मराठी बातम्या /बातम्या /मनी /

नोकरी सोडल्यानंतर काढायला हवे EPF मधील पैसे? नाही काढल्यास नुकसान होणार का, जाणून घ्या सविस्तर

नोकरी सोडल्यानंतर काढायला हवे EPF मधील पैसे? नाही काढल्यास नुकसान होणार का, जाणून घ्या सविस्तर

 नोकरी सोडल्यानंतर, जर तुम्ही तुमच्या EPF खात्यामध्ये कोणताही व्यवहार केला नाही, तर ते ठराविक काळासाठीच सक्रिय राहते. शिवाय त्यावर मिळणारे व्याज देखील करपात्र उत्पन्नात रूपांतरित होते.

नोकरी सोडल्यानंतर, जर तुम्ही तुमच्या EPF खात्यामध्ये कोणताही व्यवहार केला नाही, तर ते ठराविक काळासाठीच सक्रिय राहते. शिवाय त्यावर मिळणारे व्याज देखील करपात्र उत्पन्नात रूपांतरित होते.

नोकरी सोडल्यानंतर, जर तुम्ही तुमच्या EPF खात्यामध्ये कोणताही व्यवहार केला नाही, तर ते ठराविक काळासाठीच सक्रिय राहते. शिवाय त्यावर मिळणारे व्याज देखील करपात्र उत्पन्नात रूपांतरित होते.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर: कोरोना काळात सामान्यांच्या (Job loss during coronavirus pandemic) नोकऱ्यांवर विशेष परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. अनेकांना नोकरी सोडावी लागली किंवा बदलावी लागली. खाजगी क्षेत्रात काम करणारे अनेक लोक अनेकदा नोकरीत बदल करत असतात. सध्याच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून त्यांना दुसरी कोणतीही नोकरी मिळू शकलेली नाही. काही लोक निवृत्तीच्या वेळेपूर्वी नोकरी सोडतात. अशा कोणत्याही परिस्थितीत तुम्ही तुमच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीबाबत (EPF) निष्काळजीपणा करू नये, अन्यथा तुम्हाला दुहेरी तोटा सहन करावा लागू शकतो. नोकरी सोडल्यानंतर, जर तुम्ही तुमच्या EPF खात्यामध्ये कोणताही व्यवहार केला नाही, तर ते ठराविक काळासाठीच सक्रिय राहते. शिवाय त्यावर मिळणारे व्याज देखील करपात्र उत्पन्नात रूपांतरित होते.

निष्क्रिय पीएफ खात्यावर कधीपर्यंत मिळेल व्याज?

नोकरी सोडल्यानंतर अनेकांना असं वाटतं की त्यांच्या पीएफ खात्यातील जमा रकमेवर व्याज मिळत राहील आणि तो फंड वाढत राहील. पण हे जाणून घेणं आवश्यक आहे की, असे केवळ निश्चित काळासाठीच होते. नोकरी सोडल्यानंतर सुरुवातीच्या 36 महिन्यांपर्यंत कोणतेही योगदान जमा न झाल्यास ईपीएफ खाते निष्क्रिय होते. अशावेळी खाते सक्रीय ठेवण्यासाठी काही रक्कम 3 वर्ष पूर्ण होण्याच्या आधी काढायला हवी.

हे वाचा-Digital Gold बाबत मोठ्या निर्णयाच्या विचारात सरकार, SEBI आणि RBI आखत आहेत योजना

पीएफ खाते कधीपर्यंत निष्क्रिय होणार नाही?

सध्याच्या नियमांनुसार, जर कर्मचारी वयाच्या 55 व्या वर्षी निवृत्त झाला आणि 36 महिन्यांच्या आत ठेव काढण्यासाठी अर्ज केला नाही, तर पीएफ खाते निष्क्रिय होईल. सोप्या शब्दात सांगायचे तर, कंपनी सोडल्यानंतरही, पीएफ खात्यावर व्याज जमा होत राहील आणि वयाच्या 55 ​​वर्षापर्यंत ते निष्क्रिय होणार नाही.

PF रकमेवर मिळणाऱ्या व्याजावर केव्हा लागणार कर?

नियमांनुसार, EPF मध्ये कॉन्ट्रिब्युशन न झाल्यास पीएफ खाते निष्क्रिय होत नाही. मात्र, या कालावधीत मिळणाऱ्या व्याजावर कर आकारला जातो. 7 वर्षे निष्क्रिय राहूनही पीएफ खात्यावर दावा केला गेला नाही, तर ही रक्कम ज्येष्ठ नागरिक कल्याण निधी (SCWF) मध्ये जाते. EPF आणि MP कायदा, 1952 च्या कलम-17 द्वारे सूट मिळालेले ट्रस्ट देखील ज्येष्ठ नागरिक कल्याण निधीच्या नियमांच्या कक्षेत येतात. त्यांना खात्यातील रक्कमही कल्याण निधीमध्ये हस्तांतरित करावी लागेल.

हे वाचा-इंधनाचे लेटेस्ट दर जारी, आज 1 लीटर पेट्रोल-डिझेलसाठी किती रुपये मोजावे लागणार?

दरम्यान पीएफ खात्यातून ट्रान्सफर केलेली कुणीही क्लेम न केलेली रक्कम 25 वर्षांपर्यंत ज्येष्ठ नागरिक कल्याण निधीमध्ये राहते. या दरम्यान पीएफ खातेधारक रकमेसाठी क्लेम करू शकतो. खरतर जुन्या कंपनीकडे तुमच्या पीएफची रक्कम सोडण्याचा काहीच फायदा नाही आहे. दरम्यान नोकरी करत नसलेल्या काळात या रकमेवर मिळणाऱ्या व्याजावर टॅक्स आकारला जातो. जर तुम्ही 55व्या वर्षी निवृत्त होत आहात तर तोपर्यंत तुमचे खाते निष्क्रिय होऊन देऊ नका. अंतिम बॅलन्स लवकरात लवकर काढून घ्या. वयाच्या 55 ​​वर्षापर्यंत पीएफ खाते निष्क्रिय होणार नाही. तरीही, जुन्या संस्थेतून नवीन संस्थेत पीएफ शिल्लक हस्तांतरित करणे चांगले आहे. यामुळे निवृत्तीनंतर चांगली रक्कम जमा होईल.

--

First published:

Tags: Epfo news, Pf, PF Amount, Pf news, PF Withdrawal