Home /News /money /

सर्वसामान्यांना मोठा दिलासा! खाद्यतेल आणखी स्वस्त होणार; सरकारने उचललं महत्त्वाचं पाऊल

सर्वसामान्यांना मोठा दिलासा! खाद्यतेल आणखी स्वस्त होणार; सरकारने उचललं महत्त्वाचं पाऊल

खाद्यतेलांच्या किमती कमी होण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

नवी दिल्ली, 06 जुलै : रशिया-युक्रेन युद्धामुळे गेल्या काही महिन्यांत वधारलेल्या खाद्यतेलाच्या किमती (Edible Oil Prices) आता आणखी कमी होण्याची चिन्हं आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलबिया आणि धान्याच्या किमती वाढल्यामुळे देशांतर्गत खाद्यतेलाचे भावही भडकले होते; मात्र सरकारनं केलेल्या उपाययोजनांमुळे गेल्या महिन्यात कंपन्यांनी तेलाचे दर 10 ते 15 रुपयांनी कमी केले होते. हे दर आणकी कमी करण्याची गरज असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. त्यासाठी आज (6 जुलै) खाद्यतेल कंपन्यांसोबत (Edible Oil Companies) एक बैठकही घेण्यात आली. त्यामध्ये खाद्यतेलाचे दर कमी करण्याबाबत सरकारनं कंपन्यांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता खाद्यतेलाच्या किमती आणखी 12 रुपयांनी (Prices To Reduce By 12 Ruppess) कमी होण्याची शक्यता आहे. खाद्यतेल सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होण्यासाठी सरकार काही उपाययोजना करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कंपन्यांनी गेल्या महिन्यात खाद्यतेलाच्या किमती कमी केल्या होत्या; मात्र यात अजूनही 10 ते 15 टक्क्यांची कपात होऊ शकते असं सरकारचं म्हणणं आहे. त्या संदर्भात आज (6 जुलै) खाद्यतेल कंपन्यांसोबत सरकारची एक बैठक पार पडली. यात खाद्यतेलाच्या किमतीत कपात करण्याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने खाद्यतेल कंपन्यांना एका आठवड्यात तेलाचे दर कमी करण्याबाबत सांगितलं आहे, असं वृत्त टीव्ही 9 हिंदीने दिलं आहे. हे वाचा - हॉटेल-रेस्टॉरंट बिलात सर्व्हिस चार्ज घेत असेल तर काय कराल? नियम काय आहे? या बैठकीत कंपन्यांनी खाद्यतेलाचे दर कमी करण्यासाठी तयार असल्याचं मान्य केलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या किमतीत घट झाल्याचं पाहायला मिळेल. भारतात एकूण गरजेच्या निम्म्या तेलाची आयात इतर देशांमधून केली जाते. गेल्या काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमती वाढल्या होत्या. त्यामुळे देशांतर्गत किरकोळ बाजारात खाद्यतेलाचे भाव वधारले. गेल्या काही महिन्यांत सरकारनेही काही उपाय केले. तसंच आता आंतरराष्ट्रीय बाजारातही सुधारणा होते आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात खाद्यतेलाचे भाव कमी झाले आहेत; मात्र घाऊक (Wholesale) दराच्या तुलनेत किरकोळ (Retail) दरांत घट झाली नसल्याचं सरकारचं म्हणणं आहे. हे वाचा - PM Ujjwala Yojana: ‘या’ ग्राहकांना गॅस सिलिंडरवर पुन्हा मिळणार सबसिडी, फॉलो करा सोपी प्रोसेस सध्या खाद्यतेलाचे घाऊक दर कमी झाले आहेत. पीटीआय रिपोर्टनुसार, इतर देशांमध्ये खाद्यतेलाच्या किमतीत ऐतिहासिक घट झाली आहे. कच्चं पामतेल आणि पामोलीन तेलाचे दर कमी झाले आहेत. सरकारी रिफायनिंग कंपन्यांना 20 लाख टन सोयाबीन आणि 20 लाख टन सूर्यफूल तेल प्रति वर्षी आयात करण्याचा कोटा सरकारनं लागू केला होता. त्यामुळे सोयाबीन तेलाच्या दरातही घट झाली आहे. याचा परिणाम म्हणून घरगुती तेल कंपन्यांच्या खर्चात घट झाली. हाच फायदा ग्राहकांना द्यावा, असं सरकारचं म्हणणं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमतीत 40 ते 50 रुपयांची घट झाली असल्याचं वृत्त जूनच्या शेवटी पीटीआयनं दिलं होतं; मात्र अजूनही कंपन्या घाऊक दरातल्या कपातीचा पूर्ण फायदा ग्राहकांना देत नसल्यानं सरकारनं आता कंपन्यांसोबत चर्चा केली आहे. त्यामुळे लवकरच खाद्यतेलाचे भाव आणखी कमी होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
First published:

Tags: Money

पुढील बातम्या