मराठी बातम्या /बातम्या /मनी /मोदी सरकार देत आहे घरबसल्या 15 लाख रुपये जिंकण्याची संधी, 15 ऑगस्ट आहे शेवटची तारीख; करावं लागेल हे काम

मोदी सरकार देत आहे घरबसल्या 15 लाख रुपये जिंकण्याची संधी, 15 ऑगस्ट आहे शेवटची तारीख; करावं लागेल हे काम

तुम्हाला जर घरबसल्या पैसे कमवायचे असतील तर तुमच्याकडे ही चांगली संधी आहे. मोदी सरकार तुम्हाला 15 लाख रुपये जिंकण्याची संधी देत आहे.

तुम्हाला जर घरबसल्या पैसे कमवायचे असतील तर तुमच्याकडे ही चांगली संधी आहे. मोदी सरकार तुम्हाला 15 लाख रुपये जिंकण्याची संधी देत आहे.

तुम्हाला जर घरबसल्या पैसे कमवायचे असतील तर तुमच्याकडे ही चांगली संधी आहे. मोदी सरकार तुम्हाला 15 लाख रुपये जिंकण्याची संधी देत आहे.

नवी दिल्ली, 13 ऑगस्ट: तुम्हाला जर घरबसल्या पैसे  (Earn money) कमवायचे असतील तर तुमच्याकडे ही चांगली संधी आहे. मोदी सरकार (Central Government) 15 लाख रुपये जिंकण्याची (Win 15 lakh rupees) संधी देत आहे. अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry) एक नवी स्पर्धा सुरू केली आहे. यामध्ये स्पर्धकांना सरकारच्या एका संस्थेसाठी नाव, लोगोचं डिझाइन आणि टॅगलाइन सुचवायची आहे. तुम्ही सुचवलेलं नावं आवडल्यास तुमच्याकडे बक्षीस जिंकण्याची संधी आहे. अलीकडेच My Gov India ने ट्वीट करत या स्पर्धेविषयी माहिती दिली होती. या स्पर्धेसाठी तुम्ही 15 ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकता.

नेमकी काय आहे स्पर्धा?

My Gov India ने केलेल्या ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, तुम्हाला क्रिएटिव्ह नाव, टॅगलाइन आणि लोगो बनवायचा आहे. ही स्पर्धा डेव्हलपमेंट फायनान्शिअल इन्स्टीट्यूशनसाठी (DFI)आहे. यामध्ये पहिलं बक्षीस मिळवणाऱ्याला 5 लाख रुपयांचं रोख बक्षीस दिलं जाईल. डिपार्टमेंट ऑफ फायनान्शिअल सर्व्हिसेस, अर्थ मंत्रालयाने डेव्हलपमेंट फायनान्शिअल इन्स्टीट्यूशनसाठी नाव, टॅगलाइन सुचवण्यास आणि लोगो डिझाइन देण्याची मागणी केली आहे. कामाच्या हिशोबाने या गोष्टी क्रिएटिव्ह असण्याची अपेक्षा आहे.

हे वाचा-RBI ने या बँकेवर ठोठावला 1 कोटींचा दंड, ग्राहकांवर काय होणार परिणाम?

15 ऑगस्टपर्यंत व्हा सहभागी

या स्पर्धेत सहभागी होण्याकरता तुम्हाला MyGov.in पोर्टलवर जावे लागेल. याठिकाणी स्पर्धेसाठी तुमची एंट्री द्यावी लागेल. या स्पर्धेत सहभागी होण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट आहे. त्यानंतर सरकार विजेत्यांची घोषणा करेल.  mygov.in पोर्टलवर तुम्हाला लॉग इन टू पार्टिसिपेट टॅबवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर रजिस्ट्रेशन डिलेल्स भरल्यानंतर तुम्हाला तुमची एंट्री द्यावी लागेल.

हे वाचा-Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी, मुंबईत पेट्रोल 107 रुपयांपार

काय आहे बक्षीस?

या स्पर्धेत भाग घेणाऱ्यांना रोख रक्कम बक्षीस म्हणून मिळेल. ही रोख रक्कम पहिलं, दुसरं आणि तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस जिंकणाऱ्यांना मिळेल.

नाव- 5,00,000/-, Rs. 3,00,000/- , Rs. 2,00,000/-

टॅगलाइन- 5,00,000/-, Rs. 3,00,000/- , Rs. 2,00,000/-

लोगो-5,00,000/-, Rs. 3,00,000/- , Rs. 2,00,000/-

First published:

Tags: Modi government, Money