मराठी बातम्या /बातम्या /मनी /कमी पैशात सुरू करा हा व्यवसाय, दरमहा होईल 5 लाखांची कमाई; वर्षभर चालतो हा बिझनेस

कमी पैशात सुरू करा हा व्यवसाय, दरमहा होईल 5 लाखांची कमाई; वर्षभर चालतो हा बिझनेस

अनेक वेळा लोकांना व्यवसाय करायचा असतो पण नेमकी कल्पना येत नाही की कोणता व्यवसाय सुरू केला जावा. याठिकाणी आम्ही तुम्हाला 12 महिने चालणाऱ्या बिझनेसबद्दल सांगत आहोत. तुम्ही टेंट हाऊस व्यवसाय (Tent House Business) सुरू करू शकता.

अनेक वेळा लोकांना व्यवसाय करायचा असतो पण नेमकी कल्पना येत नाही की कोणता व्यवसाय सुरू केला जावा. याठिकाणी आम्ही तुम्हाला 12 महिने चालणाऱ्या बिझनेसबद्दल सांगत आहोत. तुम्ही टेंट हाऊस व्यवसाय (Tent House Business) सुरू करू शकता.

अनेक वेळा लोकांना व्यवसाय करायचा असतो पण नेमकी कल्पना येत नाही की कोणता व्यवसाय सुरू केला जावा. याठिकाणी आम्ही तुम्हाला 12 महिने चालणाऱ्या बिझनेसबद्दल सांगत आहोत. तुम्ही टेंट हाऊस व्यवसाय (Tent House Business) सुरू करू शकता.

नवी दिल्ली, 12 डिसेंबर: सध्या लग्नसराईचा हंगाम (Wedding Season in India) सुरू आहे. गेल्यावर्षी कोरोना काळाता लग्नसोहळे मर्यादित लोकांच्या उपस्थितीत (Wedding during Corona) केले जात होते.  काही ठिकाणी अद्यापही मर्यादा असली तरी मात्र यावर्षी बहुतांश ठिकाणी तसे बंधन नाही आहे. यावर्षी वेडिंग सीझनध्ये तुम्ही जर स्वत:चा व्यवसाय सुरू केला तर तुम्ही फायद्यात राहू शकता. याठिकाणी आम्ही लग्न, छोटे-मोठे फंक्शन्स या संबंधित व्यवसायांबाबत सांगत आहोत. अनेक वेळा लोकांना व्यवसाय करायचा असतो पण नेमकी कल्पना येत नाही की कोणता व्यवसाय सुरू केला जावा. याठिकाणी आम्ही तुम्हाला 12 महिने चालणाऱ्या बिझनेसबद्दल सांगत आहोत. तुम्ही टेंट हाऊस व्यवसाय (Tent House Business) सुरू करू शकता.

कुठेही सुरू करता येईल टेंट हाऊस व्यवसाय

तुम्ही गावात राहता किंवा शहरात, तुम्ही हा व्यवसाय कुठेही सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला थोड्या जागेची आवश्यकता भासेल. आता लग्नाच्या मोसमात तुमच्या या कामाला व्यवस्थित किक स्टार्ट मिळू शकते, कारण सध्या एकाच दिवसात हजारो लग्नसोहळे पार पडत आहे.

हे वाचा-वाह..! यावर्षी 'या' सेक्टरनं दिल्या सर्वांत जास्त नोकऱ्या, पाहा कोणतंय हे सेक्टर

किती करावा लागेल खर्च?

टेंट बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला थोडी गुंतवणूक करावी लागेल. टेंट उभारण्यासाठी लाकडी खांब, बांबू, लोखंडी पाईप घ्यावे लागतात. याशिवाय खुर्च्या, गालिचे, दिवे, पंखे, गाद्या, बेडस्प्रेड, चादरी या लागतील कारण सर्वच फंक्शन्समध्ये या गोष्टींची आवश्यकता भासते. जर तुम्ही केटरिंगच्या वस्तू देखील पुरवत असाल तर तुम्हाला भांडी सोबत गॅस स्टोव्ह, भट्टी आणि पाण्याचे मोठे ड्रम खरेदी करावे लागतील.

सुरुवातीला, तुम्हाला स्टॉक खरेदी करण्यासाठी 1 ते 1.50 लाख रुपये गुंतवावे लागतील. तुम्हाला एखादे काम मिळाल्यानंतर अधिक भांडवल गुंतवून तुम्ही तुमचा व्यवसाय मोठा करू शकता.

हे वाचा-तिने 1 वर्षात केली 8 लाखांहून अधिक Saving, वाचा बचत करण्याच्या जबरदस्त Tips

किती मिळेल प्रॉफिट?

सध्या लग्नसराईचा सीझन सुरू आहे, त्यामुळे या सीझनमध्ये तुम्हाला छोटे-मोठे बुकिंग सहज मिळतील. एका ऑर्डरवर म्हणजेच बुकिंगवर तुम्हाला 25 ते 30 हजार रुपये सहज मिळतील. जर तुम्ही मोठ्या स्तरावर व्यवसाय करत असाल तर बुकिंगवर 80 ते 90 हजार रुपये मिळतील. म्हणजेच तुम्ही दरमहा 4 ते 5 लाख रुपये सहज कमवू शकता. तथापि, ही कमाई तुमच्या बुकिंगवर अवलंबून असते.

First published:
top videos

    Tags: Money