Home /News /money /

Economic Survey 2022 : केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून इकोनॉमिक सर्व्हे सादर, जीडीपी दर 8-8.50 टक्के राहण्याचा अंदाज

Economic Survey 2022 : केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून इकोनॉमिक सर्व्हे सादर, जीडीपी दर 8-8.50 टक्के राहण्याचा अंदाज

देशाच्या अर्थव्यवस्थेत मुख्य भूमिका असणाऱ्या कृषी क्षेत्रात 3.9 टक्के, तर उद्योग क्षेत्रात 11.8 टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

    मुंबई, 31 जानेवारी : आर्थिक सर्वेक्षण अहवाल (Economic Survey 2022) आज लोकसभेत (Lok Sabha) सादर करण्यात आला आहे. पुढील आर्थिक 2022-23 वर्षात भारताचा विकास दर (GDP) 8 ते 8.50 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitaraman) यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल लोकसभेच्या पटलावर मांडला. त्याशिवाय देशाच्या अर्थव्यवस्थेत मुख्य भूमिका असणाऱ्या कृषी क्षेत्रात 3.9 टक्के, तर उद्योग क्षेत्रात 11.8 टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कृषी क्षेत्र आणि औद्योगिक विकासामुळे मदत मिळेल चालू आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राची वाढ 3.9 टक्के राहील, असे सर्वेक्षणात म्हटले आहे. या आर्थिक वर्षात औद्योगिक वाढ 11.8 टक्के राहील. या आर्थिक वर्षात नोव्हेंबरपर्यंत 89,000 कोटी रुपयांहून अधिक IPO द्वारे उभारण्यात आल्याचेही यात म्हटले आहे. महागाई अनियंत्रित होणार नाही या सर्वेक्षणात महागाईचा दर आटोक्यात राहणे अपेक्षित आहे. अर्थव्यवस्थेसाठी ही चांगली बाब आहे. महागाई आटोक्यात राहिल्यास रिझर्व्ह बँकेवर रेपो वाढवण्याचा फारसा दबाव राहणार नाही. त्यामुळे कर्ज महाग होणार नाही. Budget 2022 | केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ‘या’ 10 घोषणा देऊ शकतात सर्वसामान्यांना दिलासा! अर्थव्यवस्थेच्या आव्हानाला सामोरे जाण्यास सक्षम आर्थिक सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, अर्थव्यवस्थेचे सर्व इंडिकेटर्स हे दर्शवत आहेत की आव्हानांना तोंड देण्यासाठी आपली अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत आहे. त्याला कृषी आणि औद्योगिक वाढीचा पाठिंबा मिळत आहे. चालू आर्थिक वर्षात जुलै-सप्टेंबर या कालावधीत अर्थव्यवस्थेचा वेग वाढला आहे. यासह, ते कोरोनाच्या आधीच्या पातळीवर येण्यात यशस्वी झाले आहे. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 70 डॉलर अपेक्षित कच्च्या तेलाच्या किमतींचा आपल्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होतो. कच्चे तेल महाग झाल्यावर आमच्यासाठी अडचणी वाढतात. भारत आपल्या गरजेच्या 80 टक्के कच्च्या तेलाची आयात करतो. कच्च्या तेलाचा दर आता प्रति बॅरल 90 डॉलरच्या जवळ पोहोचला आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 70-75 डॉलर असा अंदाज आहे. BUdget 2022 : बजेटच्या तारखेपासून ते अर्थापर्यंत; बजेटबद्दल लोकांनी गुगलवर सर्च केल्या ‘या’ पाच गोष्टी आर्थिक सर्वेक्षणानंतर बाजारात तेजी आर्थिक सर्वेक्षणानंतर शेअर बाजारात कमालीची वाढ झाली आहे. सेन्सेक्स 1000 अंकांच्या वर गेला आहे. सकाळी शेअर बाजार तेजीत उघडला होता. आर्थिक सर्वेक्षणात वाढीच्या उच्च अंदाजामुळे बाजार पॉझिटिव्ह दिसत आहे. याचे कारण उच्च वाढीमुळे मागणी वाढेल, ज्याचा थेट परिणाम कंपन्यांच्या कामगिरीवर होईल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Budget, Nirmala Sitharaman, Union budget

    पुढील बातम्या