मराठी बातम्या /बातम्या /मनी /Amazon India प्रमुखांना ED चे समन, फ्यूचर ग्रुप डील प्रकरणात अनियमिततेचे आरोप

Amazon India प्रमुखांना ED चे समन, फ्यूचर ग्रुप डील प्रकरणात अनियमिततेचे आरोप

फ्यूचर ग्रुपबरोबरच्या एका डीलमुळे Amazon India चे प्रमुख अडचणीत आले आहेत. अंमलबजावणी संचलनालयाने (Enforcement Directorate -ED) फ्यूचर ग्रुप (Future Group) सह केलेल्या एका डील प्रकरणात कथित अनियमिततेमुळे अॅमेझॉन इंडियाचे हेड अमित अग्रवाल  (Amit Agarwal) यांना समन पाठवले आहेत.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर: फ्यूचर ग्रुपबरोबरच्या एका डीलमुळे Amazon India चे प्रमुख अडचणीत आले आहेत. अंमलबजावणी संचलनालयाने (Enforcement Directorate -ED) फ्यूचर ग्रुप (Future Group) सह केलेल्या एका डील प्रकरणात कथित अनियमिततेमुळे अॅमेझॉन इंडियाचे हेड अमित अग्रवाल (Amit Agarwal) यांना समन पाठवले आहेत. पुढच्याच आठवड्यात अमित यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. अॅमेझॉनने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की फ्युचर ग्रुपच्या प्रकरणात आम्हाला ईडीकडून समन प्राप्त झाले आहेत. आम्ही त्यावर दिलेल्या मुदतीत प्रतिसाद देऊ. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फेडरल एजन्सीने कागदपत्रांची पडताळणी आणि आतापर्यंत गोळा केलेल्या पुराव्यांनुसार फ्युचर ग्रुपच्या अधिकाऱ्यांना समन बजावले आहेत.

ईडी या प्रकरणात याबाबत चौकशी करत आहे की या डीलमध्ये परकीय चलनाबाबतचे भारतातील कायदे किंवा परकीय चलन व्यवस्थापन कायदा (Foreign Exchange Management Act - FEMA) याबाबत उल्लंघन झाले आहे का? Amazon ने 2019 मध्ये 1,400 कोटीच्या डीलमध्ये Future Coupons Pvt Ltd (FCPL) ची 49 कोटींची भागीदारी खरेदी केली होती.

हे वाचा-या मराठी तरुणाला मोदी सरकारकडून मिळाले 90 लाख! PM Modi यांनी केलं कौतुक

Future Retail Ltd (FRL) मध्ये FCPL ची 9.82 टक्के भागीदारी आहे. या डीलमुळे अॅमेझॉनला प्रत्यक्ष रुपात ना केवळ  फ्यूचर रिटेलमध्ये 4.81 टक्क्यांची भागीदारी ठेवण्याची मंजुरी दिली तर त्यांना लिस्टेड रिटेल कंपनीवर वीटो पॉवर देखील मिळाली. याआधारे अॅमेझॉन काही कोर्टात फ्यूचर रिटेलवर नियंत्रण अधिकारांचा दावा करत आहे. किशोन बियानी यांच्या नेतृत्वाखालील फ्युचर ग्रुपने विक्री योजनेवर आक्षेप घेतला आहे आणि गुंतवणूक कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

हे वाचा-22 आणि 24 कॅरेट सोन्यातील फरक काय? 22 Karat सोन्याला का म्हणतात 916 Gold

तेव्हापासून अॅमेझॉन आणि फ्यूचर ग्रुप या दोन्ही कंपन्या एकमेकांविरोधात केलेल्या आरोपांमुळे कायदेशीर प्रक्रियेत अडकल्या आहेत, जेव्हापासून फ्यूचर रिटेलने मुकेश अंबानींसोबत 2400 कोटी रुपयांना आपली मालमत्ता विकण्याचा करार केला आहे. यापूर्वी, दिल्ली उच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले होते की अॅमेझॉनने सरकारच्या मंजुरीशिवाय अप्रत्यक्षपणे फ्यूचर रिटेलवर नियंत्रण मिळवले आहे.

First published:
top videos

    Tags: Amazon