EPFO : नोकरी बदलताय? मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट

EPFO : नोकरी बदलताय? मग स्वतःच अपडेट करा तुमच्या PF खात्यात एग्झिट डेट

तुम्ही नोकरी (Job) बदलणार असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 7 मे : तुम्ही नोकरी (Job) बदलणार असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता तुम्ही तुमच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात अर्थात ईपीएफओमध्ये(Employee Provident Fund Organization -EPFO)नोकरी सोडण्याची तारीख देखील (Date Of Exit) स्वतःच घरबसल्या अपडेट करू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही. ईपीएफओनं हे काम आता खूपच सोपं केलं आहे.

ईपीएफओनं एका ट्वीटद्वारे (Twitt) ही माहिती दिली आहे. ‘आता कर्मचारी घरी बसूनही आपली नोकरी सोडण्याची तारीख आपल्या खात्यात अपडेट करू शकतात. काही टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल,असं ईपीएफओनं या ट्विटमध्ये म्हटलं आहे. हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेतही माहिती देण्यात आली आहे.

हे ही वाचा-या सरकारी बँकेत तुमचं खातं आहे का? या चुकीमुळे होईल तुमचं अकाउंट रिकामं!

ही प्रक्रिया पूर्ण करा :

-प्रथम युनिफाइड मेंबर्स पोर्टलवर जाऊन यूएएन (UAN) आणि पासवर्डसह लॉग इन करा.

-यानंतर मॅनेजवर (Manage) जा आणि तेथील मार्क एक्झिटवर (Mark Exit) क्लिक करा.

- आता सिलेक्ट एम्प्लॉयमेंटमधून (Select Employment) पीएफ अकाउंट नंबर (PF Account Number) निवडा.

-यानंतर, नोकरी सोडण्याची तारीख (Date of Exit) आणि कारण (Reason of Exit) लिहा.

- नंतर रिक्वेस्ट ओटीपीवर (Request OTP) क्लिक करा आणि आधारशी जोडलेल्या मोबाइल नंबरवर आलेला ओटीपी इथं भरा. इथं तुम्हाला चेक बॉक्स निवडावा लागेल.

- आता ‘अपडेट’वर (Update) क्लिक करा.

-शेवटी ‘ओके’ वर(OK)क्लिक करा. याबरोबरच तुमची डेट ऑफ एक्झिट म्हणजेचनोकरी सोडण्याची तारीखयशस्वीरित्याअपडेट झाली.

मिस्ड कॉलद्वारे जाणून घ्या खात्यातील शिल्लक:

तुम्हाला तुमच्या खात्यात किती शिल्लक(Balance)आहे हे जाणून घ्यायचे असेल तर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर एक मिस्ड कॉल द्या. त्यानंतर तुम्हाला ईपीएफओकडून तुमच्या खात्यातील शिलकीबाबतचा तपशील देणारा मेसेज मिळेल. मात्र यासाठी बँक खाते, पॅन आणि आधारशी जोडलेलं असणं आवश्यक आहे. या सेवेसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

ईपीएफओनं फेब्रुवारीमध्ये 12.37 लाख नवीन ग्राहक जोडले:

नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या अहवालानुसार, फेब्रुवारी महिन्यात ईपीएफओमध्ये 12.37 लाख नवीन ग्राहक जोडले गेले आहेत. जानेवारी 2021 मध्ये ही संख्या 11.95 लाख होती. सप्टेंबर 2017 ते फेब्रुवारी 2021 दरम्यान सुमारे 4.11 कोटी नवीन ग्राहक ईपीएफओ योजनेत सहभागी झाले आहेत.

First published: May 9, 2021, 10:25 PM IST

ताज्या बातम्या