पुढच्या 6 महिन्यांत ही कंपनी 3 हजार जणांना देणार नोकरी, 80 देशांत आहे कंपनीचा बिझनेस

पुढच्या 6 महिन्यांत ही कंपनी 3 हजार जणांना देणार नोकरी, 80 देशांत आहे कंपनीचा बिझनेस

हॉटेलची सुविधा मिळवून देणारी कंपनी OYO भारतात व्यवसाय वाढवण्यावर भर देत आहे. हा व्यवसाय विस्तारताना OYO 3 हजार जणांना नोकऱ्या देणार आहे. दक्षिण आशियामध्ये 1400 कोटी रुपये गुंतवण्याचा OYO चा मानस आहे.

  • Share this:

मुंबई, 22 ऑगस्ट : हॉटेलची सुविधा मिळवून देणारी कंपनी OYO भारतात व्यवसाय वाढवण्यावर भर देत आहे. हा व्यवसाय विस्तारताना ओयो 3 हजार जणांना नोकऱ्या देणार आहे. दक्षिण आशियामध्ये 1400 कोटी रुपये गुंतवण्याचा OYO चा मानस आहे. OYO ज्या नोकऱ्या देणार आहे त्यात मार्केटिंग, सेल्स,सर्व्हिस अशा क्षेत्रांचा सहभाग आहे. या क्षेत्रात आणखी नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. -

OYOचा व्यवसाय 80 देशांतल्या 800 शहरांमध्ये आहे. यामध्ये सुमारे 17 हजार कर्मचारी आहेत. यातले 9 हजार पेक्षा जास्त कर्मचारी भारतात आहेत.

रितेश अगरवाल या भारतीय उद्योजकाने वयाच्या 17 व्या वर्षी OYO ही कंपनी स्थापन केली. OYO Rooms या वेबसाइटवर शहरांमध्ये आपल्याला परवडेल अशा दरात राहण्याची सुविधा मिळू शकते. अशा प्रकारची ही भारतातली सगळ्यात मोठी वेबसाइट आहे.

शेअर बाजार आणि FD ऐवजी इथे गुंतवा पैसे, मिळेल बंपर नफा

चीन, मलेशिया, नेपाळ, श्रीलंका, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स, सौदी अरेबिया, फिलिपाइन्स, इंडोनेशिया, जपान या देशात OYO कंपनीचा विस्तार आहे.

OYO हॉटेल्स अँड होम्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य घोष यांनी 3 हजार कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची घोषणा केली. OYO कंपनीशी सध्या 10 हजार पेक्षा जास्त हॉटेलमालक जोडलेले आहेत. या हॉटेल्समध्ये 2 लाख राहण्याच्या खोल्या उपलब्ध आहेत.

आर्थिक मंदीमुळे अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना नोकरी जाण्याचा धोका आहे. खालावलेली आर्थिक स्थिती आणि बेरोजगारीचं संकट भारतावरही आहे. असा स्थितीत नोकऱ्या उपलब्ध करून देण्याच्या OYO च्या निर्णयाचं स्वागत होतं आहे.

ITR भरण्यासाठी आता उरले फक्त 10 दिवस, नाहीतर पडेल भुर्दंड

===============================================================================================

VIDEO : राज ठाकरेंची चौकशी कशासाठी आणि काय कोहिनूर प्रकरण?

Published by: Arti Kulkarni
First published: August 22, 2019, 4:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading