मराठी बातम्या /बातम्या /मनी /

'या' वनस्पतीची लागवड करून आयुष्यभर करा लाखोंची कमाई; सरकारी अनुदानही उपलब्ध

'या' वनस्पतीची लागवड करून आयुष्यभर करा लाखोंची कमाई; सरकारी अनुदानही उपलब्ध

दालचिनीची (Cinnamon) पानं तमालपत्रं म्हणून ओळखली जातात. आपल्या देशात हा एक प्रॉफिटेबल बिजनेस ठरू शकतो.

दालचिनीची (Cinnamon) पानं तमालपत्रं म्हणून ओळखली जातात. आपल्या देशात हा एक प्रॉफिटेबल बिजनेस ठरू शकतो.

दालचिनीची (Cinnamon) पानं तमालपत्रं म्हणून ओळखली जातात. आपल्या देशात हा एक प्रॉफिटेबल बिजनेस ठरू शकतो.

नवी दिल्ली 23 ऑक्टोबर : आताच्या काळात स्वत:चा व्यवसाय सुरू करणं ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. काहींच्या डोक्यात व्यवसायाची कल्पना असते; मात्र त्यांच्याकडे पैसा नसतो. काहींकडे पैसा असतो, मात्र कल्पना नसते. काहींकडे फक्त इच्छा असते आणि पैसा व कल्पना दोन्हींचा अभाव असतो. अशा विविध कारणांमुळे अनेक इच्छुकांना व्यवसाय सुरू करता येत नाहीत. अशा लोकांसाठी आम्ही वेळोवेळी नवीन बिझनेस आयडिया (Business Idea) घेऊन येतो. आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यवसायाबद्दल माहिती देणार आहोत, ज्यातून तुम्ही अमाप नफा (Profit) मिळवू शकता. असा कुठला व्यवसाय आहे हे आपण जाणून घेऊया.

आजचा व्यवसाय शेतीशी निगडित आहे. तुम्हाला शेतीमध्ये रस असेल, तर तुम्ही या खास व्यवसायाच्या मदतीनं आयुष्यभर लाखोंची कमाई करू शकता. आपल्या दैनंदिन वापरात अशा काही गोष्टी समाविष्ट आहेत की ज्यांची मागणी कधीही कमी होत नाही. वर्षातले बाराही महिने आपल्याला त्या गोष्टींची आवश्यकता भासते. मसाल्याच्या पदार्थांच्या अशाच आवश्यक गोष्टींमध्ये समावेश होतो. मसाल्यांशिवाय जेवणाला चव येत नाही. म्हणून मसाल्याचे पदार्थ अतिशय महत्त्वाचे आहेत.

लाखाचे 12 लाख फक्त 18 महिन्यात! तुमच्याकडे आहे का 'हा' स्टॉक?

तेजपत्ता किंवा तमालपत्र हा मसाल्यातला महत्त्वाचा घटक आहे. सुकलेल्या आणि सुगंध असलेल्या तमालपत्राला इंग्रजीमध्ये बे लीफ (Bay leaf) म्हणतात. दालचिनीची (Cinnamon) पानं तमालपत्रं म्हणून ओळखली जातात. आपल्या देशात हा एक प्रॉफिटेबल बिजनेस ठरू शकतो. कारण, तमालपत्राला देशात आणि देशाबाहेर मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळं दालचिनीची लागवड करून तुम्ही त्याचा व्यवसाय करू शकता.

अन्नपदार्थ चवदार करण्यासाठी मसाल्याचा घटक म्हणून तमालपत्रं वापरली जातात. प्राचीन काळापासून हे मसाला पीक घेतलं जातं. भारत, रशिया, मध्य अमेरिका, इटली, फ्रान्स, उत्तर अमेरिका आणि बेल्जियम इत्यादी ठिकाणी दालचिनीची शेती केली जाते. या ठिकाणांवरून त्याची जगभरात निर्यात होते.

PF Interest : पीएफवरील व्याजाचे पैसे मिळण्यास सुरुवात

कशी कराल शेती? (How to do Bay leaf Farming?)

अगदी सहजपणे दालचिनीची शेती सुरू करता येते. ही शेती करण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात थोडी मेहनत करावी लागते. नंतर मात्र झाडांची नियमित वाढ सुरू झाली की मेहनत कमी होत जाते. याच्या लागवडीतून तुम्हाला दर वर्षी चांगलं उत्पन्न मिळू शकते. दालचिनीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाकडून 30 टक्के अनुदानदेखील दिलं जातं. त्यामुळे लागवड खर्चाचं आर्थिक ओझं काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते.

किती नफा मिळू शकेल?

या शेतीच्या नफ्याबद्दल बोलायचं झाल्यास, एका झाडापासून वार्षिक 5 हजार रुपये मिळू शकतात. म्हणजेच तुम्ही दालचिनीची 25 झाडं लावली तर वर्षाकाठी 75 हजार ते 1 लाख 25 हजारांपर्यंत वार्षिक उत्पन्न मिळू शकतं. हा व्यवसाय मोठा करून कमाईदेखील वाढवता येऊ शकते. एकूणच मागणी, लागवड खर्च, मिळणारं अनुदान आणि शेवटी मिळणारा नफा यांचा विचार केला तर ही शेती नक्कीच फायद्याची ठरू शकते. अर्थात, यासाठी योग्य ते मार्गदर्शन घेणंही अत्यंत आवश्यक आहे.

First published:

Tags: Organic farming, Small investment business