ये दिलेली जन्मतारीख आणि पीएफ खात्यावर असणारी जन्मतारीखेमध्ये तीन वर्षांचं अंतर असेल, किंवा जर पूर्ण नाव किंवा आडनाव बदललेलं असेल तर या तुम्हाला संबंधित कागदपत्रे ईपीएफओला द्याव्या लागतील.

हे वाचा-PAN Card हरवलं आहे? नवीन इन्कम टॅक्स पोर्टलवर त्वरित मिळेल ई-पॅन, वाचा प्रक्रिया

लग्नानंतर आडनाव बदलल्यास त्याबाबतचे विवाह प्रमाणपत्र आणि राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या नावाच्या बदलाची माहिती द्यावी लागेल. त्याचप्रमाणे आपण बँक खाते क्रमांक, नॉमिनी इत्यादी तपशील अपडेट करू शकता.

पीएफ खात्याशी आधार लिंक करणं आवश्यक

तुमचा आधार क्रमांक यूएएनशी लिंक नसेल तर सब्सक्रायबर्सच्या खात्यात एम्प्लॉयरचे योगदान थांबवले जाऊ शकते. शिवाय तुम्ही पीएफचे पैसे काढण्यासाठी क्लेम देखील नाही करू शकणार. याचा परिणाम तुम्हाला भविष्यात मिळणाऱ्या पेन्शनवर देखील होईल. सब्सक्रायबर्सचे UAN  (Universal account number) आधारसह लिंक असणं आवश्यक आहे. EPFO ने Social Security code 2020 च्या सेक्शन 142 मध्ये बदल केला आहे. यामुळे ECR फाइलिंग प्रोटोकॉल बदलला आहे. आता ही डेडलाइन 1 सप्टेंबर 2021 करण्यात आली आहे. पूर्वी 1 जून 2021 ही UAN-Aadhar लिंक करण्याची अंतिम तारीख होती.

आधारवरील डेटाला मान्यता

केंद्र सरकारसाठी केवळ आधार डेटा वैध आहे. आधार क्रमांक जारी करणारी संस्था यूआयडीएआय (UIDAI) तुमच्या तपशीलाची पडताळणी करते. म्हणून, पीएफ खात्यामधील माहितीशी आधार डेटा जुळत नसल्यास आपल्याला पीएफचा लाभ मिळणार नाही.

First published:

Tags: Aadhar card, Aadhar card link, Epfo news, Pf, PF Amount, Pf news, PF Withdrawal