मराठी बातम्या /बातम्या /मनी /50 रुपयांचा हा शेअर, तुम्हाला करेल मालामाल! कुठे लावाल पैसा?

50 रुपयांचा हा शेअर, तुम्हाला करेल मालामाल! कुठे लावाल पैसा?

शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची उत्सुकता अनेकांना असते. तुम्ही देखील शेअर बाजारात पैसे गुंतवण्याचा आणि त्यातून चांगली कमाई करण्याचा विचार करत असाल तर चांगली संधी चालून आलेली आहे. सीएनआय ग्लोबलच्या अहवालानुसार, गुंतवणूकदारांसाठी लिबास कंझ्युमरमध्ये (Libas Consumer share) गुंतवणूक करणं अत्यंत फायद्याचं ठरणार आहे.

पुढे वाचा ...

    मुंबई, 16 जून : शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची उत्सुकता अनेकांना असते. तुम्ही देखील शेअर बाजारात पैसे गुंतवण्याचा आणि त्यातून चांगली कमाई करण्याचा विचार करत असाल तर चांगली संधी चालून आलेली आहे. सीएनआय ग्लोबलच्या अहवालानुसार, गुंतवणूकदारांसाठी लिबास कंझ्युमरमध्ये (Libas Consumer share) गुंतवणूक करणं अत्यंत फायद्याचं ठरणार आहे. यातील गुंतवणूकीसाठी खूप पैशांचीही गरज नाही. कारण या शेअरची किंमत फक्त 52 रुपये आहे. तुम्ही 50-55 रुपयांपर्यंतचे शेअर्स पाहात असाल तर हा उत्तम पर्याय आहे.

    सीएनआय ग्लोबलनं लिबास कंझ्युमर प्रॉडक्ट लि. च्या शेअरसाठी 90 रुपये किंमतीचं लक्ष्य ठेवलं आहे. या वर्षाच्या सुरूवातीला कंपनीने 1: 5 च्या गुणोत्तरात शेअर्सचा बोनस इश्यू जाहीर केला होता. यापूर्वी 2018 मध्ये कंपनीने गुंतवणूकदारांना 1: 2 बोनस दिला आहे.

    कंपनीचा व्यवसाय काय आहे ?

    एनएसई अर्थात राष्ट्रीय शेअर बाजारात (NSE Listed) नोंदणी असणारी लिबास कंझ्युमर ही कंपनी तयार कपडयांच्या क्षेत्रात व्यवसाय करते. पुरुष आणि स्त्रियांसाठी एथनिक डिझायनर ड्रेसेस तयार करण्याचा कंपनीचा व्यवसाय आहे. याशिवाय ही कंपनी दागिन्यांच्या क्षेत्रातही आहे. कंपनीचा मूळ व्यवसाय फॅशन मूल्यांकन आणि अॅक्सेसरीज यांचा आहे. जवळपास दोन दशकांपासून ही कंपनी भारतीय बाजारपेठेत व्यवसाय करीत आहे. याशिवाय या कंपनीचा भारतासह परदेशातही गणवेश उत्पादनाचा (Uniform Manufacturing) व्यवसाय आहे. कंपनीची भारतातील 3 शहरांमध्ये 4 स्टोअर्स असून, दुबईमध्ये 10,400 चौरस फूट जागेवरील एक फ्रँचायझी स्टोअर आहे.

    कंपनीचे संचालक काय म्हणतात ?

    लिबास कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे संचालक रियाज गंगजी म्हणतात की, भारतीय ग्राहक आता ब्रँडेड रेडिमेड कपड्यांकडे वळत आहेत, त्यामुळे या क्षेत्रात बरेच सकारात्मक बदल होत आहेत. कंपनीच्या उत्पादन विक्रीला चालना देण्यासाठी ते खूप फायदेशीर आहेत. भारतीय बाजारपेठेत शहरी भागातील लोक रेडिमेड कपड्यांवर (Readymade) अधिक पैसे खर्च करत आहेत, त्यामुळे या उद्योगाला अधिक संधी निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून मॉल आणि इतर कंपन्या ब्रँडेड रेडीमेड कपड्यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध होत आहे. लिबाससारख्या कंपन्यांना ही स्थिती अत्यंत अनुकूल आहे. या पार्श्वभूमीवर भारतात आणि परदेशात 100 स्टोअर्स उघडण्याची कंपनीची योजना असल्याचं त्यांनी नमूद केलं.

    एफएमसीजी क्षेत्रात प्रवेश

    लिबासनं नुकताच एफएमसीजी विभागातही प्रवेश केला आहे. कंपनी गंगजी मीठ या नावानं सैंधव मीठाची आयात, उत्पादन आणि पॅकेजिंग करत आहे. भिवंडीमध्ये हा व्यवसाय सुरू केला असून भरुचमध्येही नवीन प्रकल्प उभारण्याची योजना आहे. कंपनी 1500 टन सैंधव मीठ तयार करण्याची क्षमता असणारा पहिला स्वयंचलित उत्पादन करणारा प्रकल्प उभारत आहे. टाटा सॉल्ट, किआ, श्री श्री, शंख, टेरा ग्रीन्स हे कंपनीचे प्रमुख ग्राहक आहेत.

    ‘आरोग्यदायी पौष्टिक उत्पादनांवर लक्ष केंद्रित करून कंपनीनं निर्यात आणि स्थानिक बाजारपेठेत समृद्ध सेंद्रिय उत्पादनं दाखल करण्यासाठी 15000 सेंद्रिय शेतकर्‍यांशी करार केला आहे. तर लिबासनं लिबास फॅशनच्या प्रसिद्धीसाठी मॅट्रीमोनी डॉट कॉमशी करार केला आहे. गोल्डन ब्रिक्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडमधील 100 टक्के भागीदारी घेण्यासाठीही कंपनी प्रयत्न करत आहे, अशी माहिती रियाज गंगजी यांनी दिली.

    First published:
    top videos

      Tags: Investment, Share market