Home /News /money /

PF खात्यावर सहज लोन उपलब्ध; व्याजदर किती? कसा कराल अर्ज?

PF खात्यावर सहज लोन उपलब्ध; व्याजदर किती? कसा कराल अर्ज?

पीएफमध्ये जमा केलेल्या पैशावर मिळणाऱ्या कर्जाला पीपीएफ कर्ज (PPF Loan) म्हणतात. पर्सनल लोन प्रमाणे तुम्ही यात कर्ज घेऊ शकत नाही. यासाठी तुम्हाला ठेव रकमेच्या आधारावर पैसे मिळतात.

    मुंबई, 29 ऑक्टोबर : तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्ही पीएफ खात्यात (Provident Fund Account) पैसे जमा केले असतील. पीएफ खात्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे खातेधारकांना पैसे जमा केल्यानंतर काही वर्षांनी व्याजासह पैसे परत मिळतात. पण तुम्हाला माहिती आहे का की पीएफ खात्यावर विम्यासोबत तुम्हाला कर्जाची (Loan On PF Account) सुविधाही मिळते. गरज भासल्यास तुम्ही पीएफ खात्यातूनही कर्ज घेऊ शकता. आता PF खात्यावर कर्ज कसे मिळवायचे आणि PF खात्यावरील कर्जाबाबत काय नियम आहेत? याबद्दल माहिती घेऊया. कर्ज कसे मिळवायचे माहित आहे? पीएफमध्ये जमा केलेल्या पैशावर मिळणाऱ्या कर्जाला पीपीएफ कर्ज (PPF Loan) म्हणतात. पर्सनल लोन प्रमाणे तुम्ही यात कर्ज घेऊ शकत नाही. यासाठी तुम्हाला ठेव रकमेच्या आधारावर पैसे मिळतात. लक्षात ठेवा की तुमचे पीपीएफ खाते सक्रिय नसल्यास तुम्ही त्यावर कर्ज घेऊ शकत नाही. याशिवाय जोपर्यंत पीपीएफवर घेतलेले पहिले कर्ज फेडले जात नाही, तोपर्यंत त्यावर दुसरे कर्ज घेता येत नाही. SEBI चा मोठा निर्णय! या लोकांना करता येणार नाही ट्रेडिंग, वाचा निर्बंधाचं कारण किती कर्ज मिळू शकते? तुम्हाला हे कर्ज पीएफमध्ये जमा केलेल्या रकमेच्या आधारावरच मिळते. पीएफ खाते उघडल्यानंतर दोन वर्षांनीच कर्ज घेता येते. जर तुम्ही एका वर्षापासून पैसे जमा करत असाल तर तुम्ही कर्ज घेऊ शकत नाही. तिसऱ्या वर्षी तुम्ही दोन वर्षांत जमा केलेल्या रकमेच्या केवळ 25 टक्के कर्ज घेऊ शकता. तसेच जर पीएफ खाते बऱ्याच काळापासून असेल तर तुम्ही सर्व पैसे देखील काढू शकता. कर्जावर किती व्याज आकारले जाते? पूर्वी पीपीएफवर कर्ज घेण्यासाठी खातेदाराला 2 टक्के व्याज द्यावे लागत होते, परंतु सरकारने 2020 साठी ते एक टक्के कमी केले आहे. पीएफवरील व्याज वजा केल्यानंतर ही रक्कम फक्त 1 टक्केच राहते. मात्र, तुम्ही जितके दिवस हे कर्ज घ्याल तितके दिवस तुम्हाला पीएफ खात्यावर सरकारकडून व्याज मिळत नाही. 6.5 कोटी लोकांना दिवाळी गिफ्ट, तुम्हाला मिळालं की नाही ते अशाप्रकारे तपासा अर्ज कसा करायचा? जर तुम्हाला यासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला यासाठी फॉर्म डी (PF Form D) आवश्यक असेल. तुम्ही ते तुमच्या बँकेतून घेऊ शकता किंवा बँकेच्या वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता. यानंतर तुम्हाला ते तुमच्या बँकेत जमा करावे लागेल, त्यानंतर कर्जाची प्रक्रिया सुरू होईल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Loan, PPF

    पुढील बातम्या