मराठी बातम्या /बातम्या /मनी /

EPFO Nomination: EPF मध्ये नॉमिनेशन नसले तरीही करता येतो क्लेम, जाणून घ्या काय आहे प्रोसेस

EPFO Nomination: EPF मध्ये नॉमिनेशन नसले तरीही करता येतो क्लेम, जाणून घ्या काय आहे प्रोसेस

ईपीएफ योजनेत याबाबत स्पष्ट नियम आहे. यानुसार जर ग्राहकाने नॉमिनेशन केले नसेल आणि त्याचा मृत्यू झाला तर, पीएफमध्ये जमा केलेले पैसे कुटुंबातील सदस्यांमध्ये समान प्रमाणात विभागले जातील.

ईपीएफ योजनेत याबाबत स्पष्ट नियम आहे. यानुसार जर ग्राहकाने नॉमिनेशन केले नसेल आणि त्याचा मृत्यू झाला तर, पीएफमध्ये जमा केलेले पैसे कुटुंबातील सदस्यांमध्ये समान प्रमाणात विभागले जातील.

ईपीएफ योजनेत याबाबत स्पष्ट नियम आहे. यानुसार जर ग्राहकाने नॉमिनेशन केले नसेल आणि त्याचा मृत्यू झाला तर, पीएफमध्ये जमा केलेले पैसे कुटुंबातील सदस्यांमध्ये समान प्रमाणात विभागले जातील.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 11 एप्रिल : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) खातेधारकाच्या नॉमिनेशनसाठी आग्रही आहे. यामुळे खातेदाराचा मृत्यू झाल्यास, नॉमिनीला पैसे मिळण्यास कोणतीही अडचण येत नाही. म्हणूनच ईपीएफ सदस्यांसाठी नॉमिनेशन करणे फायदेशीर आहे. मात्र, जर सदस्याचा नॉमिनेशन शिवाय मृत्यू झाला, तर जवळचे नातेवाईक (पत्नी/पती, मुलगा, मुलगी इ.) पीएफ पैशावर क्लेम करू शकतात. याबाबत अधिक माहिती घेऊयात.

ईपीएफ योजनेत याबाबत स्पष्ट नियम आहे. यानुसार जर ग्राहकाने नॉमिनेशन केले नसेल आणि त्याचा मृत्यू झाला तर, पीएफमध्ये जमा केलेले पैसे कुटुंबातील सदस्यांमध्ये समान प्रमाणात विभागले जातील. येथे प्रश्न असा आहे की, कुटुंबातील सदस्यांमध्ये कोणाचा समावेश आहे? कुटुंब सदस्यामध्ये पती/पत्नी, मुले (विवाहित किंवा अविवाहित), आश्रित पालक, सदस्य महिला असल्यास तिच्या पतीचे आश्रित पालक यांचा समावेश होतो. याशिवाय वर्गणीदाराच्या मुलाची विधवा पत्नी व तिची मुलेही कुटुंबात येतात.

कुटुंबातील सदस्यांना फॉर्म 20 भरावा लागेल

ग्राहकाच्या कुटुंबातील सदस्यांना कुटुंबातील सदस्यांच्या यादीसह फॉर्म 20 भरावा लागेल. कुटुंबातील सदस्यांची माहिती ज्या कंपनीत व्यक्ती नोकरीला होता त्या कंपनीद्वारे प्रदान केली जाईल. जर कोणत्याही कारणास्तव कंपनी ही माहिती देऊ शकत नसेल किंवा कंपनी बंद असेल, तर कार्यकारी दंडाधिकार्‍यांनी प्रमाणित केलेली ही यादी दिली जाऊ शकते. मृत्यू प्रमाणपत्राची प्रत आणि रद्द केलेला धनादेश (कॅन्सल चेक) देखील फॉर्म 20 सोबत जोडावा लागेल.

Electric Card: साडेचार लाखांची इलेक्ट्रिक कार; पाच रुपयात धावते 60 किमी

क्लेम 30 दिवसांच्या आत निकाली निघतो

ईपीएफओकडे फॉर्म 20 जितक्या लवकर सबमिट केला जाईल तितक्या लवकर ते पूर्ण केले जाईल. साधारणपणे, EPF कमिशनर फॉर्मसह सर्व आवश्यक कागदपत्रे मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत क्लेम निकाली काढतात. त्यामुळे कुटुंबातील सदस्याने हक्क सांगण्यास उशीर करू नये.

खाजगी ट्रस्टमध्ये तुमचे खाते असले तरी कोणतीही अडचण येणार नाही

ग्राहकांचे पीएफ खाते EPFO ​​ऐवजी खाजगी ट्रस्टकडे असले तरी या प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही. खाजगी ट्रस्टचे क्लेम लवकरच निकाली निघणे अपेक्षित आहे. याचे कारण कंपनीकडे ग्राहक आणि त्याच्या कुटुंबाची माहिती आधीपासूनच आहे.

Mutual Fund: महिन्याला फक्त 1000 रुपयांची गुंतवणूक तुम्हाला बनवेल करोडपती! संपूर्ण कॅलक्युलेशन समजून घ्या

इच्छापत्राच्या बाबतीत प्रक्रियेत विलंब होऊ शकतो

जर ग्राहकाने इच्छापत्र केले असेल, तर प्रक्रियेस थोडा वेळ लागू शकतो. कारण मृत्यूपत्राच्या दावेदारांना इच्छापत्राचे उत्तराधिकार प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले जाते. भविष्यात असा क्लेम कुणी करू नये यासाठी खबरदारी म्हणून हे केले आहे.

First published:

Tags: Epfo news, Investment, Money, Pf news