मराठी बातम्या /बातम्या /मनी /

सरकारची मोठी घोषणा, पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांपेक्षा स्वस्त असतील इलेक्ट्रिक गाड्या

सरकारची मोठी घोषणा, पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांपेक्षा स्वस्त असतील इलेक्ट्रिक गाड्या

पेट्रोल- डिझेलच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनं स्वस्त असतील. इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीची किंमत घटली असून 76 डॉलर प्रतिकिलोवॅट होईल, असा अंदाज आहे.

  • Published by:  Arti Kulkarni

नवी दिल्ली, 31 जानेवारी : पेट्रोल - डिझेलच्या गाड्यांऐवजी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचं सरकारचं धोरण आहे. नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी याबद्दल एक महत्त्वाची माहिती दिली आहे. पेट्रोल- डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनं स्वस्त होतील, असं ते म्हणाले. इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीच्या किंमतीत सुमारे 51 टक्के घट झालीय. 'टेरी' च्या 'वर्ल्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट' या कार्यक्रमात अमिताभ कांत यांनी हे सांगितलं.

किती कमी होणार किेंमत?

पेट्रोल- डिझेलच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनं स्वस्त असतील. इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीची किंमत घटली असून 76 डॉलर प्रतिकिलोवॅट होईल, असा अंदाज आहे. सध्या याची किंमत 156 रुपये युनिट आहे. वाहनांमुळे होणारं प्रदूषण टाळण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या पर्यायावर सरकार विचार करतंय. भारतात इलेक्ट्रिक वाहनांचं जास्तीत जास्त उत्पादन व्हावं यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे.

(हेही वाचा : या बजेटमध्ये इनकम टॅक्समध्ये मिळणार मोठा दिलासा? आर्थिक पाहणी अहवालाचे संकेत)

येत्या काळात हायड्रोजनचाही होणार वापर

देशातल्या दोन समस्यांवर उपाय काढण्याची गरज आहे. शहरीकरण आणि सार्वजनिक परिवहन यांचं स्वरूप निश्चित करण्यावर भर द्यायला हवा, असं अमिताभ कांत म्हणाले. शहरांतली CNG वर आधारित परिवहन व्यवस्था त्याचबरोबर सार्वजनिक वाहतुकीमध्ये इंधनाच्या रूपात हायड्रोजनच्या वापरावर भर देण्याचाही सरकाराचा प्रस्ताव आहे.

इलेक्ट्रिक वाहनं का महत्त्वाची?

टेरीचे संचालक अजय माथुर म्हणाले, रस्ते हे अर्थव्यवस्थेमधलं प्रमुख क्षेत्र आहे. त्यामुळेच अशा क्षेत्रांना कार्बनमुक्त करण्याची गरज आहे आणि 100 टक्के हरित विजेवर आधारित वाहनांना प्रोत्साहन देणंही आवश्यक आहे. त्यामुळेच इलेक्ट्रिक वाहनं महत्त्वाची आहेत.

=======================================================================================

First published:

Tags: Environment, Vehicles