महिन्याला 1 लाख रुपये कमवा, करा हा व्यवसाय

कुक्कुटपालनातून भरपूर नफा मिळतो. तुम्हीही हा व्यवसाय करणार असाल तर यासाठी प्रशिक्षण घेण्याची गरज आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 14, 2019 01:04 PM IST

महिन्याला 1 लाख रुपये कमवा, करा हा व्यवसाय

तुम्हाला शेती किंवा शेतीपुरक व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही महिन्याला 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता. हंगामी शेतीतून फारसं उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे शेतीपूरक व्यवसायातून भरघोस कमाई करता येईल.

यामध्ये कुक्कुटपालन हा व्यवसाय भरपूर उत्पन्न मिळवून देतो. कमीत कमी 5 ते 9 लाख रुपयांची गुंतवणूक करुन या व्यवसायाची सुरुवात करता येते. पहिल्यांदा 1500 कोंबड्या घेऊन लेअर फार्मिंगला सुरुवात केल्यास 50 हजार ते 1 लाख रुपये प्रतिमहिना कमवू शकता.

कुक्कुटपालनासाठी जागा, शेड उभारणी आणि इतर साहित्यासाठी जवळपास 5 ते 6 लाख रुपये खर्च करावे लागतील. 1500 कोंबड्यांच्या टार्गेटनुसार काम सुरु करायचे असेल तर 10 टक्के जास्त पिल्लं खरेदी करावी लागतील. कारण काही कारणांनी कोंबड्या मरण्याची शक्यता असते.

Loading...

कोंबड्यांची वाढ होण्यासाठी 20 आठवडे लागतात. त्या काळात किमान एक ते दीड लाख रुपये इतका खर्च होतो. एक कोंबडी एका वर्षात 300 अंडी घालते. 20 आठवड्यांनी कोंबडी अंडी घालायला सुरु करते त्यानंतर त्यांच्या खाद्य आणि औषधांवर 3 ते 4 लाख रुपये इतका खर्च होतो.

जर तुम्ही 1500 कोंबड्या पाळल्या असतील तर वर्षाला प्रत्येक कोंबडीची 290 अंडी झालीत तर 4 लाख 35 हजार अंडी मिळतात. यातील 4 लाख अंडी साडेतीन रुपये दराने विकली गेली तरी 14 लाख रुपयांची कमाई होते.

एक लेअर पॅरेंट बर्थची किंमत जवळपास 30 ते 35 हजार रुपये असते. या हिशोबानुसार कोंबड्या खरेदी करण्यासाठी 50 हजार रुपयांची तरतूद करावी लागते. विकत घेतलेल्या कोंबड्य़ा पाळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं खाद्य आणि औषधं यावर खर्च करावा लागतो.

कुक्कुटपालनातून भरपूर नफा मिळतो. तुम्हीही हा व्यवसाय करणार असाल तर यासाठी प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. लहान पक्षी घेतल्यानंतर त्यांची काळजी कशी घ्यायची? त्यांना किती प्रमाणात खाद्य, औषध द्यायचं याची माहिती असायला पाहिजे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 14, 2019 12:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...