मोदी सरकारला धक्का! भारतीय अर्थव्यवस्थेची जागतिक स्तरावर मोठी घसरण

मोदी सरकारला धक्का! भारतीय अर्थव्यवस्थेची जागतिक स्तरावर मोठी घसरण

Economy, India - भारताच्या अर्थव्यवस्थेचा जागतिक स्तरावर नंबर एकदम खाली घसरलाय

  • Share this:

मुंबई, 02 ऑगस्ट : भारताचा जगातल्या अर्थव्यवस्थेत 5वा नंबर होता. भारताच्या डोक्यावरचा हा मुकुट काढला गेलाय. आता भारत 7व्या स्थानावर पोचलाय. 2018मध्ये भारतीय अर्थव्यवस्था सुस्त झालीय. याचा हा परिणाम आहे. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार 2018मध्ये ब्रिटन आणि फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेची वाढ भारताच्या तुलनेत जास्त नोंदवली गेलीय. म्हणूनच ब्रिटन 5व्या स्थानावर तर फ्रान्स 6व्या स्थानावर आलेत. तर भारत 5व्या स्थानावरून सरकून 7व्या नंबरवर आलाय. या यादीत अमेरिका कायमच टाॅपवर आहे.

या आकडेवारी नुसार भारताची अर्थव्यवस्था 2018मध्ये 3.01 टक्के वाढली होती. तर 2017मध्ये 15.23 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेत 2018मध्ये 6.81 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. 2017मध्ये ती 0.75 टक्के वाढली होती. फ्रान्सबद्दल सांगायचं तर 2018मध्ये त्यांची अर्थव्यवस्था 7.33 टक्के वाढली होती. पण 2017मध्ये त्यात फक्त 4.85 टक्केच वाढ झाली होती. अशा प्रकारे भारतीय अर्थव्यवस्था 2017च्या तुलनेत 2018मध्ये सुस्त राहिली होती. म्हणूनच रँकिंगमध्ये भारताची पिछेहाट झाली.

पुन्हा पेट्रोलचे दर झाले कमी, 'हे' आहेत आजचे भाव

2017मध्ये भारताच्या डोक्यावर हा मुकुट होता. त्यावेळी ब्रिटन 6व्या स्थानावर आणि फ्रान्स 7व्या स्थानावर होते. अर्थतज्ज्ञांच्या मते डाॅलरपुढे रुपया कमकुवत झाल्यानं भारत 7व्या स्थानावर गेला.

सरकारनं 'या' पदासाठी मागवलेत अर्ज, महिना 2.25 लाख रुपये पगार

2017मध्ये डाॅलरच्या तुलनेत रुपया 3 टक्के वाढला होता. पण 2018मध्ये रुपयाची 5 टक्के घसरण झाली. मोदी सरकारनं पुढच्या 5 वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेला 5 ट्रिलियन डाॅलरपर्यंत पोचवायचं लक्ष्य ठेवलंय. त्यामुळे जागतिक बँकेची ही आकडेवारी चिंता वाढवते.

निर्णय मोदींनी घ्यावा,ट्रम्प यांच्याकडून पुन्हा काश्मीरप्रश्नी मध्यस्थीसाठी ऑफर

दरम्यान, अर्थसंकल्प सादर झाल्यावर देशाची अर्थव्यवस्था वर्ष 2025 पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर करण्याचा संकल्प साध्य करण्यासाठी आवश्यक असणारा रोडमॅप या अर्थसंकल्पातून सादर झाला असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प सादर केल्याबाबत त्यांनी पंतप्रधान आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे अभिनंदन करतानाच आभारही मानले होते.

VIDEO: शपथ घेणारे तरी त्या पक्षात राहतील का, मुख्यमंत्र्यांच्या टार्गेटवर राष्ट्रवादी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: modi
First Published: Aug 2, 2019 01:05 PM IST

ताज्या बातम्या