नवी दिल्ली, 01 ऑगस्ट : देशामध्ये कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. अशावेळी नोकदार वर्गाला दिलासा देण्यासाठी दिलासा देण्यासाठी सरकारने ईपीएफ योगदान 24 टक्क्यांवरून 20 टक्के केले होते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी अशी घोषणा केली होती की- मे, जून आणि जुलै महिन्यात कर्मचाऱ्यांच्या पगारातून केवळ 10 टक्के पीएफची रक्कम कापली जाईल आणि कंपनीचे योगदान देखील 10 टक्के करण्यात आले होते. मात्र आजपासून नोकदरार वर्गाचा इन हँड पगार कमी होणार आहे.
काय आहे नियम?
EPF योजनेच्या नियमानुसार कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी आणि डीएच्या 12 टक्के योगदान ईपीएफ खात्यामध्ये द्यावे लागतात. त्याचप्रमाणे त्या कर्मचाऱ्याच्या कंपनीकडूनही या खात्यामध्ये 12 टक्के योगदान दिले जाते. म्हणजेच दर महिन्याला 24 टक्के ईपीएफ खात्यामध्ये जमा होतात. या 24 टक्के योगदानापैकी कर्मचाऱ्याचा हिस्सा (12 टक्के) आणि कंपनीचा 3.67 टक्के हिस्सा EPF खात्यामध्ये जमा होतो. तर कंपनीचा बाकी 8.33 टक्के हिस्सा कर्मचारी पेन्शन योजनेमध्ये (Employees Pension Sceme EPS) मध्ये जमा होतो.
तुमच्या खात्यामध्ये किती पीएफ जमा झाला आहे ते असे तपासा
ईपीएफ बॅलेन्स 4 मार्गांनी तपासता येईल. EPFO अॅपच्या माध्यमातून, Umang अॅपच्या माध्यमातून, एसएमएस (SMS) च्या माध्यमातून आणि मिस्ड कॉलच्या माध्यमातून ईपीएफ बॅलेन्स तुम्हाला तपासता येईल.
(हे वाचा-सोन्याचे भाव लवकरच 56 हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता)
1. ईपीएफओ अॅप- ईपीएफओ अॅप ‘m-EPF’ डाऊनलोड करा. ते उघडल्यानंतर 'Member' वर क्लिक करा. त्यानंतर “Balance/Passbook” ची लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा. याठिकाणी तुमचा UAN क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाइल नंबर टाकून तुम्ही ईपीएफमध्ये जमा असणारी रक्कम तपासू शकता.
2. UMANG अॅप- या App च्या माध्यमातून तुमच्या ईपीएफ खात्यातील रक्कम तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाइल नंबरवरून वन टाइम रजिस्ट्रेशन करावे लागेल. यानंतर तुम्ही 'उमंग'मध्ये तुमचे ईपीएफ पासबुक पाहू शकता. त्याचप्रमाणे क्लेम देखील करू शकता आणि केलेला क्लेम ट्रॅक देखील करू शकता.
(हे वाचा-ऑगस्टमध्ये 17 दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्ट्यांची यादी)
3. SMS- एसएमएसच्या माध्यमातून तुमच्या पीएफ खात्यातील रक्कम तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 7738299899 या नंबरवर मेसेज करावा लागेल. EPFOHO UAN ENG असे लिहून तुम्हाला हा मेसेज करावा लागेल. ENG म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये तुम्हाला माहिती मिळेल. परंतू तुम्हाला अन्य कोणत्या भाषेत माहिती हवी असेल तर ENG ऐवजी तुम्हाला हव्या असलेल्या भाषेची पहिली तीन अक्षरं तुम्हाला टाकावी लागतील. हिंदी, पंजाबी, गुजराती, मराठी, कन्नड, तेलुगु, तमिळ, मलयाळम आणि बंगाली भाषेमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. या क्रमांकावर मेसेज करण्यासाठी ईपीएफओ मध्ये तुमचा नंबर रजिस्टर्ड असणे अनिवार्य आहे.
(हे वाचा-कोट्यवधी ग्राहकांना SBI चा इशारा! दुर्लक्ष केल्यास रिकामे होईल तुमचे बँक खाते)
4. मिस्ड कॉल- Missed Call च्या माध्यमातून ईपीएफ रक्कम तपासण्यासाठी तुमचा मोबाइल नंबर UAN बरोबर रजिस्टर्ड असणे गरजेचे आहे. तुम्हाला रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 011-22901406 यावर मिस्ड कॉल करावा लागेल. यानंतर तुम्हाला मेसेजच्या माध्यमातून तुमच्या खात्यातील रकमेची माहिती मिळेल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.