या महिन्याच्या अखेरपर्यंत 6 कोटी लोकांच्या PF खात्यात येतील पैसे, असा तपासा तुमचा बॅलन्स

या महिन्याच्या अखेरपर्यंत 6 कोटी लोकांच्या PF खात्यात येतील पैसे, असा तपासा तुमचा बॅलन्स

8.5 टक्के व्याज दोन हप्त्यांमध्ये - 8.15 टक्के आणि 0.35 टक्के अशाप्रकारे खात्यांमध्ये पाठवण्यात येणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 डिसेंबर: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आर्थिक वर्ष 2019-20 साठी सहा कोटी कर्मचाऱ्यांच्या EPF खात्यामध्ये डिसेंबर अखेरपर्यंत एकरकमी 8.5 टक्के व्याज पाठवण्यात येईल. देशभरातील कर्मचाऱ्यांसाठी EPFO चा हा निर्णय आनंदाची बातमी आहे. याआधी सप्टेंबर महिन्यात कामगार मंत्री संतोष गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत EPFO ने 8.5 टक्के व्याज दोन हप्त्यांमध्ये - 8.15 टक्के आणि 0.35 टक्के अशाप्रकारे खात्यांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला होता.

पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की कामगार मंत्रालयाने अर्थमंत्रालयाला 2019-20 साठी एकरकमी 8.5 टक्के व्याज ईपीएफमध्ये पाठवण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. हा प्रस्ताव या महिन्यात पाठवला गेला आहे. अशा परिस्थितीत या महिन्यात भागधारकांच्या खात्यात व्याज जमा केले जाईल. यापूर्वी अर्थ मंत्रालयाने गेल्या आर्थिक वर्षाच्या व्याजावर काही स्पष्टीकरण मागितले होते, असेही सूत्रांनी सांगितले. हे स्पष्टीकरण वित्त मंत्रालयाला देण्यात आले आहे.

(हे वाचा-भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगली बातमी!GDP ग्रोथ रेटमध्ये वाढ होण्याचा SBIचा अंदाज)

कामगार मंत्री गंगवार यांच्या नेतृत्वात असलेल्या ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (सीबीटी) बैठकीत 2019-20 साठीच्या ईपीएफवरील 8.5 टक्के व्याजदरास मान्यता देण्यात आली. मार्चमध्ये सीबीटीच्या बैठकीत 8.5 टक्के व्याज देण्याची वचनबद्धता पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु सीबीटीने असे ठरविले होते की भागधारकांच्या खात्यात 8.5 टक्के व्याज दोन हप्त्यांमध्ये जमा केले जाईल-8.15 टक्के आणि 0.35 टक्के.

मिसकॉल देऊन तपासता येईल तुमचा PF बॅलन्स

यूएएन पोर्टलवर नोंदणीकृत सदस्यांना मिस्ड कॉल देऊन त्यांच्या खात्यातील शिल्लक जाणून घेता येईल. आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर एक मिस कॉल करावा लागेल. यानंतर पीएफचा तपशील तुम्हाला ईपीएफओच्या मेसेजद्वारे प्राप्त होईल. दोन रिंगनंतर हा कॉल स्वयंचलितपणे डिस्कनेक्ट होईल. या सेवेसाठी कोणतेही पैसे आकारले जाणार नाहीत. ईपीएफओ UAN सेवा प्रदान करते, ज्याद्वारे खातेदार त्यांच्या पीएफ खात्यातील शिल्लक पाहू शकतात. हे खाते देखील बँक खात्यासारखे असत. आपला यूएएन नंबर सक्रीय करण्यासाठी आपण https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface या लिंकवर क्लिक करू शकता.

Published by: Janhavi Bhatkar
First published: December 17, 2020, 9:14 AM IST

ताज्या बातम्या