मुंबई, 05 एप्रिल : सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयानं पेंशनबाबत दिलासा मिळालाय. नव्या निर्णयानुसार सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या पूर्ण पगाराच्या हिशेबानं पेन्शन मिळणार आहे. अशात नोकरदारांसाठी ईपीएफ म्हणजेच एम्प्लाॅइड प्राॅव्हिडंट फंड महत्त्वाचा आहे. हा एका निवृत्ती वेतन प्लॅनप्रमाणे आहे. याच्यातल्या गुंतवणुकीचा फायदा बऱ्याच अवधीनंतर मिळणार आहे.
अगोदर लोक नोकरी बदलताना फंड ट्रान्सफर करायचे. पण गेली काही वर्ष ईपीएफओ काढून घेणाऱ्यांची संख्या वाढलीय. म्हणून पीएफ काढण्याची प्रक्रिया आता सोपी केलीय.
स्टेप 1 - ईपीएफओच्या मेंबर्सना ई सेवा पोर्टल https:unifiedportal-mem.epfindia.gov.in वर लाॅग इन करावं लागेल.
स्टेप 2 - लाॅगइन केल्यानंतर तुम्हाला आधार बेस्ड आॅनलाइन क्लेम सबमिशन टॅब निवडावा लागेल. त्यानंतर तुम्हाला केवायसी डिटेल्स व्हेरिफाय करावे लागतील. क्लेमसाठी वेगवेगळ्या पर्यायांचा आॅप्शन निवडावा लागेल.
स्टेप 3 -ईपीएफओतर्फे तुम्हाला युआयडीएआय डेटाबेसमध्ये रजिस्टर्ड मोबाइलवर वन टाइम पासवर्ड पाठवला जाईल. ओटीपी एंटर केल्यानंतर क्लेम फाॅर्म सादर होईल आणि तुमचा पीएफ काढण्याची प्रक्रिया सुरू होईल. सगळी प्रक्रिया संपली की रक्कम तुमच्या खात्यात जमा केली जाईल.
या गोष्टींची घ्या काळजी
ईपीएफओ प्रतिनिधीला आॅनलाइन सेवेचा वापर करण्यासाठी तुमच्या मालकाकडे जायची गरज नाही.
पण तुमच्याकडे कंपनीचा इस्टॅब्लिशमेंट नंबर हवा
तुमचा रजिस्टर्ड नंबर आणि EPFOमधला मोबाइल नंबर एकच हवा.
EPFO खातेधारकांसाठी युनिव्हर्सल अकाऊंट नंबर देईल. जोपर्यंत तुम्ही पीएफमधले पैसे काढून घेत नाहीत तोपर्यंत तो नंबर निष्क्रिय होणार नाही.
या नंबर अॅक्टिव्हेट होणं गरजेचं आहे. प्रतिनिधीचा मोबाइल नंबर युएएन डेटाबेसमध्ये रजिस्टर्ड व्हायला हवा. आधार कार्डाची माहितीही ईपीएफओच्या वेबसाइटवर हवी. बँकेची माहितीही युएएनमध्ये हवी. तसंच पॅनही ईपीएफओच्या डेटाबेसमध्ये हवं.
काही तासात पैसे काढू शकता
तुमचं आधार कार्ड EPFOला लिंक असेल तर पूर्ण प्रक्रिया 3 ते 4 दिवसात होईल. EPFO याहूनही प्रक्रिया लवकर होईल याची तयारी करतेय. मग पैसे लगेच मिळतील. पण पीएफ अकाऊंटची KYC आवश्यक आहे.
भाजपचं टार्गेट शरद पवारच आहे का? मुख्यमंत्र्यांची UNCUT मुलाखत