• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • 'या' कंपन्यांवर ईडीचं संकट! 61.38 ची मालमत्ता जप्त, रायगडातील शेतजमिनीचाही समावेश

'या' कंपन्यांवर ईडीचं संकट! 61.38 ची मालमत्ता जप्त, रायगडातील शेतजमिनीचाही समावेश

अंमलबजावणी संचालनालयाने भूषण स्टील लिमिटेड (BSL), भूषण एनर्जी लिमिटेड (BEL) आणि अन्य काही कंपन्यांविरोधात सुरू असलेल्या चौकशीचा भाग म्हणून 61.38 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे.

 • Share this:
  मुंबई, 09 नोव्हेंबर: अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate attached assets worth rs 61 38 crore of Bhushan Steel Bhushan Energy) भूषण स्टील लिमिटेड (BSL), भूषण एनर्जी लिमिटेड (BEL) आणि अन्य काही कंपन्यांविरोधात सुरू असलेल्या चौकशीचा भाग म्हणून 61.38 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. मंगळवारी एका निवेदनात, एजन्सीने सांगितले की सार्वजनिक निधीच्या गैरवापराशी संबंधित तपासात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा, 2002 (PMLA) अंतर्गत आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. ईडीने जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये राज्यातील रायगड याठिकाणची काही शेतजमीन (Agricultural Land in Raidgad), बीएसएलच्या माजी प्रवर्तकांच्या नियंत्रणाखाली असलेल्या संस्थांची गोदामे इ. मालमत्तांचा समावेश आहे. मनीकंट्रोलने याबाबत वृत्त दिले आहे. भूषण स्टील लिमिटेड, भूषण एनर्जी लिमिटेड आणि अन्य काहींविरोधात पब्लिक फंड्समध्ये घोटाळा केल्याच्या प्रकरणी सीरियस फ्रॉड इनवेस्टिगेशन ऑफिस  (SFIO) ने तक्रार दाखल केली होती. याच आधारे ईडीने मनी लाँड्रिंग अंतर्गत तपास सुरू केला SFIO ने 16 ऑगस्ट 2019 रोजी कंपनी कायदा, 2013 आणि भारतीय दंड संहिता, 1860 च्या विविध तरतुदींनुसार तक्रार दाखल केली होती. हे वाचा-Bitcoin Price Today: बिटकॉइन 68 हजार डॉलरच्या पार, किंमत ऑल टाइम हायवर PMLA अंतर्गत तपासादरम्यान ईडीच्या समोर हे उघड झाले की, BSL चे माजी प्रमोटर नीरज सिंघल, बी बी सिंघल आणि अन्य काही जणांनी कंपनीतून फंड डायव्हर्ट केला होता. ईडीने अशी माहिती दिली की, भूषण एनर्जी लिमिटेडने त्यांच्या सहकारी कंपन्यांना दिलेल्या असुरक्षित कर्जाच्या नावाखाली गुंतागुंतीचे व्यवहार करून सार्वजनिक निधीचा अपहार केला. हे वाचा-RBIचे राज्यातील या बँकेवर निर्बंध! काढता येणार नाही ₹5000 पेक्षा जास्त रक्कम या घोटाळ्यातून या प्रमोटर्सनी मोठा निधी मिळवलेला आणि मिळालेल्या रकमेचा उपयोग त्यांनी विविध मालमत्ता विकत घेण्यासाठी केला असल्याचा दावाही ईडीने केला आहे. एजन्सीने सांगितले की या मालमत्तांमध्ये कोणतीही समस्या नाही हे दाखवण्यासाठी बरेच गुंतागुंतीचे व्यवहार केले गेले.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: