मराठी बातम्या /बातम्या /मनी /

सावधान! वीजबिलाच्या नावाने तुमची अशी होऊ शकते फसवणूक

सावधान! वीजबिलाच्या नावाने तुमची अशी होऊ शकते फसवणूक

तुम्हालाही आलाय का वीजबिलासाठी मेसेज? थांबा कोणतंही पाऊल उचलण्याआधी हे वाचा

तुम्हालाही आलाय का वीजबिलासाठी मेसेज? थांबा कोणतंही पाऊल उचलण्याआधी हे वाचा

तुम्हालाही आलाय का वीजबिलासाठी मेसेज? थांबा कोणतंही पाऊल उचलण्याआधी हे वाचा

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : तुम्हाला जर फोनवर वीजबिल भरण्यासंदर्भात मेसेज आला असेल तर सावधान, ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. वीजबिल भरलं नाही तर तुमची वीज कापली जाईल असं जर तुम्हाला मेसेज आला असेल तर तुम्ही चुकून घाबरून जाल आणि त्या नादात चुकीचा निर्णय घ्याल. तुमची एक चूक संपूर्ण खातं रिकामं करू शकते.

वीजबिल भरण्यासाठी या मेसेजमध्ये तुम्हाला एक लिंक दिली जाते. चुकून त्या लिंकवर क्लीक करून तुम्ही पेमेंट करण्याचा प्रयत्न केला. तर तुमच्या खात्याची माहिती फसवणूक करणाऱ्यांपर्यंत अगदी सहज पोहोचते. त्यामुळे तुम्ही सावध होणं अत्यंत गरजेचं आहे. अशा मेसेजपासून अधिच सावध राहण्याचा इशारा सायबर एक्सपर्टनी दिला आहे.

ऑनलाइन जे दिसतं त्यावर आपण कोणतीही शहानिशा न करता विश्वास ठेवायला लागलो आहे. याच गोष्टीचा फायदा सायबर क्राईम करणारे लोक घेतात. त्यामुळे अशा गोष्टी होतात.

या चोरांना जरी पकडलं तरी फार काळ जेलमध्ये राहावं लागत नाही. पुन्हा ते मोकाट फिरायला मोकळे असतात. ते अशी काही युक्ती वापरतात ज्यामुळे सर्वसामान्य लोक त्यामध्ये अडकतात आणि शिकार होतात.

तुम्हाला असा कोणताही मेसेज आला तर तातडीनं 1930 या नंबरवर संपर्क करून माहिती देणं आवश्यक आहे. आपला मोबाईल नंबर आणि OTP कोणालाही शेअर करू नका. cybercrime.gov.in या वेबसाईटवर तक्रार दाखल करू शकता.

तुम्हाला सायबर सेलमध्ये जाऊन तक्रार नोंदवावी लागू शकते. तिथे तुम्हाला तुमची फिर्याद द्यावी लागेल. त्यानंतर तुम्ही डिस्पुट फॉर्म भरून तुमची तक्रार दाखल करू शकता. तुम्ही अशा लिंकवर क्लीक केल्यानंतर तुमचा फोन क्लोनिंग केला जातो. तुमच्या फोनचा कंट्रोल त्यांच्याकडे जातो. तुमचं खातं रिकामं होऊ शकतं.

First published:

Tags: Cyber crime, Money