नवी दिल्ली, 06 नोव्हेंबर: खाद्यतेल (Edible Oil Rates) आपल्याला दररोज स्वयंपाकासाठी लागतं. त्याच्या वापराशिवाय दररोजचा स्वयंपाक करणं अशक्य आहे. मागील काही काळापासून खाद्यतेलाच्या किमतीत (Edible Oil Price Increase) सातत्यानं वाढ सुरू होती. एक किलो तेलाचे दर 200 रुपयांच्या घरात जाऊन पोहचले होते. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. नागरिकांसाठी आता एक आनंदाची बातमी आली आहे. खाद्यतेलाच्या वाढत्या किमतींना (Edible Oil Price) लगाम घालण्यासाठी मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. कच्चं पाम तेल, कच्चं सोयाबीन तेल आणि कच्चं सूर्यफूल तेल यावरील मूलभूत शुल्क (Basic duty) 2.5 टक्क्यांवरून शून्यावर आणलं आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं याबाबत माहिती दिली आहे.
कच्च्या पाम तेलावरील (Palm oil) कृषी उपकर 20 टक्क्यांवरून 7.5 टक्के केला आहे. तर, कच्चं सोयाबीन तेल (Soyabean Oil) आणि सूर्यफूल तेलावरील (Sunflower Oil) उपकर 5 टक्के करण्यात आला आहे. या कपातीनंतर, कच्च्या पाम तेलासाठी 7.5 टक्के व सोयाबीन आणि सूर्यफूल तेलासाठी 5 टक्के एकूण शुल्क आकारलं जाणार आहे.
Govt has cut the basic duty on Crude Palm Oil, Crude Soyabean Oil and Crude Sunflower Oil from 2.5% to nil in a bid to reign in continuous rise in the cooking oil prices since past one year: Ministry of Consumer Affairs, Food & Public Distribution pic.twitter.com/RJIYvCe3yR
— ANI (@ANI) November 5, 2021
यासह आरबीडी पामोलिन तेल, रिफाइंड सोयाबीन आणि शुद्ध सूर्यफूल तेलावरील बेसिक ड्युटी 32.5 टक्क्यांवरून 17.5 टक्के करण्यात आली आहे. ही कपात करण्यापूर्वी कच्च्या खाद्यतेलांवर 20 टक्के कृषी उपकर आकारला जात होता. मात्र, आता कपात केल्यानं कच्च्या पाम तेलावर 8.25 टक्के, कच्च्या सोयाबीन तेलावर आणि सूर्यफूल तेलावर 5.5 टक्के शुल्क आकारण्यात येणार आहे.
हे वाचा-एका वर्षात 1 लाखाचे झाले 18 लाख, ₹4 चा शेअर पोहोचला 75 रुपयांवर
खाद्यतेलाच्या किमतीमध्ये किलोमागं 20 रुपयांपर्यंत घट
कच्च्या खाद्यतेलांवरील बेसिक ड्युटी कमी झाल्यानं देशभरातील प्रमुख किरकोळ बाजारात खाद्यतेलाच्या किमती 5 ते 20 रुपयांनी कमी झाल्या आहेत. आयात शुल्कात कपात करण्याबरोबरच सरकारनं केलेल्या अन्य उपाययोजनांमुळे खाद्यतेलाच्या किमती खाली आल्या आहेत, अशी माहिती अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी दिली. ब्रँडेड तेल कंपन्यांनीही नवीन स्टॉकसाठी सुधारित दर लागू केले आहेत, असेही पांडे यांनी शुक्रवारी (5 नोव्हेंबर 2021) स्पष्ट केलं.
हे वाचा-FD Interst Rates : SBI सह 'या' तीन बँकांकडून FD वर आकर्षक व्याजदर, वाचा सविस्तर
खाद्य तेलाच्या किमती काही प्रमाणात कमी झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं पेट्रोल-डिझेलच्या किमती देखील कमी केल्या आहेत. शासनानं खाद्यतेल आणि इंधनाचे दर कमी करून जनतेला दिवाळी भेट दिल्याची चर्चा आहे. हे दर किती दिवस स्थिर राहणार, याकडं आता सर्वांचं लक्ष आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Modi government