बँकिंग क्षेत्रावर मंदीचं सावट,आता या सर्वात मोठ्या बँकेत होणार नोकरकपात

बँकिंग क्षेत्रावर मंदीचं सावट,आता या सर्वात मोठ्या बँकेत होणार नोकरकपात

HSBC ने भारतात तांत्रिक विभागात काम करणाऱ्या 150 कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढून टाकलं आहे. यामध्ये पुणे आणि हैदराबादमधल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. HSBC मध्ये 2 लाख 38 हजार कर्मचारी आहेत. यामध्ये आता काही कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येणार आहे.

  • Share this:

मुंबई, 23 ऑगस्ट : आर्थिक मंदीमुळे जगभरात सगळ्याच क्षेत्रांतल्या नोकऱ्यांवर संकट आलं आहे. बँकिंग क्षेत्रातही अशीच स्थिती आहे. डॉइश बँकेच्या पाठोपाठ आता HSBC नेही नोकरकपात करण्याचं जाहीर केलं आहे. डॉइश बँकेने जगभरातल्या शाखांमध्ये सुमारे 18 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढून टाकलं आहे. आता ब्रिटिश मल्टीनॅशनल कंपनी HSBC सुद्धा कंपनीच्या खर्चात कपात करणार आहे.

HSBC ने भारतात तांत्रिक विभागात काम करणाऱ्या 150 कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढून टाकलं आहे. यामध्ये पुणे आणि हैदराबादमधल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. HSBC मध्ये 2 लाख 38 हजार कर्मचारी आहेत. यामध्ये आता काही कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येणार आहे. भारतात पुणे आणि हैदराबादमध्ये तांत्रिक विभागात 14 हजार कर्मचारी आहेत.

ही कंपनी पुढच्या 6 महिन्यांत 3 हजार जणांना देणार नोकरी

कंपनीच्या प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार, HSBC आपल्या ग्राहकांना चांगल्यातली चांगली सर्व्हिस देण्यासाठी कंपनी कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचं मूल्यांकन करत असते. कंपनीचे CEO जॉन फ्लिंट यांनी दीड वर्षं काम करून राजीनामा दिला. आता त्यांची जागा नोअल क्विन यांनी घेतली आहे.

आर्थिक मंदीमुळे Cisco आणि Cognizant या कंपन्याही कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. याआधी पार्ले प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनेही बिस्किटांची विक्री घटल्यामुळे 10 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे.

आर्थिक मंदी आणि बेरोजगारीच्या संकटाला तोंड देण्याचं आव्हान पूर्ण जगासमोर आहे. त्यातच भारतात मोठ्या प्रमाणावर नोकरकपात होत असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे.

खूशखबर : MIDC मध्ये नोकरीच्या संधी, या तारखेपर्यंत भरा अर्ज

=================================================================================================

VIDEO: एअर इंडिया अडचणीत येण्याची शक्यता, इतर टॉप 18 बातम्या

First Published: Aug 23, 2019 03:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading