Home /News /money /

FDI Report : महाराष्ट्रात विदेशी गुंतवणूकदारांच्या संख्येत घट, 'या' राज्यांकडे कल वाढला

FDI Report : महाराष्ट्रात विदेशी गुंतवणूकदारांच्या संख्येत घट, 'या' राज्यांकडे कल वाढला

महाराष्ट्रात सादर करण्यात आलेल्या आर्थिक पाहणी अहवालात यंदा राज्याचा विकास दर 12.1 टक्के राहील, तर देशाचा विकास दर 8.9 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

    मुंबई, 11 मार्च : गेल्या वर्षी राज्यात थेट परकीय गुंतवणुकीत मोठी घट झाल्याचे महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आले आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात एकूण 48,633 कोटींची थेट परकीय गुंतवणूक झाली आहे, जी गेल्या वर्षी 1,19,734 कोटी होती. गुरुवारी महाराष्ट्र विधानसभेत मांडण्यात आलेल्या अहवालात एफडीआयमध्ये कर्नाटक आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. येथे 2021-22 मध्ये 1,02,866 कोटी एफडीआय आले आहे. यानंतर गुजरात 1,01,145 कोटी रुपयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. एप्रिल 2000 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत महाराष्ट्रात 9,59,746 कोटी एफडीआय होते, जे देशाच्या एकूण एफडीआयच्या 28.2 टक्के होते, असे सर्वेक्षणात म्हटले आहे. Insurance Claim: युद्धामुळे मृत्यू झाल्यास करता येतो इन्शुरन्स क्लेम, जाणून घ्या अधिक माहिती देशातील विदेशी गुंतवणूकही कमी झाली डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड (DPIIT) च्या आकडेवारीनुसार, एप्रिल-डिसेंबर 2021 या कालावधीत भारतात थेट विदेशी गुंतवणुकीचा (FDI) इक्विटी फ्लो 16% ने घसरून USD 43.17 बिलियन झाला आहे, जो मागील याच कालावधीत USD 51.47 बिलियन डॉलर होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत एकूण FDI (ज्यामध्ये इक्विटी, पुन्हा गुंतवलेली कमाई आणि इतर भांडवलाचा समावेश आहे) US 60.34 बिलियन डॉलर आहे, जे एका वर्षापूर्वी 67.5 अब्ज डॉलर होते. Share Market: इंग्लंड, कॅनडा आणि सौदी अरेबियाला मागे टाकत भारतीय शेअर बाजार पाचव्या स्थानी इक्विटी गुंतवणुकीतही घट झाली 2021-22 च्या तिसर्‍या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर 2021) इक्विटी फ्लो देखील 2020 च्या समान कालावधीत 21.46 अब्ज डॉलर वरून 12 बिलियन डॉलरवर घसरला असल्याचे डेटा दर्शवतो. तिसर्‍या तिमाहीत एकूण FDI $26.16 बिलियन पासून कमी होऊन $17.94 बिलियन झाले आहे. सेवा क्षेत्रात सर्वात वेगवान वाढ अपेक्षित महाराष्ट्रात सादर करण्यात आलेल्या आर्थिक पाहणी अहवालात यंदा राज्याचा विकास दर 12.1 टक्के राहील, तर देशाचा विकास दर 8.9 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये सर्वात मोठा वाटा सेवा क्षेत्राचा असेल. कृषी आणि संलग्न विकास दर 4.4 टक्के, उद्योग क्षेत्र 11.9 टक्के आणि सेवा क्षेत्राचा 13.5 टक्के असू शकतो. यावर्षी पीक उत्पादनात 3 टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Business News, Investment, Money

    पुढील बातम्या