मोदी, माल्ल्या, चोक्सीच्या मालमत्ता जप्त करून 80 टक्के वसुली; आतापर्यंत 9371 कोटी रुपये बँकांमध्ये ट्रान्सफर

ED Seized 18170 crore: मल्ल्या, चोक्सी आणि नीरव मोदीच्या विविध मालमत्ता जप्त करून सक्तवसुली संचालनालयानं जवळपास 80 टक्के थकबाकी वसूल केली आहे.

ED Seized 18170 crore: मल्ल्या, चोक्सी आणि नीरव मोदीच्या विविध मालमत्ता जप्त करून सक्तवसुली संचालनालयानं जवळपास 80 टक्के थकबाकी वसूल केली आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 23 जून : भारतातील विविध बँकांचं कर्ज बुडवून फरार झालेले उद्योगपती विजय माल्या, (Vijay Mallya) मेहुल चोक्सी (Mehul Choksi) आणि नीरव मोदी (Neerav Modi) यांच्या विविध मालमत्ता जप्त करून ईडीनं (Enforcement Directorate) आतापर्यंत 18,170 कोटी रुपये जप्त केले आहेत. त्यापैकी 9371.17 कोटी रुपये हे सरकार (Government) आणि संबंधित बँकांना (PSU) वर्ग  करण्यात आल्याची माहिती ED (Enforcement Directorate)  दिली आहे. उद्योगपती विजय मल्ल्याच्या नावे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) विविध शाखांमध्ये मिळून 9000 कोटींची थकबाकी आहे. तर नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी पंजाब नॅशनल बँकेतून कोट्यवधींचं कर्ज घेतलं आहे. पीएमएलए (Prevention of money laundering act) कायद्यांतर्गत ED नं ही कारवाई केली आहे. असे शोधले धागेदोरे भारतातील आणि परदेशातील काहीजणांना हाताशी धरून हे तिघे पैशांची अफरातफर करत असत. त्यांच्यातील वेगवेगळ्या व्यवहारांचे धागेदोरे शोधत या तिघांनी कधी आणि कुठल्या मालमत्तांमध्ये पैसे गुंतवले, हे शोधून काढल्याचा दावा ईडीनं केला आहे. अनेक मालमत्ता या इतरांच्या नावे घेण्यात आल्या असल्या तरी त्यासाठी वापरण्यात आलेल्या पैशांचे धागेदोरे हे या उद्योगपतींनी विविध सरकारी बँकांमधून घेतलेल्या कर्जापर्यंत पोहोचत असल्याचं ईडीच्या लक्षात आलं. त्यानंतर पीएमएलए कायद्यानुसार या मालमत्ता ताब्यात घेऊन ईडीनं जवळपास 80 टक्के थकबाकी वसूल केल्याचा दावा ट्विटरवरून केला आहे. प्रत्यार्पणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात उद्योगपती विजय मल्ल्या आणि नीरव मोदी हे सध्या लंडनमध्ये आहेत, तर मेहुल चोक्सी अँटिग्वामध्ये असल्याचं उघड झालं आहे. 8 दिवसात बदणार हे महत्त्वाचे आर्थिक नियम, नुकसान टाळण्यासाठी जाणून घ्या सविस्तर त्यांना ताब्यात घेऊन भारतात आणण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यापैकी विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयानं मान्यता दिली असून युकेच्या उच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. युकेतील सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याची मल्ल्याची मागणी फेटाळण्यात आल्यामुळे त्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. तर नीरव मोदीच्या प्रत्यार्पणालाही वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टानं मान्यता दिली आहे. ED च्या कामगिरीचं कौतुक काही दिवसांपूर्वीच ईडीनं 1357 कोटी रुपयांचे शेअर्स बँकांना वर्ग केले होते. हे शेअर्स विकून बँकांनी कर्जवसुली केली होती. देशातील कायद्यांचा योग्य वापर करत बँकांकडून घेतलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी ईडीनं उचललेल्या पावलांचं सध्या कौतुक होत आहे.
    Published by:desk news
    First published: