• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Elon Musk यांनी पुन्हा विकले Tesla चे 1.05 अब्ज डॉलर्सचे शेअर, वाचा काय आहे कारण?

Elon Musk यांनी पुन्हा विकले Tesla चे 1.05 अब्ज डॉलर्सचे शेअर, वाचा काय आहे कारण?

इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (Tesla CEO Elon Musk) अर्थात जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणारे इलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा टेस्लाचे शेअर्स (Elon Musk Sells Shares of Tesla) विकले आहेत.

 • Share this:
  मुंबई, 24 नोव्हेंबर: इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (Tesla CEO Elon Musk) अर्थात जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणारे इलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा टेस्लाचे शेअर्स (Elon Musk Sells Shares of Tesla) विकले आहेत. यावेळी इलॉन मस्क यांनी $1.05 अब्ज किमतीचे शेअर्स विकले आहेत.  वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी स्टॉक ऑप्शनअंतर्गत कंपनीचे सुमारे 21.5 लाख शेअर्स खरेदी केले आणि त्यानंतर सुमारे 934,091 शेअर्स विकले, ज्याचे मूल्य $1.05 अब्ज (Tesla Share Price) आहे. यापूर्वी, 6 नोव्हेंबर रोजी इलॉन मस्क यांनी ट्विटरवर (Elon Musk Twitter) त्यांच्या फॉलोअर्सना विचारले होते की त्यांनी त्यांच्याकडील 10% स्टेक विकावे का? बहुतांश युजर्सनी शेअर विकण्याच्या बाजूने मतदान केले होते. हे वाचा-Paytm च्या शेअरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी तेजी, तज्ज्ञांचा सल्ला काय आहे? तेव्हापासून, इलॉन मस्क यांनी त्यांच्या कंपनीचे सुमारे 92 लाख शेअर्स विकले आहेत, ज्यांचे मूल्य $9.9 अब्ज आहे. गेल्या मंगळवारी, इलॉन मस्क यांनी टॅक्स भरण्यासाठी टेस्लाचे 934,091 शेअर्स विकले होते. या कारणामुळे इलॉन मस्क विकत आहेत शेअर्स 2012 मध्ये टेस्ला कंपनीने इलॉन मस्क यांनाला स्टॉक ऑप्शन दिला होता. या अंतर्गत मस्क यांना कंपनीचे सुमारे 2.28 कोटी शेअर्स केवळ $6.24 प्रति शेअर या किमतीत खरेदी करण्याचा पर्याय मिळाला. हा पर्याय वापरण्यासाठी मस्क यांच्याकडे 2022 पर्यंत वेळ होता. मात्र यादरम्यान यूएसमध्ये एक कायदा आला, ज्यानुसार सर्व शेअर्सची खरेदी किंमत आणि शेअरची वास्तविक किंमत यांच्यातील फरकावर झालेल्या कॅपिटल गेनच्या 50% कर म्हणून भरावा लागेल. हे वाचा-पुन्हा बँक खात्यात येऊ लागली आहे LPG Subsidy! अशाप्रकारे ऑनलाइन करा चेक इलॉन मस्क हे आता हा स्टॉक ऑप्शन रिडीम करून कंपनीचे शेअर्स खरेदी तर करत आहेत. पण त्यांना 50% ची टॅक्स लायबिलिटी भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेअर्सची पुनर्विक्री करावी लागत आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: