मराठी बातम्या /बातम्या /मनी /अ‌ॅमेझॉनच्या CEO ना टाकलं मागे, Elon Musk ठरले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती 

अ‌ॅमेझॉनच्या CEO ना टाकलं मागे, Elon Musk ठरले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती 

टेस्ला इंक (Tesla Inc) आणि स्पेसएक्स (SpaceX) या दोन मोठ्या  कंपन्यांचे संस्थापक एलन मस्क (Elon Musk) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

टेस्ला इंक (Tesla Inc) आणि स्पेसएक्स (SpaceX) या दोन मोठ्या  कंपन्यांचे संस्थापक एलन मस्क (Elon Musk) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

टेस्ला इंक (Tesla Inc) आणि स्पेसएक्स (SpaceX) या दोन मोठ्या  कंपन्यांचे संस्थापक एलन मस्क (Elon Musk) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

वॉशिंग्टन डीसी, 08 जानेवारी: टेस्ला इंक (Tesla Inc) आणि स्पेसएक्स (SpaceX) या दोन मोठ्या  कंपन्यांचे संस्थापक एलन मस्क (Elon Musk) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. ब्लूमबर्गच्या बिलेनियर  यादीनुसार, मस्क यांनी संपत्तीच्या बाबतीत अ‌ॅमेझॉनचे (Amazon) संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ-CEO) जेफ बेजोस (Jeff Bezos) यांना दुसऱ्या क्रमांकावर ढकललं आहे.

गुरुवारी टेस्लाच्या (Tesla) समभागांमध्ये (shares) 4.8 टक्क्यांनी वाढ झाल्यानं मस्क यांच्या संपत्तीत वाढ झाली. गुरुवारी टेस्ला कंपनीच्या समभागाचे मूल्य 811.31 डॉलर्स होते. एलन मस्क यांची एकूण संपत्ती 188.5 अब्ज डॉलर झाली असून, त्यांची संपत्ती जेफ बेजोस यांच्यापेक्षा 1.5 अब्ज डॉलरने अधिक आहे.

ऑक्टोबर 2017 पासून बेजोस प्रथम क्रमांकावर

जगभरातील श्रीमंत व्यक्तींकडील एकूण संपत्तीच्या आधारावर ब्लूमबर्ग बिलेनियर त्यांची क्रमवारी निश्चित करते. त्यानुसार ऑक्टोबर 2017 पासून बेजोस जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत प्रथम क्रमांकावर होते.

मस्क यांच्या संपत्तीवर कोरोना साथीचा परिणाम नाही

नोव्हेंबर 2020 मध्ये बिल गेटस (Bill Gates) यांना मागे टाकून एलन मस्क दुसऱ्या स्थानावर विराजमान झाले होते. त्यावेळी त्यांची संपत्ती 128 अब्ज डॉलर्स होती. गेल्या 12 महिन्यात त्यांच्या संपत्तीत 150 अब्ज डॉलर्सची भर पडली आहे. कोरोनाची साथ, अर्थव्यवस्थेतील अस्थिरता, मंदी यांचा त्यांच्या संपत्तीवर कोणताही परिणाम झालेला नाही.

2020मध्ये तब्बल 743 टक्क्यांनी वाढले टेस्लाच्या समभागांचे मूल्य

मस्क यांच्या संपत्तीत वाढ होण्यामागे सर्वात मोठं कारण आहे त्यांच्या टेस्ला कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये वाढ होण्याचं. कंपनीला होत असलेल्या नफ्यामुळे या समभागांच्या किंमतीत मोठी वाढ होत आहे.  एस अँड पी 500 इंडेक्समध्ये सामील झाल्यानंतर 2020 मध्ये या समभागात तब्बल 743 टक्के वाढ झाली आहे.

टेस्लानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी कंपनीनं 5 लाख इलेक्ट्रिक कार्सचं उत्पादन आणि विक्री केली. मस्क यांनी याबाबतीत एक ट्वीट केलं होतं. ‘एक मैलाचा दगड गाठणाऱ्या टेस्लाच्या टीमचा मला अभिमान आहे. टेस्लाच्या सुरुवातीला मला फक्त दहा टक्के खात्री वाटत होती की आपण टिकून राहू याची.' असं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

First published:

Tags: Amazon, Tesla, Tesla electric car