नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर : एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनने (EPFO) आपल्या ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यासाठी (Grievance Redressal) WhatsApp हेल्पलाइन सर्व्हिस (EPFO WhatsApp Helpline Service) सुरू केली आहे. केंद्रीय कामगार (Labour Ministry) मंत्रालयाने म्हटले आहे की EPFOकडे येणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ही सुविधा देण्यात येणार आहे. ईपीएफओ, सीपीजीआरएएमएस (CPGRAMS), सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि ट्विटरचे ऑनलाइन तक्रारीचे रिझोल्यूशन पोर्टल (EPFIGMS Portal) हे 24 तास कार्यरत कॉलसेन्टर ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करतात.
कामगार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार EPFO आपल्या सदस्यांसाठी WhatsApp आधारित हेल्पलाइन आणि तक्रार निवारण यंत्रणा सुरू केली आहे. कोरोनाच्या काळात कोणत्याही प्रकारच्या व्यत्ययाशिवाय ग्राहकांना सेवा पुरवण्यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. आता EPFO च्या सर्व 138 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये WhatsApp हेल्पलाइन सेवा सुरू करण्यात आली आहे. कोणताही संबंधित पक्ष त्यांच्या पीएफ खात्याशी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाच्या हेल्पलाइन नंबरवर व्हॉट्सअॅप मेसेजवरून EPFO शी संबंधित सेवांबद्दल तक्रार करू शकतो.
वाचा-2020मध्ये भारताचा GDP उडवणार सर्वांची झोप, पण 2021मध्ये चीनला टाकणार मागे-IMF
असे आहेत नंबर
EPFOच्या अधिकृत वेबसाइटवरून प्रादेशिक कार्यालयाचे व्हॉट्सअॅप नंबर जारी करण्यात आले आहेत. या EPFO हेल्पलाईनचा हेतू डिजिटल प्लॅटफॉर्मचा अवलंब करून भागधारकांना आत्मनिर्भर बनविणे आहे. तक्रारींचे त्वरित निराकरण व्हावे आणि व्हाट्सएपद्वारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळावी यासाठी प्रत्येक प्रादेशिक कार्यालयात एक स्वतंत्र टीम तयार करण्यात आली आहे.
वाचा-सोन्यामध्ये गुंतवणूक करताना बँकेतून खरेदी करू नका सोन्याची नाणी, हे आहे कारण
वाचा-इथं मिळतायेत चिनी वस्तूंपेक्षाही स्वस्त वस्तू; दिवाळीसाठी घरबसल्याच द्या ऑर्डर
आतापर्यंत 1 लाखांहून अधिक तक्रारींचे निराकरण
ईपीएफओने आतापर्यंत 1,64,040 हून अधिक तक्रारींचे निराकरण केले आहे आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. व्हॉट्सअॅप हेल्पलाइन नंबर जाहीर झाल्यानंतर ट्विटर आणि फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तक्रारी किंवा प्रश्नांमध्ये 30 टक्के कपात झाली आहे. त्याचबरोबर ईपीएफआयजीएमएस पोर्टलवर 16 टक्के कमी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.