Employee Provident Fund : 25 हजार रुपयांच्या बेसिक पगारात मिळवा 1 कोटी रुपये

Employee Provident Fund : 25 हजार रुपयांच्या बेसिक पगारात मिळवा 1 कोटी रुपये

प्रत्येकालाच करोडपती होण्याची इच्छा असते पण तुमचा पगार कमी असेल तर हे शक्य होत नाही. असं असलं तरी मिळणाऱ्या पगारात बचत करून तुम्ही खरंच करोडपती होऊ शकता.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 डिसेंबर : प्रत्येकालाच करोडपती होण्याची इच्छा असते पण तुमचा पगार कमी असेल तर हे शक्य होत नाही. असं असलं तरी मिळणाऱ्या पगारात बचत करून तुम्ही खरंच करोडपती होऊ शकता. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच EPF मध्ये केलेल्या बचतीवर पूर्णपणे अवलंबून राहता येत नाही. यामध्ये मर्यादित स्वरूपात व्याज मिळतं. पण यावर एक उपाय आहे.

नोकरदारांसाठी बेसिक पगाराचा 12 टक्के भाग कर्मचारी भविष्य निर्वाह निधी EPF)मध्ये जातो. तेवढीच रक्कम कर्मचाऱ्यातर्फे जमा केली जाते. EPFO च्या नियमांनुसार कर्मचाऱ्यांचं योगदान 8. 33 टक्के असतं. हे 15 हजार रुपयांपर्यंत असू शकतं. बाकीची रक्कम प्रॉव्हिडंट फंडात जाते. याचा अर्थ, तुमचा बेसिक पगार 15 हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर EPS मध्ये प्रत्येक महिन्याला 1250 रुपये जमा होतील.

(हेही वाचा : GST रिटर्न्स भरले नाहीत तर बंद होईल बँक खातं, मालमत्ता जप्त होण्याचाही धोका)

एखाद्या कर्मचाऱ्याचा टेक होम पगार महिन्याला 60 हजार रुपये असेल आणि बेसिक पगार 40 टक्के असेल तर त्या हिशोबाने बेसिक पगार 25 हजार रुपये प्रति महिना होतो. कर्मचारी जर 25 वर्षं काम करून निवृत्त होणार असेल तर पीएफमध्ये एकूण बॅलन्स 50 लाख रुपये होईल.

1 कोटी रुपयांचं लक्ष्य ठेवलं तर 50 लाख रुपये कमी होतात. यासाठी कर्मचाऱ्याला 25 वर्षांसाठी इक्विटी म्युच्युअल फंड (Equity Mutual Fund)मध्ये गुंतवणूक करावी लागेल.

दरवर्षी 12 टक्के व्याज धरलं तर 25 वर्षांसाठी दर महिन्याला 2600 रुपये गुंतवणूक करावी लागेल. 25 वर्षं नोकरी पूर्ण केल्यानंतर 50-50 लाख रुपये SIP आणि PF मध्ये गुंतवले जाऊ शकतात. अशा प्रकारे तुम्ही करोडपती बनू शकता.

===========================================================================================

Published by: Arti Kulkarni
First published: December 27, 2019, 5:50 PM IST
Tags: Epfomoney

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading