मराठी बातम्या /बातम्या /मनी /EPFO खातेधारकारकासह कुटुंबियांना 'या' खास सुविधेबद्दल माहिती हवी; 7 लाखांचा मिळतो लाभ

EPFO खातेधारकारकासह कुटुंबियांना 'या' खास सुविधेबद्दल माहिती हवी; 7 लाखांचा मिळतो लाभ

EPFO सदस्यांना एम्‍प्लॉई डिपॉजिट लिंक्‍ड इन्‍श्‍योरेंस स्‍कीम (EDIL) अंतर्गत विमा संरक्षणाची ही सुविधा मिळते. या योजनेंतर्गत, सदस्याच्या मृत्यूनंतर, विमा संरक्षण अंतर्गत नामनिर्देशित व्यक्तीला जास्तीत जास्त 7 लाख रुपये दिले जाऊ शकतात.

EPFO सदस्यांना एम्‍प्लॉई डिपॉजिट लिंक्‍ड इन्‍श्‍योरेंस स्‍कीम (EDIL) अंतर्गत विमा संरक्षणाची ही सुविधा मिळते. या योजनेंतर्गत, सदस्याच्या मृत्यूनंतर, विमा संरक्षण अंतर्गत नामनिर्देशित व्यक्तीला जास्तीत जास्त 7 लाख रुपये दिले जाऊ शकतात.

EPFO सदस्यांना एम्‍प्लॉई डिपॉजिट लिंक्‍ड इन्‍श्‍योरेंस स्‍कीम (EDIL) अंतर्गत विमा संरक्षणाची ही सुविधा मिळते. या योजनेंतर्गत, सदस्याच्या मृत्यूनंतर, विमा संरक्षण अंतर्गत नामनिर्देशित व्यक्तीला जास्तीत जास्त 7 लाख रुपये दिले जाऊ शकतात.

पुढे वाचा ...

मुंबई, 31 मे : भविष्य निर्वाह निधीबाबतचे बरेचसे नियम खातेधारक म्हणून तुम्हाला माहिती असले पाहिजेत. पैसे काढण्यापासून ते ट्रान्सफरपर्यंत सर्व काही आजकाल ऑनलाइन आहे. परंतु, बॅलेन्स, ईपीएफ ट्रान्सफर किंवा पीएफ काढणे याशिवाय, अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत, ज्याची माहिती असणे आवश्यक आहे. ईपीएफचे असेच एक वैशिष्ट्य आहे, जे बहुतेक लोकांना माहित नाही. नोकरदार वर्गाला या फीचरची माहिती असली पाहिजे आणि त्यांनी त्यांच्या कुटुंबाला देखील याबद्दल माहिती दिली पाहिजे. संघटित क्षेत्रात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना EPF खात्यासह 7 लाख रुपयांपर्यंतचे मोफत जीवन विमा संरक्षण (EDIL Insurance Cover) मिळते. झी बिझनेसने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

कोणताही कर्मचारी त्याच्या सेवेच्या कालावधीत यासाठी कोणतेही योगदान देत नाही. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) तिच्या सर्व सदस्यांना ही सुविधा पुरवते. EPFO सदस्याचा अपघाती मृत्यू (Accidental Death) झाल्यास, नामनिर्देशित व्यक्ती जीवन विम्याच्या (Life Insurance) रकमेवर दावा करू शकतो.

होम लोन फेडण्यासाठी 'हा' पर्याय निवडा, लाखो रुपयांची बचत सहज शक्य होईल

EPFO सदस्यांना एम्‍प्लॉई डिपॉजिट लिंक्‍ड इन्‍श्‍योरेंस स्‍कीम (EDIL) अंतर्गत विमा संरक्षणाची ही सुविधा मिळते. या योजनेंतर्गत, सदस्याच्या मृत्यूनंतर, विमा संरक्षण अंतर्गत नामनिर्देशित व्यक्तीला जास्तीत जास्त 7 लाख रुपये दिले जाऊ शकतात. यापूर्वी त्याची मर्यादा 3,60,000 रुपये होती. नंतर, विमा संरक्षणाची मर्यादा 6 लाख रुपये करण्यात आली आणि सप्टेंबर 2020 मध्ये त्याची मर्यादा 7 लाख रुपये करण्यात आली. बोनसची मर्यादाही 1.5 लाख रुपयांवरून 2.5 लाख रुपये करण्यात आली आहे.

विमा संरक्षणाची रक्कम कशी ठरवली जाते?

एखाद्या कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर, नॉमिनीला 20% बोनससह मागील 12 महिन्यांच्या सरासरी पगाराच्या 30 पट मिळते. याचा अर्थ सध्याच्या 15,000 रुपयांच्या मूळ उत्पन्नाच्या कमाल मर्यादेनुसार, 30x ₹ 15,000 = ₹ 4,50,000 उपलब्ध होतील. याशिवाय, दावेदाराला ₹ 2,50,000 ची बोनस रक्कम देखील दिली जाईल. एकूणच, ही रक्कम कमाल 7 लाख रुपयांपर्यंत असू शकते.

Business Idea : भारतीय रेल्वेसोबत काम करा आणि कमवा भरपूर पैसे, संधी गमावू नका

विमा क्लेम कसा मिळवायचा?

पीएफ खातेधारकाच्या मृत्यूनंतर, खात्याचा नॉमिनी विमा रकमेवर क्लेम करू शकतो. यासाठी विमा कंपनीला मृत्यू प्रमाणपत्र, उत्तराधिकार प्रमाणपत्र आणि बँक तपशील प्रदान करणे आवश्यक आहे. जर पीएफ खात्यात कोणीही नॉमिनी नसेल तर कायदेशीर वारस या रकमेवर दावा करू शकतो. पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी, नियोक्त्याकडे सबमिट करायच्या फॉर्मसह विमा संरक्षणाचा फॉर्म सबमिट करा. नियोक्ता या फॉर्मची पडताळणी करतो. यानंतर कव्हरचे पैसे मिळतात.

निवृत्तीनंतर कोणताही दावा नाही

पीएफ खातेधारकाचा मृत्यू सेवेत असताना म्हणजेच निवृत्तीपूर्वी झाला असेल तरच पीएफ खात्यावरील या विम्यावर दावा केला जाऊ शकतो. या दरम्यान, तो कार्यालयात काम करत असेल किंवा रजेवर असेल. काही फरक पडत नाही. नॉमिनी पैशाचा दावा करू शकतो.

First published:

Tags: Epfo news, Insurance, Money, PF Amount