मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Economic Survey 2020: जाणून घ्या अर्थव्यवस्थेच्या 10 महत्त्वाच्या गोष्टी

Economic Survey 2020: जाणून घ्या अर्थव्यवस्थेच्या 10 महत्त्वाच्या गोष्टी

New Delhi: Union Finance Minister Nirmala Sitharaman chairs a pre-budget meeting with industrialists, at Finance Ministry in New Delhi, Thursday, Dec. 19, 2019. (PTI Photo/Subhav Shukla)(PTI12_19_2019_000086B)

New Delhi: Union Finance Minister Nirmala Sitharaman chairs a pre-budget meeting with industrialists, at Finance Ministry in New Delhi, Thursday, Dec. 19, 2019. (PTI Photo/Subhav Shukla)(PTI12_19_2019_000086B)

'अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ दूर होऊन भारत पुन्हा जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था होण्यासाठी सज्ज आहे.'

  • Published by:  Ajay Kautikwar

नवी दिल्ली 31 जानेवारी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी आज संसदेत आर्थिक सर्व्हेक्षण(Economic Survey 2020 ) सादर केलं. अर्थसंक्लपीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानंतर सीतारमन यांनी लोकसभेत आर्थिक अहवाल सादर केला. अर्थसंक्लप सादर होण्याच्या एक दिवस आधी अशा प्रकारचा अहवाल दरवर्षी सादर केला जातो. या अहवालातून देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती कशी आहे याचं चित्र स्पष्ट केलं जातं.

काय म्हणते आर्थिक सर्वेक्षण 2020?

वित्तीय वर्ष 2021 मधील GDPची वाढ 6 ते 6.5 टक्के असण्याची शक्यता.

आथिर्क वर्ष 2021 आथिर्क आघाडीवर आव्हाने उभी करण्याची अपेक्षा आहे.

आर्थिक वाढ पुनरुज्जीवित करण्यासाठी वित्त वर्ष 2020 साठी वेगळ्या वित्तीय उपाय योजनांची आवश्यकता असू शकते.

मागणीला चालना देण्यासाठी काउंटर-चक्रीय आर्थिक टप्पे आवश्यक आहेत.

यावर्षीपासून आक्रसलेल्या अर्थव्यवस्थेला गती मिळण्याची शक्यता.

राष्ट्रपतींच्या भाषणात CAAचा उल्लेख, विरोधी खासदारांनी दिल्या शेम शेमच्या घोषणा

महागाई आटोक्यात असल्याने काळजीचं कारण नाही. सरकारचं महागाईवर नियंत्रण आहे.

पुढच्या काळात अमेरिका आणि इराणमध्ये तणाव निर्माण झाल्यास त्याचा ताण अर्थव्यवस्थेवर पडण्याची शक्यता.

GSTच्या माध्यमातून जे करसंकलन केलं जातं त्यात अमुलाग्र सुधारण्याची होण्याची शक्यता आहे.

देशांतर्गत मागणीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार अनेक उपाययोजना करणार आहे.

अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ दूर होऊन भारत पुन्हा जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था होण्यासाठी सज्ज असल्याची ग्वाही.

हेही वाचा...

ऑपरेशन कोरोना: चीनमध्ये अडकलेल्या 400 भारतीयांच्या सुटकेसाठी विमान रवाना

Budget 2020: वडिलांचं निधन झाल्यानंतरही हे अधिकारी करताहेत 'बजेट'चं काम

First published: