News18 Lokmat

PF आणि PPF मधला 'हा' आहे मोठा फरक, जाणून घ्या काय आहे फायदा

अनेकांना PF आणि PPF यामधला फरक माहीत नसतो. या दोघांबद्दल जाणून घेऊ.

News18 Lokmat | Updated On: Apr 8, 2019 05:11 PM IST

PF आणि PPF मधला 'हा' आहे मोठा फरक, जाणून घ्या काय आहे फायदा

मुंबई, 08 एप्रिल : नोकरी करणाऱ्यांसाठी प्राॅव्हिडंट फंड म्हणजेच PF खूप महत्त्वाचा आहे. निवृत्तीनंतरची ती एक पुंजी असते. पण अनेकांना याबद्दल कमी माहिती असते. अनेकांना PF आणि PPF यामधला फरक माहीत नसतो. या दोघांबद्दल जाणून घेऊ.

पीएफ आणि पीपीएफमधलं काय आहे अंतर?

नोकरी करणाऱ्यांच्या पगारातला PF कापला जातो. कापलेला हिस्सा तुमच्या पीएफमध्ये जमा होतो. ही एक गुंतवणूकच आहे. नोकरी करणाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक फायदा व्हावा म्हणून ही योजना आहे. यांचा व्याज दर सरकार ठरवतं. सध्याचा PFचा व्याज दर 8.65 टक्के आहे.

पब्लिक प्राॅव्हिडंट फंड म्हणजेच PPF ही केंद्र सरकार चालवत असलेली योजना आहे. तुम्ही त्यात तुमच्या इच्छेप्रमाणे पैसे गुंतवू शकता. ते काही अनिवार्य नाही. ते ऐच्छिक आहे. तुम्ही कुठल्याही राष्ट्रीय बँकेत किंवा पोस्टात PPF अकाऊंट उघडू शकता. यासाठी तुम्हाला कुठल्या कंपनीचे कर्मचारी असणं गरजेचं नाही. PPFचा व्याज दर प्रत्येक तीन महिन्यांनी नक्की होतो. 1 एप्रिल 2019 ते 30 जून 2019पर्यंत पीपीएफ खात्यात 8 टक्के व्याज मिळेल.

कुठल्याही कंपनीतल्या कर्मचाऱ्यांचा पगार अनेक भागात असतो. बेसिक सॅलरी, ट्रॅव्हल अलाऊन्सेस, स्पेशल अलाऊन्सेस हेही असतात.

Loading...

प्रत्येक महिन्याला कंपनी कर्मचाऱ्यांच्या पगारातले 12 टक्के कापून PF खात्यात टाकते. त्याबरोबर कंपनी कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या कडून 12 टक्के पैसे PF खात्यात टाकते.


PF खातेधारकांना मिळणारे फायदे

1. मोफत विमा - पीएफ खातं उघडताच तुम्हाला आपोआप विमा सुरू होतो. तुम्हाला 6 लाखापर्यंत इंशुरन्स मिळतो.

2. निष्क्रिय खात्यातून मिळतं व्याज - पीएफधारकांचं खातं निष्क्रिय असलं तरी 3 वर्ष त्यात व्याज पडत राहतं. पण 3 वर्षापेक्षा जास्त काळ निष्क्रिय राहिलं तर मात्र व्याज मिळत नाही. आर्थिक तज्ज्ञांचं म्हणणं असं की भले निष्क्रिय खात्यावर व्याज मिळत असलं तरी तुम्ही ते ताबडतोब सक्रिय खात्यात ट्रान्सफर करा.

3.नव्या नियमांनुसार पाच वर्षाहून अधिक काळ खातं निष्क्रिय राहिलं तर त्यातले पैसे काढायला कर लागतो.

4.पीएफमधून तुम्ही कधीही पैसे काढू शकता. ते अगदी सोपं आहे. तुम्ही PF मधले 90 टक्के पैसे काढू शकता.

5.जुन्या नोकरीतला पीएफ नव्या नोकरीत ट्रान्सफर होऊ शकतो.

6.पीएफमधून पेंशनचा फायदाही मिळतो.

पीपीएफचा काय फायदा?

हल्लीच्या काळात सुरक्षित आणि टॅक्सही वाचेल अशी गुंतवणूक म्हणजे PPF. यात तुम्ही वर्षाला कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये गुंतवू शकता.

PPF ची खासीयत अशी की तुम्हाला दर महिन्याला तुमच्या गुंतवणुकीवर व्याज मिळू शकतं. अर्थात, हे सर्व क्रेडिट मॅच्युरिटीनंतरच होतं. दर महिन्याचं व्याज पूर्ण मिळावं यासाठी तुम्ही जर दर महिन्याला पैसे भरत असाल तर ते 5 तारखेच्या आत भरावं.

PPFमध्ये 5 तारखेच्या आत पैसे भरले तर आधीची रक्कम आणि नंतर टाकलेली रक्कम या दोन्हीवर व्याज मिळतं. त्याचा फायदा तुम्हाला होतो.


VIDEO : अजितदादांना आवडलं राज ठाकरेंचं भाषण, विनोद तावडेंचा केला 'पोपट'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: moneyPfPPF
First Published: Apr 8, 2019 05:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...