Home /News /money /

Earn Money: तुमच्या घराच्या रिकाम्या छताचा 'असा' करा वापर, महिन्याला कमवा लाखो रुपये

Earn Money: तुमच्या घराच्या रिकाम्या छताचा 'असा' करा वापर, महिन्याला कमवा लाखो रुपये

तुम्ही तुमच्या घराच्या रिकाम्या छताचा वापर करून लाखो रुपये कमावू (Earn Money) शकता. यासाठी तुम्हाला फक्त छतावर सोलर पॅनल (solar panels) बसवावे लागतील. सोलर पॅनल कुठेही बसवता येतात. जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली, 07 जानेवारी: तुम्ही तुमच्या घराच्या रिकाम्या छताचा वापर करून लाखो रुपये कमावू (Earn Money) शकता. यासाठी तुम्हाला फक्त छतावर सोलर पॅनल (solar panels) बसवावे लागतील. सोलर पॅनल कुठेही बसवता येतात. घराच्या छतावर सुद्धा सोलर पॅनल बसवून तुम्ही वीज (electricity) निर्मिती करू शकता ग्रीडमध्ये सप्लाय करता येईल. सोलर पॅनल लावण्यासाठी केंद्र सरकार (Central Government) अनुदानही देतं. सरकारच्या न्यू अँड रिन्युएबल एनर्जी मंत्रालयाकडून (The Ministry of New and Renewable Energy) सौर पॅनेल बसवणाऱ्यांना रूफटॉप सोलर प्लांटवर 30 टक्के अनुदान दिलं जातं. अनुदानाशिवाय रुफटॉप सोलर पॅनेल बसवण्यासाठी सुमारे 1 लाख रुपये खर्च येतो. प्रत्यक्ष खर्च किती येतो? एका सोलर पॅनलची किंमत सुमारे एक लाख रुपये आहे. हा खर्च प्रत्येक राज्यानुसार वेगळा असतो. मात्र सरकारकडून अनुदान मिळाल्यानंतर अवघ्या 60 ते 70 हजार रुपयांमध्ये एक किलोवॅट क्षमतेचा सोलर प्लांट उभारता येईल. काही राज्ये यासाठी स्वतंत्रपणे अतिरिक्त अनुदानदेखील देतात. जर तुमच्याकडे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी एकरकमी 60 हजार रुपये नसतील, तर तुम्ही कोणत्याही बँकेकडून त्यासाठी गृहकर्ज देखील घेऊ शकता. यासाठी अर्थ मंत्रालयाने सर्व बँकांना गृहकर्ज देण्यास सांगितले आहे. हे वाचा-अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजाराची चाल कशी असते? समजून घ्या आणि नियोजन करा महिन्याला मिळू शकतं एक लाखांपर्यंत उत्पन्न घराच्या छतावर सोलर पॅनल उभारण्यासाठी गुंतवणूक खूपच कमी आहे. परंतु तुमच्याकडे पैसे नसले, तरीही काळजी करण्याची गरज नाही. कारण यासाठी अनेक बँका कर्ज देतात. यासाठी तुम्ही बँकेकडून सौर अनुदान योजना, कुसुम योजना, राष्ट्रीय सौर ऊर्जा अभियानांतर्गत एसएमई (SME) कर्ज घेऊ शकता. या व्यवसायातून एका महिन्यात 30 हजार रुपयांपासून ते 1 लाख रुपयांपर्यंत कमवता येतील. यासोबतच सौर व्यवसायासाठी अनेक योजनांतर्गत भारत सरकार 30 टक्क्यांपर्यंत अनुदान देतं. तुमच्या जिल्ह्यातील अक्षय ऊर्जा विभागाला भेट देऊन तुम्ही या योजनांची माहिती मिळवू शकता. फायदा काय? सौर पॅनेलचं आयुष्य 25 वर्षे असतं. तुम्ही हे पॅनल तुमच्या घराच्या छतावर सहज बसवू शकता. या पॅनेलमधून तुम्हाला मोफत वीज मिळेलच, शिवाय तुम्ही उर्वरित वीज ग्रीडद्वारे सरकार किंवा वीज कंपनीला विकू शकता. जर तुम्ही तुमच्या घराच्या छतावर दोन किलोवॅटचे सोलर पॅनल लावले, व दिवसातील 10 तास सूर्यप्रकाश असेल, तर यामधून सुमारे 10 युनिट वीज निर्माण होईल. महिन्याचा हिशेब केला तर दोन किलोवॅट सोलर पॅनल सुमारे 300 युनिट वीज निर्माण करेल. हे वाचा-Omicron मुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा झटका! GDP ग्रोथमध्ये घट होण्याचा अंदाज असं करा सौर पॅनेल खरेदी - सौर पॅनेल खरेदी करण्यासाठी तुम्ही राज्य सरकारच्या अक्षय ऊर्जा विकास प्राधिकरणाशी (renewable energy development authority) संपर्क साधू शकता. - राज्यातील प्रमुख शहरांमध्ये याची कार्यालये आहेत. - प्रत्येक शहरांत खासगी डीलर्सकडूनसुद्धा सोलर पॅनेल खरेदी करता येतील. - सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाचा फॉर्मही प्राधिकरण कार्यालयातच मिळेल. - कर्ज घेण्यासाठी प्राधिकरणाशी आधी संपर्क करावा लागेल. मेंटेनन्स खर्च नाही सोलर पॅनलच्या मेंटेनन्सच्या खर्चाचं कोणतंही टेन्शन नाही. पण त्याची बॅटरी दर 10 वर्षांनी एकदा बदलावी लागेल. या बॅटरीची किंमत सुमारे 20 हजार रुपये आहे. हे सोलर पॅनल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज घेऊन जाता येईल. विजेच्या बिलात सातत्याने वाढ होते आहे. अशावेळी मोफत वीज मिळवणं आणि त्यातून कमाईदेखील करणे असे दोन्ही फायदे तुम्ही मिळवू शकता. त्यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या रिकाम्या असणाऱ्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसावे लागणार आहेत.
First published:

Tags: Business News, Money, Small business

पुढील बातम्या