• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • 'Tesla चे 6 अब्ज डॉलर्सचे स्टॉक विकेन जर...', उपासमारीबाबत Elon Musk यांची प्रतिक्रिया

'Tesla चे 6 अब्ज डॉलर्सचे स्टॉक विकेन जर...', उपासमारीबाबत Elon Musk यांची प्रतिक्रिया

टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क म्हणतात की ते टेस्लाचे स्टॉक (Elon Musk is ready to sell Tesla's Stock) विकण्यास तयार आहेत, जर संयुक्त राष्ट्राने हे स्पष्ट केलं की जगातील भूक 6 अब्ज डॉलर्समध्ये नष्ट केली जाऊ शकते.

 • Share this:
  मुंबई, 02 नोव्हेंबर: उपासमारीची समस्या केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील अनेक देशांसमोरील महत्त्वाची समस्या आहे. दिवसेंदिवस याबाबत जागरुकता वाढत असून अनेक दिग्गजांनी या समस्येला तोंड देण्यासाठी कंबर कसली आहे. अनेकजण मदतीचा हात पुढे करत आहेत. दरम्यान टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क (Elon Musk) यांनी देखील याबाबतीत एक महत्त्वाचे ट्वीट केले आहे. टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क म्हणतात की ते टेस्लाचे स्टॉक (Elon Musk is ready to sell Tesla's Stock) विकण्यास तयार आहेत, जर संयुक्त राष्ट्राने हे स्पष्ट केलं की जगातील भूक 6 अब्ज डॉलर्समध्ये नष्ट केली जाऊ शकते. ते स्वत:चे शेअर्स विकण्यास तयार आहेत. इलॉन मस्क यांनी याबाबत ट्वीट केले आहे. त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाला (WFP) त्यांचा पैसा कसा वापरला जात आहे हे सार्वजनिकपणे उघड करण्यास सांगितले आहे. हे ओपन सोर्स अकाऊंटिंग असावे, जेणेकरुन जनतेला पैसे नेमके कसे खर्च होतात हे पाहता येईल, असेही मस्क यांनी म्हटले आहे. इलॉन मस्क यांनी म्हटले आहे की जर WFP हे सांगू शकेल की 6 अब्ज डॉलरमुळे जगातील उपासमारीची समस्या मिटेल तर मी आत्ताच टेस्लाचे स्टॉक विकेन. हे वाचा-सोनंच नव्हे डायमंड-चांदीच्या दागिन्यांवरही सूट, जाणून घ्या कुठे मिळतायंत ऑफर्स UN च्या WFP चे संचालक डेव्हिड बेस्ली यांनी एका मुलाखतीत सांगितले की टेस्लाच्या प्रमुखांच्या एकूण संपत्तीपैकी केवळ 2 टक्के संपत्ती जगाची भूक संपवू शकते. इलॉन मस्क यांची संपत्ती 300 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे, तर जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस आहेत.  ते 195 अब्ज डॉलर्सचे मालक आहे. या दोघांकडे जगाची भूक भागवण्याची क्षमता आहे. डेव्हिड म्हणाले होते की, इलॉन मस्क यांच्याकडे चांगली संधी आहे की ते त्यांच्याकडील 2 टक्के अर्थात 6 अब्ज डॉलर संपतीचा वापर करून जगाची भूक भागवतील.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: