News18 Lokmat

PF खात्यात ही चूक केली असेल तर अशी करा सुधारणा

तुमचं पीएफ खातं आणि UN नंबर लिंक असेल, तर ही पद्धत तुम्ही आजमावू शकता.

News18 Lokmat | Updated On: Apr 10, 2019 01:19 PM IST

PF खात्यात ही चूक केली असेल तर अशी करा सुधारणा

मुंबई, 10 एप्रिल : नोकरी करणारे नेहमी पीएफबद्दल टेंशनमध्ये असतात. अनेकदा नोकरी सोडताना लोक पीएफमधले पैसे काढतात. दुसऱ्या कंपनीत नवं अकाऊंट सुरू करतात. ते करताना जुन्या आॅफिसचा युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (UAN ) देत नाहीत, तर नवा उघडतात. त्यामुळे तुम्हाला नव्या आॅफिसचं पासबुक दिसतं. दोन वेगवेगळे UNA नंबर असल्यानं तुमच्या खात्याचे डिटेल्स पाहणं कठीण जातं. सर्वात कठीण जातं नव्या खात्यात जुन्या खात्यातले पैसे ट्रान्सफर करणं. म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय जुन्या आणि नव्या UNA नंबरला एकत्र कसं करायचं ते.

सोपी पद्धत

तुमचं पीएफ खातं आणि UN नंबर लिंक असेल, तर ही पद्धत तुम्ही आजमावू शकता. तुम्हाला EPFOच्या पोर्टलवर एम्प्लाॅई वन ईपीएफ अकाऊंटवर क्लिक करावं लागेल.

इथे तुम्हाला रजिस्टर्ड मोबाईल नंबर, UN नंबर आणि कंपनीचा आयडी भरावा लागेल. नंतर मोबाईल नंबरवर आलेल्या वन टाइम पासवर्डला दिलेला काॅलम भरावा लागेल.

यानंतर नव्या पेजवर क्लिक करा. त्यावर जुन्या ईपीएफच्या डिटेल्स भराव्या लागतील.

Loading...

सर्वात आधी EPFO पोर्टलवरून जुन्या पीएफ खात्याला नव्या पीएफ खात्यात ट्रान्सफर करावं लागेल.

ट्रान्सफरसाठी रिक्व्वेस्ट केल्यानंतर EPFO तुमच्या ट्रान्सफर क्लेमला व्हेरिफाय करेल. तुमच्या दोन्ही UAN नंबरांना लिंक करण्याची प्रक्रिया सुरू होईल.

ट्रान्सफर प्रोसेस झाल्यानंतर EPFO तुमचा अगोदरचा UAN नंबर ब्लाॅक करेल. त्याचा उपयोग नंतर होणार नाही.

UAN खात्यात एकत्रित करण्याची प्रक्रिया आॅटोमॅटिकली पूर्ण होऊ शकते. यासाठी रिक्वेस्टची गरज नाही.

EPFO तुमचा नवा UAN नंबर तपासून पाहील आणि पीएफ खात्यात लिंक करेल.

कर्मचाऱ्याला याबद्दल SMS  येईल. नवा UAN अॅक्टिव्ह होईल.

UAN अॅक्टिव्ह झाल्यानंतर तीन दिवसांनी अकाऊंटला मर्ज करता येतं. या सेवेचा उपयोग करण्यासाठी EPF ग्राहकांना kyc अपडेट करावं लागेल. आधार कार्डाचीही माहिती द्यावी लागेल.

दुसरी पद्धत

यासाठी तुम्हाला तुमच्या कंपनीला कळवावं लागेल. EPFOलाही माहिती द्यावी लागेल.

EPFO ला uanepf@epfindia.gov.in या मेलवर कळवा. यात नवा आणि जुना दोन्ही UANनंबर भरावा लागेल.

यानंतर EPFO तुमचे दोन्ही UAN नंबर व्हेरिफाय करेल. जुना नंबर ब्लाॅक होईल.

नंतर जुन्या खात्यातून नव्या खात्यात पैसे ट्रान्सफर  करण्यासाठी अप्लाय करता येईल.


VIDEO: एवढ्या वर्षांत मोदींनी त्यांच्यावर झालेले आरोप कसे सहन केले - विवेक ओबेरॉय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: EpfoPf
First Published: Apr 10, 2019 01:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...