कोरोनाच्या संकटात EPFO ने वाढवला डेथ इन्श्यूरन्स क्लेम, एकही पैसा न गुंतवता मिळेल एवढी रक्कम

कोरोनाच्या संकटात EPFO ने वाढवला डेथ इन्श्यूरन्स क्लेम, एकही पैसा न गुंतवता मिळेल एवढी रक्कम

कोरोनामुळे (Corona Virus) अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली असून, त्यामुळे अनेक संसार उघड्यावर आले आहेत. अशा कठीण काळात एम्प्लॉयीज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन अर्थात EPFO ने एम्प्लॉयी डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स अंतर्गत (EDLI) मिळणाऱ्या इन्शुरन्सच्या रकमेत वाढ केली आहे.

  • Share this:

मुंबई, 13 मे : कोरोनामुळे (Corona Virus) अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली असूनत्यामुळे अनेक संसार उघड्यावर आले आहेत. अशा कठीण काळात एम्प्लॉयीज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन अर्थात EPFO ने एम्प्लॉयी डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स अंतर्गत (EDLI) मिळणाऱ्या इन्शुरन्सच्या रकमेत वाढ केली आहेEPFOचा सदस्य असलेल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास EDLI योजनेअंतर्गत त्याच्या वारसांना आतापर्यंत सहा लाख रुपये मिळत होते. आता त्यात एक लाख रुपये वाढवून ही रक्कम सात लाख रुपये करण्यात आली आहे. तसंचयाची किमान मर्यादा दोन लाख रुपये होती. ती वाढवून अडीच लाख रुपये करण्यात आली आहे. 28एप्रिलपासून ही योजना लागू करण्यात आली आहे.

EDLI ही EPFOच्या तीन प्रमुख योजनांपैकी एक आहे. ही योजना 1976 मध्ये सुरू झाली होती. EPFOच्या तीन प्रमुख योजना आहेत. पहिली म्हणजे एम्प्लॉयी प्रॉव्हिडंट फंड(EPF), दुसरी एम्प्लॉयी पेन्शन स्कीम (EPS) आणि तिसरी म्हणजे एम्प्लॉयी डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स (EDLI)

नोकरी करणाऱ्या आणि EPFOचे सदस्य असलेल्या कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन आणि महागाई भत्ता या रकमेच्या 12टक्के रक्कम EPF साठी वळती होते. त्यात कर्मचाऱ्याच्या कंपनीकडून मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या 3.67 टक्के रक्कम जमा केली जाते. EPSसाठी कर्मचाऱ्याला वेगळ्या योगदानाची गरज नसते. त्या फंडासाठी एम्प्लॉयर अर्थात कंपनी 8.33 टक्के योगदान करते. EDLI योजनेसाठीही एम्प्लॉयरच पीएफ वेजच्या 0.50 टक्के मासिक योगदान करतो, ते 75 रुपये असतं.

पात्रता

EPF चे सर्व सदस्य EDLI योजनेसाठी पात्र असतात. जोपर्यंत कर्मचारी कामावर आहेम्हणजेच त्याचा पीएफ कट होतोयतोपर्यंत त्याला या योजनेचा फायदा मिळू शकतो. यासाठी 12महिने सेवेची अटही नाही. 12महिन्यांपेक्षा कमी सेवाकाळ असेलतर मिळणारा लाभ कमी असतो. ही इन्शुरन्स योजना संपूर्ण कव्हरेज देते. म्हणजेच कोरोना,अपघात किंवा आजारपण अशा कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाला,तरी या इन्शुरन्सचा लाभ वारसांना मिळतो.

ईपीएफच्या सदस्याने नॉमिनी (Nominee) म्हणून ज्याचं नाव दिलं असेलत्याला त्या सदस्याच्या मृत्यूनंतर इन्शुरन्सची रक्कम मिळेल. नॉमिनेशन नोंदवलेलं नसेलतर ते काम ऑनलाइन करता येतं. एखाद्या व्यक्तीने नॉमिनीचं नाव लिहिलं नसेलतर त्याच्या कायदेशीर वारसाला ही रक्कम मिळतेमात्र ती प्रक्रिया तितकी सोपी राहत नाही.

इन्शुरन्स क्लेम करण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली म्हणजे ऑनलाइन आणि दुसरी ऑफलाइन, ज्यांचे नॉमिनी डिटेल्स पूर्णतः दिलेले असतीलत्यांच्या बाबतीत इन्शुरन्स क्लेम ऑनलाइनही करता येतो. त्यासाठी UAN पोर्टलवर जाऊन डेथ क्लेम (Death Claim)पर्याय निवडावा लागतो. तिथे जाऊन पुढची सगळी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत सेटलमेंटची रक्कम नॉमिनीला मिळते. या प्रक्रियेला काही कारणाने त्याहून उशीर झालातर त्या रकमेवर त्या काळासाठी 12टक्के व्याजही मिळतं.

First published: May 13, 2021, 9:22 AM IST

ताज्या बातम्या