Home /News /money /

पहिली गाडी घ्यायचं स्वप्न बघत असाल तर महत्त्वाची बातमी; Entry Level Car मिळणं अवघड होणार

पहिली गाडी घ्यायचं स्वप्न बघत असाल तर महत्त्वाची बातमी; Entry Level Car मिळणं अवघड होणार

मध्यमवर्गीयांचं कारचं स्वप्न पूर्ण होणं थोडं अवघड असणार आहे. मारुतीचे चेअरमन भार्गव यांनी Entry Level Car market घटलं असल्याचं सांगत छोट्या आणि स्वस्त गाड्या बनवण्यास उत्पादक उत्सुक नसल्याचं स्पष्ट केलं आहे. भारतीय कार मार्केटमधून स्वस्त गाड्यांचे पर्याय कमी होण्यामागे काय आहेत कारणं?

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 20 मे : जर तुम्ही एंट्री लेव्हल कार (Entry Level Car) घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अनेक वाहन उत्पादक कंपन्यांना (Auto Companies) एंट्री लेव्हल कार बनवण्याची इच्छा नाही. मागील वर्षात एंट्री लेव्हल कारचं मार्केट (Market) 28 टक्क्यांपर्यंत घटलं आहे. येत्या काळात यात अजून घट होण्याची शक्यता आहे. `मारुती`चे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी ही माहिती दिली आहे. भारतीय ऑटोमोबाइलचा बाजार स्वस्त आणि छोट्या गाड्यांसाठी ओळखला जायचा. मारुती, टाटा, ह्युंदाय अशा अनेक कंपन्यांनी छोट्या गाड्या (Small car market) बाजारात आणून मध्यमवर्गीयांचं स्वप्न पूर्ण केलं होतं. आता हळूहळू या सेगमेंटमधल्या गाड्यांचं उत्पादन कमी होत आहे आणि बंद होण्याच्या मार्गावर आहे. एकेकाळी स्मॉल कार्सममध्ये आघाडीवर असणारी hyundai santro बंद होण्याच्या मार्गावर आहे. फार मागणी नाही, असं कारण देण्यात येत आहे. Covid-19 साथीच्या काळानंतर या गाड्यांची मागणी घटली, असल्याचं सांगितलं जातं. या सेगमेंटमधल्या कारसाठी वाढती महागाई (Inflation) हा मोठा चिंतेचा विषय आहे, असं 'मारुची'चे प्रेसिडंट भार्गव यांनी सीएनबीसी-टीव्ही 18 शी बोलताना सांगितलं. मारुती ही भारतातली सर्वांत मोठी कार उत्पादक कंपनी आहे. येत्या काळात कंपन्या एंट्री लेव्हल कारचं उत्पादन बंद करण्याची शक्यता आहे, असं सांगताना भार्गव यांनी ह्युंदाई कंपनीच्या सॅन्ट्रो या मॉडेलचं उदाहरण दिलं. ‘खरं तर, या वर्षी ऑक्टोबरपासून नवीन कारमध्ये एअरबॅग अनिवार्य केल्या जाऊ शकतात. त्यामुळे गाड्यांच्या किमती वाढल्या आहेत. मारुती एंट्री लेव्हल कारचं उत्पादन बंद करणार नाही,’ असं भार्गव यांनी स्पष्ट केलं. हेही वाचा - Alphonso export : कोकणच्या हापूसने अमेरिकेला लावलं वेड; पुण्यातून थेट White House मध्ये आंबा जाणार ते म्हणाले,``सुमारे 3,00,000 ग्राहक आमच्या प्रतीक्ष यादीत (Waiting List) आहेत. वाहन कंपन्यांच्या प्रतीक्षा यादीत असलेल्या ग्राहकांची एकूण संख्या अंदाजे 6 लाख असू शकते. एवढ्या मोठ्या संख्येमुळे बाजारतली मागणी (Demand) किंवा बुकिंगची काळजी करण्याची गरज नाही. आमच्या हातात भरपूर ऑर्डर्स आहेत आणि आम्ही त्या पूर्ण करू.`` सरकार प्रवाश्यांच्या सुरक्षेकडं जास्त लक्ष देत आहे. त्यामुळे यावर्षी ऑक्टोबरपासून नव्या कारमध्ये 6 एअरबॅग्ज (Airbags) असणं अनिवार्य केलं जाण्याची शक्यता आहे. वाचा -  Big B Amitabh Bachchan यांच्यासारखा भारदस्त आवाज काढणं आता कठीण नाही; डॉक्टरला उपाय सापडला यामुळे उत्पादन खर्चात (Production Cost) वाढ होणार आहे. भार्गव म्हणाले, ``एअरबॅगमुळे किंमत वाढल्याने एंट्री लेव्हल कार यापुढे स्पर्धेत राहणार नाहीत. भारताच्या बाजारपेठेत आधीच घसरण होत आहे. मात्र ही गोष्ट आपण विसरत आहोत, असं मला वाटतं. किंमत वाढल्याने यावर आणखी परिणाम होणार आहे. त्यातच महागाई वाढल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.`` ``आपल्या देशात एक भारत मार्केट आहे तर दुसरं इंडिया मार्केट आहे, ही गोष्ट आपल्या धोरणकर्त्यांनी समजून घेतली पाहिजे. तथापि, मारुती कंपनी आपल्या एंट्री लेव्हलच्या कोणत्याही कारचं उत्पादन थांबवणार नाही. मारुती कंपनीच्या हरियाणा येथील नवीन प्लांटमध्ये पुढील आठ वर्षांत दरवर्षी 10 लाख वाहनांचे उत्पादन होईल. मारुती कंपनीचा हरियाणामधला (Haryana) हा तिसरा प्लांट आहे,`` असं आर. सी. भार्गव यांनी सांगितलं.
    First published:

    Tags: Car, Maruti suzuki cars

    पुढील बातम्या