कर्मचाऱ्यांसाठी EPFO कडून अलर्ट! या ऑफर्सपासून सावध राहा, अन्यथा रिकामा होईल खिसा

कर्मचाऱ्यांसाठी EPFO कडून अलर्ट! या ऑफर्सपासून सावध राहा, अन्यथा रिकामा होईल खिसा

कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ही काळजी घेतली नाही तर आपलं EPFO खातं रिकामं होऊ शकतं

  • Share this:

मुंबई, 17 फेब्रुवारी: कर्मचारी भविष्य निधि संगठन निधी अर्थात EPFO धारक कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आपल्या पगारातून EPFO कापला जात असेल तर आपण ही बातमी वाचणं महत्त्वाचं आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून फसवणूक करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून हॅकर्स आणि लफंगे आपल्या पैशांवर डोळा ठेवून असतात. त्यांच्यापासून सावध राहाणं आणि आपल्या कमाईचा पैसा सुरक्षित ठेवणं आपल्या हातात आहे. EPFO कंपनीकडून कर्मचाऱ्यांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. वेसाईट, टेली कॉल्स, SMS, इ-मेल, सोशल मीडियावरून येणाऱ्या फेक ऑफर्स आणि कॉल्सपासून सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तुम्हाला अशा पद्धतीनं संपर्क साधून बँकेत पैसे जमा करण्यास सांगत असेल तर सतर्क राहा. आपली कोणतीही माहिती अशा फोन कॉल्स, SMSसाठी देऊ नका.

EPFO कंपनीच्या म्हणण्यानुसार एक खोट्या अॅपची लिंक कर्मचाऱ्यांना पाठवली जात आहे. याशिवाय क्लेम सेटलमेंट, ज्यादा पेन्शन किंवा इतर ऑफर्सच्या बहाण्यानं कर्मचाऱ्यांना आधी पैसे भरायला सांगत आहेत आणि त्यानंतर त्याच्या खात्यातून पैसे उकळले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोणतीही माहिती शेअर करताना सावध राहण्याचा इशारा कंपनीकडून देण्यात आला आहे.

चुकूनही ही माहिती देऊ नका

तुम्ही अशा प्रकारचे फोन उचलले किंवा वेबसाईटला भेट दिली तर आपला पॅन नंबर, आधार कार्ड नंबर, OTP, पासवर्ड, अकाऊंट नंबर कुणालाही शेअर करू नका. त्यामुळे हॅकर्सला आपल्या आकऊंटची संपूर्ण माहिती मिळू शकते. आपली एक चूक आपलं सगळं अकाऊंट रिकामं करू शकते.

असं घडल्यास तक्रार कुठे कराल?

अशा प्रकारच्या घटनांमध्ये संशयित आरोपीविरोधात आपण Ministry of Labour and Employmentकडे तक्रार दाखल करू शकता. सोशल मीडियावर किंवा त्यांच्या वेबसाईटवर जाऊन तिथे तक्रार ऑनलाई स्वरुपात दाखल करता येणार आहे. अन्यथा 1800118005 या टोल फ्री नंबरवर तक्रार दाखल करू शकता. हा नंबर कर्मचाऱ्यांसाठी 24 तास सुरू असतो. त्यामुळे इथे आपल्या तक्रारीची नोंद घेतली जाईल.

तीन सेकंदात जाणून घ्या आपल्या EPFO खात्यातील रक्कम

011-22901406 या क्रमांकावर मिस कॉल देऊन आपण आपल्या EPFO खात्यावरील रकमेविषयी माहिती मिळवू शकता.

हेही वाचा-'या' बँकांमध्ये बचत खातं असल्यास होणार फायदा, 7 टक्क्यांपर्यंत मिळणार व्याज

हेही वाचा-9 महिन्यात 18 सरकारी बँकांना फसवणुकीने बुडवलं, 1.17 लाख कोटींचा दणका

First published: February 17, 2020, 10:19 AM IST

ताज्या बातम्या