Home /News /money /

Inspira Enterprise India IPO: ख्रिसमसध्ये मिळेल कमाईची संधी, ही मोठी कंपनी आयपीओ आणण्यासाठी सज्ज

Inspira Enterprise India IPO: ख्रिसमसध्ये मिळेल कमाईची संधी, ही मोठी कंपनी आयपीओ आणण्यासाठी सज्ज

सायबर सुरक्षा सर्व्हिस देणारी कंपनी इंस्पिरा एंटरप्राइज इंडिया (Inspira Enterprise India) या महिन्यात त्यांचा आयपीओ लाँच करू शकते. त्यामुळे 2021 वर्षाअखेर देखील तुमच्याकडे कमाईची संधी आहे

    नवी दिल्ली, 06 डिसेंबर: सायबर सुरक्षा सर्व्हिस देणारी कंपनी इंस्पिरा एंटरप्राइज इंडिया (Inspira Enterprise India) या महिन्यात त्यांचा आयपीओ लाँच करू शकते. कंपनी त्यांचा व्यवहार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विस्तारण्यासाठी 800 कोटी रुपयांचा आयपीओ (Inspira Enterprise India IPO) आणण्याचा विचार करत आहे. Inspira आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत, विशेषतः यूएसमध्ये आपले अस्तित्व प्रस्थापित करण्यासाठी या IPO ची रक्कम गुंतवण्याचा विचार करत आहे. कंपनीने काही काळापूर्वी यूएस मध्ये त्यांचे एक कार्यालय सुरू केले आहे आणि आता पुढील दोन-तीन वर्षांमध्ये यूएसमध्ये आपले अस्तित्व आणखी वाढवण्याची योजना ही कंपनी आखत आहे. कंपनी युरोप आणि ऑस्ट्रेलियामध्येही आपला व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. 800 कोटी रुपयांचा आयपीओ SEBI ने गेल्या महिन्यातच इंस्पिराला 800 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी मंजुरी दिली आहे. कंपनीने सादर केलेल्या दस्तावेजांनुसार, या आयपीओअंतर्गत कंपनी 300 कोटी रुपयांचे नवीन शेअर जारी करेल. याशिवाय प्रकाश जैन, मंजुला जैन फॅमिली ट्रस्ट आणि प्रकाश जैन फॅमिली ट्रस्ट द्वारे 500 कोटी रुपयांच्या इक्विटी शेअर्सची विक्री केली (OFS) जाईल. हे वाचा-मुंबईत पेट्रोल 110 रुपयांवर, आजही इंधनामुळे सामान्यांच्या खिशाला चाप OFS अंतर्गत, प्रकाश जैन 131.08 कोटी रुपयांपर्यंतचे इक्विटी शेअर्स विकतील. मंजुला जैन फॅमिली ट्रस्ट 91.77 कोटी रुपयांपर्यंत आणि प्रकाश जैन फॅमिली ट्रस्ट 277.15 कोटी रुपयांपर्यंत शेअर्स विकणार आहे. इन्स्पिरा मॅनेजमेंटकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी या महिन्यात ख्रिसमसच्या सुट्टीच्या काळातच त्यांचा पहिला आयपीओ आणण्याचा विचार करत आहे. जर काही कारणास्तव या कंपनीचा IPO या महिन्यात लाँच झाला नाही, तर नक्कीच पुढच्या महिन्यात पब्लिक इश्यू लाँच केला जाईल. हे वाचा-कोरोना काळातही कृषी आणि प्रक्रिया उत्पादनांच्या निर्यातीत 13 टक्क्यांनी वाढ Tega Industries IPO ला उत्स्फूर्त प्रतिसाद खाण उद्योगासाठी लागणाऱ्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या टेगा इंडस्ट्रीज लिमिटेडच्या IPO ला गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या आयपीओच्या सब्सक्रिप्शनच्या शेवटच्या दिवशी एकूण 219.04 पट सब्सक्रिप्शन मिळाले आहे. कंपनीला एकूण 2,09,58,69,600 शेअर्ससाठी बोली प्राप्त झाली. तर कंपनीने 619.22 कोटी रुपयांच्या या IPO अंतर्गत 95,68,636 शेअर्स ऑफर केले होते. कंपनीने आयपीओची किंमत 443 ते 453 रुपये प्रति शेअर निश्चित केली होती.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Money

    पुढील बातम्या