Home /News /money /

घरबसल्या Active करा UAN नंबर आणि सोप्या पद्धतीने मिळवा EPFOची माहिती

घरबसल्या Active करा UAN नंबर आणि सोप्या पद्धतीने मिळवा EPFOची माहिती

UAN नंबर आणि पासवर्ड अपलोड करून तुमच्या EPFO खात्याशी संबंधीत माहिती घरबसल्या मिळवू शकता.

    मुंबई, 02 फेब्रुवारी: तुम्ही नोकरी करत असाल तर पीएफचं खातं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. बऱ्याचवेळा आपण याकडे दुर्लक्ष करत असतो. आपल्या पगारातील काही ठरावीक रक्कम कापून EPFOसाठी जमा होत असते. ही रक्कम आपल्याला काढायची असेल किंवा पाहायची असेल तर कशी पाहणार? यासाठी तुमचं खातं किंवा कंपनीकडून तुम्हाला एक नंबर दिला जातो. त्याला UAN नंबर असं म्हणतात. या नंबरच्या सहाय्यानं तुम्ही तुमचं EPFO अकाऊंट ऑनलाइन स्वरूपात पडताळू शकता. या UAN नंबरचा फायदा काय आहे आणि कशा पद्धतीनं तुम्ही घरातून आपलं EPFO खातं चालवू शकता जाणून घ्या. UAN नंबरचे फायदे UAN नंबरच्या सहाय्यानं आपल्या खात्यातील सगळी माहिती तुम्ही घेऊ शकता. एकापेक्षा जास्त EPFO खाती असतील तर आपण आपल्या सर्व खात्यांचे तपशील एकाच ठिकाणी पाहण्यासाठी UAN नंबरचा वापर करू शकता. UAN नंबर आणि पासवर्ड अपलोड करून तुम्ही पासबुक तपासू शकता. आपल्या खात्यातून आपण UAN मार्फत काही पैसे काढूही शकता. तर एका खात्यातून तुमच्या दुसऱ्या EPFO खात्यात पैसे अगदी सहज ट्रान्सफर होऊ शकतात. हेही वाचा-तुम्हाला किती कर द्यावा लागेल? Tax Calculator वापरून काढा कराची रक्कम आता UAN नंबर कसा Activate कराल? आपल्या पगारातून जर EPFO कापून घेतला जात असेल तर आपलं EPFO अकाऊंट हे कंपनीकडून काढलं गेलं आहे. आपल्याला सॅलरी स्लीपवर एक UAN नंबर येतो. या नंबरसाठी सर्वात प्रथम तुम्हाला www.epfindia.gov.in या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या. त्यानंतर Our Services मध्ये For Employees पर्याय निवडा. त्यानंतर UAN/ Online Services पर्यायावर क्लिक करा. तिथे तुम्हाला UAN नंबर अपलोड करून आधी पासवर्ड क्रिएट करावा लागेल. तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला संस्थेकडून एका पासवर्ड येईल. हा पासवर्ड अपलोड करून तुमचा UAN नंबर सुरू करू शकता. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही पासवर्ड बदलून घ्या. हा पासवर्ड कोणालाही सांगू नये. तो गुप्त असावा. UAN नंबर आणि पासवर्ड अपलोड करून तुमच्या EPFO खात्याशी संबंधीत माहिती घरबसल्या मिळवू शकता. हेही वाचा-IT दिलासा सरसकट नाही; नवीन टॅक्स स्लॅबसाठी सोडाव्या लागणार 70 सवलती
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या