पंजाब नॅशनल बॅंक महिलांना फ्रीमध्ये देणार ट्रेनिंग, महिन्याला होईल लाखोंची कमाई, असा करा अर्ज

पंजाब नॅशनल बॅंक महिलांना फ्रीमध्ये देणार ट्रेनिंग, महिन्याला होईल लाखोंची कमाई, असा करा अर्ज

पंजाब नॅशनल बॅंक महिलांसाठी एका विशेष प्रशिक्षणाचं आयोजन करत आहे. या प्रशिक्षणासाठी इच्छूक व्यक्ती ऑनलाईन नोंदणी करू शकतात. या नोंदणीची अंतिम मुदत 15 एप्रिल 2021 पर्यंत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 एप्रिल : पंजाब नॅशनल बॅंकेकडून (Punjab National Bank) महिला सक्षमीकरणासाठी विविध सुविधा दिल्या जातात. याच अनुषंगाने बॅंक महिलांसाठी एका विशेष प्रशिक्षणाचं (Special Training Programme) आयोजन करत आहे. या प्रशिक्षणासाठी सरकारकडून देखील मदत केली जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी इच्छूक महिला मोफत नोंदणी करू शकतात. जर तुम्हाला या प्रशिक्षणात सहभागी व्हायचं असेल, तर काही गोष्टींची माहिती असणं आवश्यक आहे.

बॅंकेने नुकतंच ट्विट करुन या प्रशिक्षणाची माहिती दिली आहे. बॅंकेने दिलेल्या माहितीनुसार, या प्रशिक्षणासाठी इच्छूक व्यक्ती ऑनलाईन नोंदणी करू शकतात. या नोंदणीची अंतिम मुदत 15 एप्रिल 2021 पर्यंत आहे.

एनसीडब्ल्यूमार्फत घेतलं जातंय प्रशिक्षण -

पीएनबीतर्फे घेण्यात येणारा हा प्रशिक्षण कार्यक्रम राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) सहयोगाने राबवला जात आहे. बॅंकेने या प्रशिक्षणाला एम्पॉवरिंग विमेन थ्रु आंत्रप्रेन्युअरशिप (Empowering Women Through Entrepreneurship) असं नाव दिलं आहे. याबाबत अधिक माहितीसाठी http://innovateindia.mygov.in/ncw-challenge या वेबसाईटला भेट द्यावी, असं सूत्रांनी सांगितलं.

(वाचा - तुमचं JanDhan अकाउंट असेल,तर लगेच करा हे काम;अन्यथा होईल 1.3 लाख रुपयांचं नुकसान)

प्रशिक्षणाचा कालावधी किती -

या कार्यक्रमांतर्गत महिलांना 6 आठवड्यांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हे प्रशिक्षण अ‍ॅक्शन ओरिएंटेड बिझनेस आणि मॅनेजमेंट (Action Oriented Business And Management) या विषयी आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरणासह, विचार करण्याचा शास्रीय दृष्टिकोन आणि संधींबाबतही माहिती दिली जाणार आहे. या प्रशिक्षणात देशाच्या कोणत्याही भागातील महिला सहभागी होऊ शकतात. या कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या महिलांना 'डू युअर वेंचर' या प्रकल्पाअंतर्गत नवा उद्योग सुरू करण्यासाठी सखोल मार्गदर्शन केलं जाणार आहे.

प्रशिक्षणासाठी या आहेत अटी व नियम -

- या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थींना दररोज 3 ते 4 तास वेळ द्यावा लागेल.

-प्रशिक्षणार्थींचे वय 18 पेक्षा अधिक असणं आवश्यक आहे.

-प्रशिक्षणात सहभागी होणारी महिला भारताची नागरिक असावी.

-प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणासाठी व्हिडीओ पाठवावा लागेल. त्याचा कालवधी किमान 5 मिनिटांचा असणं आवश्यक आहे.

-या व्हिडीओची भाषा हिंदी किंवा इंग्रजी असणं आवश्यक आहे.

-प्रशिक्षणार्थींना आपले व्हिडीओ युट्यूब किंवा वाईमोमार्फतच पाठवावे लागतील.

(वाचा - फक्त एकदा पैसे भरा आणि आयुष्यभर दरमहा 8000 रुपये मिळवा; LIC ची खास पॉलिसी)

5000 महिलांची होणार निवड - 

या कार्यक्रमांतर्गत उद्योजिका बनण्याचं स्वप्न बघणाऱ्या 5000 महिलांची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या महिलांना आयआयएमच्या (IIM) प्राध्यापकांकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

First published: April 13, 2021, 5:08 PM IST

ताज्या बातम्या