मराठी बातम्या /बातम्या /मनी /

थंडीत पुन्हा महागणार अंडी; गेल्या 3 वर्षातील किंमतीचा रेकॉर्ड मोडीत

थंडीत पुन्हा महागणार अंडी; गेल्या 3 वर्षातील किंमतीचा रेकॉर्ड मोडीत

20 डिसेंबर रोजी अंड्याच्या ओपन मार्केट रेटने मागील तीन वर्षातील ऑफिशियल रेटचा रेकॉर्ड तोडला आहे. एक-दोन महिन्यात नाही, तर केवळ 24 तासात अंड्याचा भाव उच्चांकी स्तरावर पोहचला आहे.

  • Published by:  Karishma Bhurke
नवी दिल्ली, 21 डिसेंबर : थंडीच्या दिवसांत पुन्हा एकदा अंड्याचे भाव वाढले आहेत. अंड्याचा भाव (egg price today) गेल्या 3 ते 4 वर्षातील रेकॉर्ड तोडण्याच्या तयारीत आहे. 20 डिसेंबर रोजी अंड्याच्या ओपन मार्केट रेटने मागील तीन वर्षातील ऑफिशियल रेटचा रेकॉर्ड तोडला आहे. एका दिवसापूर्वी देशातील सर्वात मोठ्या बरवाला ओपन मार्केटमध्ये अंड्याची 550 रुपये प्रति शेकडापर्यंत विक्री झाली आहे. येत्या दिवसात हा रेट आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशातील सर्वात मोठ्या बरवाला बाजारपेठेत 100 अंड्यांचा अधिकृत भाव 420 रुपयांवरून 521 रुपयांवर पोहचला आहे. एक-दोन महिन्यात नाही, तर केवळ 24 तासात अंड्याचा भाव उच्चांकी स्तरावर पोहचला आहे.

(वाचा - Corona Impact: एप्रिल-नोव्हेंबर 2020 मध्ये सोन्याच्या आयातीत 40 टक्क्यांची घसरण)

कोंबड्यांमध्ये आरडी नावाचा आजार पसरला असून अंड्यांचं उत्पादन कमी झाल्याची चर्चा आहे. आरडी या आजारामुळे कोंबड्यांना पोटात त्रास होतो, त्यामुळे त्यांना सतत औषध दिलं जातं. त्याना खाणं दिलं जात नाही. त्यामुळे खुराक न मिळाल्याने कोंबडी अंड देत नाही, असं काहींचं म्हणणं आहे.

(वाचा - KDMC ची भन्नाट शक्कल! या योजनेतून शहर तर स्वच्छ होईलच पण गरीबांचं पोटही भरेल)

परंतु देशातील सर्वात मोठी अंड्यांची बाजारपेठ असलेल्या बरवालातील व्यापारी ही केवळ अफवा असल्याचं सांगत आहेत. अंडी बाजारातील जाणकारांनी, मोठे व्यापारी अंडी महाग होण्यासाठी, अंडी महाग होण्याच्या दृष्टीने ही एक युक्ती करत असल्याचं म्हटलं आहे.
First published:

पुढील बातम्या