EPFO नं बदलला PF मधून पैसे काढण्याचा नियम, 'या' आहेत नव्या अटी

epfo, pf - तुम्हाला तुमच्या PF मधून पैसे काढायचे असतील तर नवे नियम पाहा

News18 Lokmat | Updated On: Aug 5, 2019 12:16 PM IST

EPFO नं बदलला PF मधून पैसे काढण्याचा नियम, 'या' आहेत नव्या अटी

मुंबई, 05 ऑगस्ट : नोकरदारवर्गासाठी एम्प्लाॅयमेंट प्राॅव्हिडंट फंड काढणं आता एकदम सोपं झालंय. पीएफ निवृत्ती प्लॅनसाठी आहे. त्यात गुंतवणूक करण्याचा फायदा पुढच्या काळासाठी मिळू शकतो. सुरुवातीला लोक नोकरी बदलताना पीएफ ट्रान्सफर करायचे. पण आता ईपीएफओच्या रेकाॅर्डप्रमाणे पीएफ काढण्यासाठी जास्त अर्ज आलेले दिसतात. काही दिवसांपूर्वी EPFOच्या नियमात बदल केले गेलेत. आता तुम्ही ऑफलाइन पीएफ काढू शकत नाही. त्यासाठी एक अटही आहे.

हे झालेत नवे बदल

1. तुमचा आधार नंबर EPFOच्या युनिव्हर्सल अकाउंट नंबर ( UAN )शी लिंक असेल तर तुम्ही प्राॅव्हिडंट फंड म्हणजे PF ऑफलाइन काढू शकणार नाही.

पेट्रोलच्या किमतीत घसरण, 'हे' आहेत आजचे भाव

2. म्हणजे आता तुम्ही PF ऑनलाइन काढू शकता. रिजनल कमिशन एन. के. सिंह यांच्या मते ईपीएफओनं फिल्ड ऑफिसमध्ये ऑफलाइन क्लेमची गर्दी वाढली. म्हणून हा निर्णय घेतलाय.

Loading...

3. EPFO नं प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय की PF सदस्य फाॅर्म भरून PF क्लेम करत होते. त्यानं ऑफिसवर ओझं वाढत होतं.

4. यामुळे PF मिळायला उशीर व्हायचा. त्यामुळे आता ऑफलाइन क्लेम स्वीकारला जाणार नाही. कंपन्यांना ऑनलाइनचाच वापर करण्याचा सल्ला दिला गेलाय.

ITR मध्ये 'या' मिळकतीची उल्लेख करायलाच हवा, नाही तर भरावा लागेल मोठा दंड

5. या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय की सदस्यांनी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही क्लेम केलं तर फक्त ऑनलाइन क्लेमच स्वीकारला जाईल.

6. असा करा ऑनलाइन क्लेम - यासाठी http://www.epfindia.com/site_en/ वर जावं लागेल. तिथे तुम्हाला ऑनलाइन क्लेमचा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केलं तर https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ ही लिंक ओपन होईल.

'या' नोकरीत मिळणार सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पगार, 'असा' करा अर्ज

7. इथे तुम्हाला युएन नंबर आणि पासवर्ड टाकावा लागेल. मग सबमिटचा पर्याय मिळेल. त्यानंतर विथड्राॅअल फाॅर्म कंपनीत द्यावा लागणार नाही.

8. ऑनलाइन क्लेम झाल्यानंतर फिल्ड ऑफिसर त्या क्लेमला व्हेरिफाय करेल. त्यासाठी तुम्हाला युनिफाइड पोर्टलवर केवायसी पूर्ण करावी लागेल.

VIDEO: भर रस्त्यात गजराज रमले, गाडीला धक्का दिल्यानंतर प्रवाशांची घाबरगुंडी!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: EpfoPf
First Published: Aug 5, 2019 12:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...