मराठी बातम्या /बातम्या /मनी /

AC, फ्रिज, कुलर खरेदी करायचे आहेत तर आताच घ्या निर्णय! उन्हाळ्याआधी महागणार या वस्तू

AC, फ्रिज, कुलर खरेदी करायचे आहेत तर आताच घ्या निर्णय! उन्हाळ्याआधी महागणार या वस्तू

या उन्हाळ्यात तुम्ही एसी, फ्रिज आणि पंखा घेण्याचा विचार करत असाल तर घाई करा. कारण कंपन्या येत्या काही दिवसांत या वस्तुंच्या किमती वाढवण्याचा विचार करत आहेत. वस्तुंच्या उत्पादनासाठी येणारा खर्च वाढत असल्याने कंपन्या किमती वाढवण्याच्या विचारात आहेत.

पुढे वाचा ...
मुंबई, 03 मार्च: लवकरच उन्हाळा (Summer 2022) सुरू होणार आहे. मुंबईसारख्या शहरात तर उन्हाचे चटके बसण्यासही सुरुवात झाली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात थंड पदार्थांची आणि एसी (AC), कूलर (cooler), फ्रिज (fridge) यासारख्या उपकरणांची मागणी वाढते. या उन्हाळ्यात तुम्ही एसी, फ्रिज आणि पंखा घेण्याचा विचार करत असाल तर घाई करा. कारण कंपन्या येत्या काही दिवसांत या वस्तुंच्या किमती वाढवण्याचा विचार करत आहेत. वस्तुंच्या उत्पादनासाठी येणारा खर्च वाढत असल्याने कंपन्या किमती वाढवण्याच्या विचारात आहेत. खरं तर, रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine war) तांबे, अॅल्युमिनिअमच्या किमती जागतिक बाजारपेठेत विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. त्याचा बोजा एसी, फ्रीज आणि पंखे बनवणाऱ्या कंपन्यांवरही पडत आहे. त्यामुळे ही वाढीव किंमत वसूल करण्यासाठी कंपन्या येत्या काही दिवसांत वस्तुंच्या किमती 7 ते 10 टक्क्यांनी वाढवू शकतात. दरम्यान, गेल्या दोन वर्षांत कंपन्यांनी तीनदा वस्तुंच्या किमती वाढवल्या आहेत. वर्षभरात धातुंच्या किमतीत दीडपट वाढ जागतिक बाजारपेठेत अॅल्युमिनियम आणि तांब्याच्या किमती गेल्या वर्षभरात दीड पटीने वाढल्या आहेत. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अॅल्युमिनियमची किंमत 1.61 लाख रुपये प्रति टन होती, ती आता 2.80 लाख रुपयांवर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे तांब्याचे भावही प्रति टन 5.93 लाख रुपयांवरून 7.72 लाख रुपये प्रति टनवर पोहोचले आहेत. हे वाचा-आता पतंजलीचं क्रेडिट कार्डही लाँच, ग्राहकांना मिळणार या सुविधा या वाढत्या किमतीसंदर्भात ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांचं म्हणणं आहे की, आतापर्यंत ते त्यांचे मार्जिन कमी करून काम करत होते. परंतु वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे आता ते शक्य नाही. गेल्या दोन वर्षात उत्पादनांच्या किमती 15 टक्क्यांनी वाढल्या आहेत, ज्यात पुन्हा एकदा 10 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता दिसून येते. उत्पादन खर्च आणि बाजारभाव यामध्ये 10 टक्के तफावत असून ती भरून काढण्यासाठी किंमत वाढवणे आवश्यक झाले आहे. हे वाचा-Google, Apple, Tesla चे शेअर्सचं आजपासून NSE IFSC वर ट्रेडिंग, कसा मिळणार फायदा? महामारी आणि महागाईचा दबाव कंपन्यांना अजूनही कोरोनाची भीती आहे, ज्यामुळे ते पुरेसे उत्पादन करू शकत नाहीयेत. याशिवाय क्रुडच्या वाढत्या किमतीमुळे पेंट आणि प्लॅस्टिकसारखी उत्पादने थेट महाग होत आहेत. त्याचा परिणाम ग्राहक इलेक्ट्रॉनिक्सच्या उत्पादनावरही दिसून येत आहे. इंधनाच्या महागाईमुळे मालवाहतुकीचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे एकूणच कंपन्यांवर उत्पादन खर्च वाढल्यास त्याचा बोजा ग्राहकांवर पडणार हे नक्की. परिणामी येत्या काळात जीवनावश्यक वस्तुंच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळू शकतं.
First published:

Tags: Inflation, Russia Ukraine

पुढील बातम्या